Jayesh Gujrati's Blog (in Marathi): प्रेमात आंधळं होवू नका.....!!!

Search

Saturday, April 28, 2012

प्रेमात आंधळं होवू नका.....!!!


एक सुंदर पण खूप अबोल मुलगी. वडील पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे दर ३-४ वर्षांमध्ये बदल्या होत असायच्या त्यामुळे ह्या शाळेत ४ वर्ष मग दुसऱ्या शाळेत ३ वर्ष असे करत करत तिचं बीकॉम पर्यंतच शिक्षण झाले. त्यामुळे तिचे मित्र-मैत्रिणी कधीच होवू शकल्या नाहीत. आणि मुळ स्वभावच अबोल असल्यामुळे स्वताहून तिनेही मैत्रीसाठी कुठे हाथ पुढे केला नाही. तिच्या वडलांची शेवटच्या १० वर्षासाठी मुंबई मध्ये बदली झाली. इथे आल्यावर घरात बसून बसून ती खूप कंटाळत असायची म्हणून तिच्या वडलांनी तिला Computer कोरस करायला सांगितला म्हणजे तिचा वेळ पण जाईल आणि थोड शिक्षण पण मिळेल. त्याप्रमाणे त्या एरिया मधेच तिला क्लास लावून दिला. ती नियमित क्लासला जायला लागली. तिथेच तिची ओळख समीरशी झाली. तोही तिथे क्लासला येत होता. समवयस्कर होता त्याने बी.ए. पूर्ण करून तो क्लास लावला होता. तो राहायला पण तिच्या अगदी घराजवळच होता. समीरने तिच्याशी मैत्री केली. दोघेही एकत्र क्लासला यायला जायला लागले. असे करत करत ६ महिने उलटून गेले. आतापर्यंत मैत्री खूप घनिष्ट झाली होती. वेळ साधून समीरने तिला प्रपोज केले. पण वडिलांबद्दल खूप आदर असल्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध काही करायची तिची हिम्मत नव्हती, कारण तिच्या वडिलांना तीच लग्न उच्चशिक्षित, आणि भरपूर पगार असलेल्या मुलाशी करून द्यायचं होत. आणि समीर जेमतेम बी ए होता आणि नोकरीचा तर अजून थांगपत्ता नव्हता. त्यामुळे तिने समीरला आपला निर्णय त्यावेळी दिला नाही.


असाच महिना लोटला, आणि अचानक समीरचा फोन आला कि मला नोकरी मिळाली आहे एका आठवड्यात मला बंगलोरला जायचय. आणि मला २५००० पगार मिळणार आहे. आता मी तुझ्यावडीलांशी लग्नाबद्दल बोलू शकतो, सुजाताला खूप आनंद होतो, आणि ती त्याला आपला होकार देवून टाकते. दोन दिवसांनी समीर तिच्या घरी येतो, तिचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. समीर खूप खुश होवून तिच्याशी बोलत होता, नोकरी बद्दल सर्व काही सांगत होता, मी तुझ्या वडिलांशी बोलतो आणि त्यांना सांगतो कि मी सहा महिन्यांनी सुट्टी घेवून परत येईन मग मी सुजाताशी लग्न करेन. तिलाहि खूप आनंद होतो, पण त्या आनंदात काही भलतच घडत, जे घडू नये असे बरेच काही, कारण घरात त्यावेळी ते दोघेच असतात, सुजाता त्यातून भानावर येते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, ती खूप घाबरते आणि रडायला सुरवात करते पण समीर तिची समजूत काढतो तिला समजावतो, काही होणार नाही आपण डॉक्टर कडे जावूया काही होणार नाही, तू काळजी करू नकोस असेही आपले सहा महिन्यातच लग्न होणार आहे. तो तिला मेडिकल मध्ये घेवून जातो, कुठलीतरी एक गोळी देतो तू आता काळजी करू नकोस काही होणार नाही. आणि तो तिला घरात आणून सोडतो आणि आपल्या घरी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा कॉल येतो तो बोलतो कि मला काळ रात्रीच बंगलोरसाठी निघावं लागलाय पण तू तुझ्या वडिलांना सांग कि मी सहा महिन्यात येतो आणि आपण लग्न करणार आहोत असे. ती आधीतर खूप घाबरते पण सर्व धीर एकटवून वडिलांशी बोलते. ते म्हणतात कि ठीक आहे मी त्याची वाट बघतोय, सहा महिन्यांनी त्याला त्याच्या आई-वडिलांना घेवून आपल्या घरी यायला सांग. तिला खूप बर वाटत. ती हि बातमी समीर कॉल करून लगेच देते.

पण पुढच्याच महिन्यात सर्व काही बदलून जात, तिला समजून येत कि ती Pregnant आहे, तिला काय कराव काहीच काळात नसत, आणि नेमके गेले ८ दिवसापासून समीरचा आणि तिचा संपर्क होवू शकला नव्हता. तिने ते सांगण्यासाठी परत त्याला कॉल केला. पण समीरशी काहीकेल्या संपर्क होत नव्हता. ती सारखी रडतच होती, तिने ठरवले कि समीर ज्या ठिकाणी राहत होता तिथे जावून चौकशी करावी. तिथे गेल्यावर पण तिला काहीच माहिती नाही मिळाली. ती तिथेच त्याच्या घराबाहेर रडत बसली. तेवड्यात एक मुलगा तिच्या जवळ आला त्याने तिला विचारले, तिने त्याला समीरबद्दल काही माहिती आहे का असे विचारले. त्याने सांगितले कि तो एक नंबरचा फ्रॉड होता त्याने असेच तुझ्यासारख्या २-३ मुलींना फसवून इथून पळून गेला आहे. तो बंगलोरला नाही तो दिल्लीला असतो. माझ्या एका दुसऱ्या मित्राकडे त्याचा नंबर आहे मी त्याच्याकडून घेवून तुला देतो. आणि त्यामुलाने त्याचा नंबर मिळवून तिला दिला. तीने समीरला कॉल केला, आणि सर्व सांगितले त्याने तीला सांगितले कि जावून abortion कर मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही आणि परत मला संपर्क करण्याच्या भानगडीत पडू नकोस...कारण हा नंबर यापुढे कधीच चालू नसेल. त्याच्या या उत्तरामुळे ती खूप shock होते आणि तशीच तिथून धावत आपल्या घरी जाते एकदा विचार करते कि घरी सर्व सांगायचं पण वडिलांच्या इज्जतीचा विचार तिच्या मनात येतो आणि ती सरळ आपल्या रूम मध्ये जावून काही कुणाशी न बोलता गळफास लावून घेते.....आणि हे सर्व संपवून टाकते.

सुजाताच आयुष्य तर असाच फुकट गेलं मित्रांनो...पण अशा सुजाता अजून होवू नये ह्याची दक्षता आपण स्वताच घेतली पाहिजे खास करून मुलींनी.

प्रेमात आंधळं होवू नका.....!!!

No comments:

Post a Comment

Read This Heart Touching Stories