Jayesh Gujrati's Blog (in Marathi): वेळ रात्रीची १ वाजून १ मिनिट......

Search

Monday, April 01, 2013

वेळ रात्रीची १ वाजून १ मिनिट......

त्या रात्री फोन खणाणला...
त्या रात्री फोन खणाणला
आवाज थोडा भारदस्त वाटला
' हेल्लो ' तही जरब जाणवत होती
थोडा अनोळखी थोडा ओळखीचा वाटला

कोण असेल बर.....
याचाच विचार करत होतो
"अरे बंड्या जागा आहेस का झोपलास "
जरा चिडूनच आवाज आला तो

मी... जागा आहे कि झोपलोय
म्हणजे स्वप्नात फोन उचलला का मी.....?
स्वतःला आरशात बघितलं... जागाच होतो मी......!
का....? आणि कोण तुम्ही....? मी विचारल.


"मी........ दादा दणके बोलतोय... रश्मीचा बाप....."
धडकीच भरणारा आवाज होता तो

रश्मीचा बाप...! म्हणजे अप्पा..!! एवढ्या रात्री...!!!
पत्र बापाला भेटलं कि काय ...........??
आईईईईईईशपथ...
आपली तर हवाच निघून गेली....

अप्पा... अप्पा अप्पा... अप्पा
माफ करा माफ करा माफ करा......
परत नाही अस करणार.....

परत नाही पत्र पाठवणार
मेसेज पण नाही करणार .....
फोनवरच बोलण तर सोडाच
साधा मिस्ड कॉल पण नाही देणार....

माग माग आता कधीच पळणार नाही
चौकात तिच्यासाठी थांबणार पण नाही....
टकामका तिच्या कडे बघन सोडाच
साधा 'डोळा' पण लावणार नाही.....

अप्पा काही बोलायच्या आतच
एका दमात माफीनामा तयार केला
आता, अप्पा काय बोलतोय म्हणून
थोडासा श्वास घेतला....

" हा...हा...हा...हा...हा...हा...हा...हा...हा..."

हसायला काय झाल.....?
.
.
.
.
.

" अरे बंड्या, मी खंड्या... साला तू तर माझा पहिलं गिर्हाईक झाला... 

 ....................एप्रिल फुल.... ..........."


( दिनांक १ एप्रिल , वेळ रात्रीची १ वाजून १ मिनिट......)


by Facebook 

1 comment:

  1. Win Exciting and Cool Prizes Everyday @ www.2vin.com , Everyone can win by answering simple questions. Earn points for referring your friends and exchange your points for cool gifts.

    ReplyDelete

Read This Heart Touching Stories