दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो मला काहीच चढली नाही मी इतकीच घेणार असा प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो पेग बनवनारा त्यदिवशी जग बनवनार्यापेक्षा मोठा असतो स्वताच्या स्वार्थासाठी प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते पीण्याचा कार्यक्रम पीणार्याला दरवेळेस नवीन पर्व असते लोकांना अकँडेमीपेक्षा पीण्याचा क्षमतेवर गर्व असते आपण हीच घेतो म्हणत ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात वेळ आली आणि पैसा नसला की देशीवरही तहान् भागवतात शेवटी काय दारु दारु असते कोणतीही चढते दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते पीणार्यामध्ये प्रेम हा चर्चेचा पहीला वीषय आहे देवदासचे खरे प्रेम पारो की दारु मला अजुन संशय आहे प्रत्येक पेगमागे तिची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते
तीच्या आठवणीत थर्टीची लेवल लगेच सिक्स्टीला भीडते दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते चुकुन कधीतरी गंभीर वीषयावरही चर्चा चालतात सर्वजण मग त्यावर Phd. केल्यासारखे बोलतात प्रत्येकाला वाटतेकी त्यालाच यामधले जास्त कळते ग्लोबल वार्मिंगची चर्चा गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते जसा मुद्दा बदलतो तसा आवाज वाढते दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते फेकणे, मोठेपणा दाखवणे याबाबतीत् यांच्यासारखा हात नाही एरवी सींगल समोसा खाणारा गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही पैशे पैशे काय आहे ते फक्त खर्च करण्यासाठीच असतात पेगजवळ झालेली अशी गणिते सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात रात्री थोडी जास्त झाली मग त्याला कळते दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते यांच्यामते मद्यपान हा आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे बीयर पीण्यामागे सायन्स तर देशी पीण्यामागे आर्ट आहे यामुळे धीर येते ताकद येते ... ...यात वेगळीच मजा असते आयुष्यभराचा मावळा माणुस त्या क्षणी राजा असतो
दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते
म्हणून सांगतो कि standby 31st साठी अजून एक क्वार्टर घरी ठेवा मित्रोहो!
|