Jayesh Gujrati's Blog (in Marathi): January 2012

Search

Friday, January 27, 2012

Teddy Bear

एकदा एक मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी ती तिच्या प्रियकराची वाट बघत बसली होती.
खूप खुश होती ती ...... आज तिला तिच्या प्रियकराकडून अंगठी
मिळणार होती..... ह्या स्वप्नात ती पूर्ण रंगून गेली होती .
तेव्हड्यात तिचा प्रियकर आला ... त्याला बघून तिला खूप आनंद झाला ...... 

त्याने तिला Birthday -wish केले , आणि वाढदिवसाची भेट म्हणून
teddy bear दिला ........... teddy bear बघून ती नाराज झाली ,
कारण……………..

तिला अंगठी पाहिजे होती ..... ह्या रागात तिने तो teddy मागे फेकून दिला.
.......... रस्त्यावार पडलेला teddy पाहून तिचा प्रियकर तो teddy उचलायला
गेला आणि……………..

आणि
तेव्हड्यात मागून येणार्या गाडीने त्याला उडविले ...आणि तो जागीच मरण पावला.
हे पाहून तिच्या डोळ्यांतून मुसळधार पाउस पडू लागला .... आक्रोश करून ती रडू लागली .

......आणि तिने तो teddy घेऊन त्याला घट्ट मिठी मारली
....तेव्हड्यात त्या teddy मध्ये असलेल्या machine मधून आवाज आला कि,
"प्रिये, अंगठी माझ्या (teddy च्या) खिशात आहे,
Will you please marry me ?
 
by एक एकटा एकटाच
 

गोल्फ बॉल

आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी करावाशा वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप कॉफी हा लेख जरूर आठवून पहा :)
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले, त्यांनी येताना कही वस्तू बरोबर आणाल्या होत्या, तास सुरू झाला आणि सरांनी कही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात गोल्फ बॉल भरु लागले, ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पूर्ण भरली का म्हणून विचारले, मुले हो म्हणाली, मग सरांनी दगड खड्यांचा बॊक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले, त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणुन विचारले, मुलांनी एका आवाजात होकार भरला, सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली, बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारले, मुलांनी तबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले २ कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी कही जागा होती ती चहाने पुर्ण भरून निघाली. विद्यार्थांमधे एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले, "आता ही जी बरणी आहे तिला तुमचे आयुष्य समजा.

गोल्फ बॉल ही महत्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद - ह्या आशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सरं कही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य परिपुर्ण असेल...

दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर, कार. उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी."

"आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर गोल्फ बॉल किंवा दगड खडे ह्यासाठी जागा उरणार नाही, तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा वेळ आणि सारी शक्ती लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच रहाणार नाही. तेव्हा आपल्या सुखासाठी म्हत्वचं काय आहे त्याकडे लक्श द्या."

"आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा, मेडिकल चेकअप करुन घेण्यासठी वेळ काढा, आपल्या जोडीदाराला घेउन बहेर जेवायला जा, घराची सफाई करायला आणि टाकऊ वस्तूंची विल्हेवाट लावायला तर नेहमी वेळ मिळत जाईल, "

"गोल्फ बॉलची काळजी आधी घ्या, त्याच गोष्टींना खरं महत्व आहे, प्रथम काय करायचं ते ठरवून ठेवा बाकी सगळी वाळू आहे."

सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं,"यात कॉफी म्हणजे काय?" सर हसले आणि म्हणाले, "बरं झाले तु विचारलेस, तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे की आयुष्य कीतीही परिपुर्ण वाटले तरी मित्रांबरोबर १-२ कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते "
by एक एकटा एकटाच

दारू पिवून वाहन चालवू नका...

एक ६ - ७ वर्षाचा लहान मुलगा मॉल मध्ये आला. त्याला एक डॉल विकत घ्यायची होती पण दुकाणदार त्याला समजावत होता कि तुझ्याकडे पैसे कमी आहेत मी हि डॉल तुला नाही देवू शकत. मुलगा खूप दुखी होवून त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका बाईला विचारतो "आजी खरच माझ्याकडे कमी पैसे आहेत का? तर ती म्हणते हो बाळा तुझ्याकडे तितके पैसे नाहीत" 
हे बोलून ती तिथून निघून जाते, मुलाच्या डोळ्यात पाणी बघून मला राहवलं नाही मी त्याच्या जवळ गेलो त्याला विचारल तुला हि डॉल कशाला हवी आहे? तर तो बोलला माझ्या लहान बहिणीला हि डॉल खूप आवडली होती आणि तिला वाटतंय कि सान्ता क्रिसमसला तिला हि डॉल गिफ्ट करेल....

तर मी म्हंटल मग सान्ता देयेल ना हि डॉल तुझ्या बहिणीला, तो खूप दुखी होवून म्हणाला कि सान्ता तिकडे जावू नाही शकणार मला हि डॉल माझ्या आईकडे द्यायची आहे, कारण माझी बहिण देवाकडे गेली आहे असे बाबा म्हणाले, आणि ते बोलले कि आई पण लवकरच तिकडे जाणार आहे, आई कडे खूप कमी वेळ आहे म्हणून मी आईला बोललो आहे कि तू मी मॉल मधून येई पर्यंत थांब ....

"म्हणून हि डॉल मला आईकडे देवून ती बहिणीसाठी पाठवायची आहे...." हे बोलल्यावर माझ्या डोळ्यातून पाणी आले..... मी त्याला पटकन बोललो "तू एक काम कर ते पैसे आपण परत मोजू बघू कदाचित ते असतील बरोबर...." आणि मोजता मोजता मी त्यात कमी पडणारे पैसे माझ्या खिशातून टाकले टोटल केल्यावर मुलगा खूप खुश झाला कारण त्यात थोडे अधिक पैसे उरले डॉल विकत घेवून सुद्धा मग तो मला बोलला कि मी काल रात्री देवाकडे प्राथना केली होती कि माझ्याकडे पैसे उरावे डॉल घेवून सुद्धा कारण मला माझ्या आईसाठी सफेद गुलाब पण घ्यायचं आहे कारण माझ्या आईला ते खूप आवडतात.

आता तो मुलगा तिथून निघून गेला.. माझी खरेदी मी एका विचित्र मूड मध्ये संपवली पण काही केल्या माझ्या मनातून त्या मुलाचे विचार काही जात नव्हते. नंतर मला आठवले कि दोन दिवसापूर्वी वर्तमान पत्रात एक बातमी वाचली होती कि एका ट्रक ड्राईवरणे दारू पिवून वाहन चालवत एका रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला तिच्या लहान मुली सकट उडवले होते आणि त्यात ती लहान मुलगी जागीच ठार झाली.

ती महिला लास्ट स्टेजला आहे हे आठवल्यामुळे मला अजूनच ह्या सर्वाचा खूप मोठा धक्का बसला आणि लगेच दुसऱ्या दिवशी बातमी आली कि ती महिला मरण पावली मी लगेच पत्ता शोधून त्या महिलेच्या funeral ला गेलो तिथे गेल्या वर बघितले तर ती महिला कॉफ्फिन मध्ये होती आणि तो लहान मुलगा तिच्या हातात एक सफेद गुलाब आणि ती डोल ठेवत होता. माझ्या डोळ्यातून अश्रू काही केल्या थांबत नव्हते मनात आले कि ह्या मुलाच सर्व काही त्या ट्रक ड्राईवरणे क्षणात संपवून टाकले होते.

कृपया कोणीही दारू पिवून वाहन चालवू नका.
 
By एक एकटा एकटाच.
 

Thursday, January 26, 2012

प्रयत्न

राजू त्याच्या वडीलांबरोबर सर्कस बघायला गेला. तिकिटांच्या रांगेत असतांना त्याची नजर साखळीने बांधलेल्या हत्तीच्या पिल्लाकडे गेली.

ते हत्तीच पिल्लू जोरजोरात धडक देत तर कधी सर्व शक्ती लावून साखळी तोडण्याचा प्रयन्त करत होते, पण त्याला यश येत नव्हते.शेजारी त्याच्या आईलाही तसेच बांधून ठेवले होते पण ती स्वस्थपणे उभी होती. 
राजूची उत्सुकता वाढली.

"बाबा त्या हत्तीच्या पिल्लाला ती साखळी तोडणे कठीण आहे. पण त्याची आई ती सहज तोडू शकते ना? मग ती स्वतःची अन् तिच्या पिल्लाची सुटका का करून घेत नाही?"

राजू च्या प्रश्नावर बाबा निरुत्तर झाले, पण सर्कसच्या मनेजरने तो प्रश्न ऐकला.

"त्याच अस आहे बाळा, ह्या हत्तीच्या आईलाही ती लहान असतांना इथे आणलं गेलं. तिलाही याच साखळी ला आम्ही बांधत असू , सुरवातीला दोन महिने तिनेही सुटकेचा असंच प्रयत्न केला. तेव्हा ती साखळी तोडणे आपल्या शक्तीबाहेर आहे, अशी तिला जाणीव झाली.अन् आता मोठी झाल्यावरही तिच्या मनात तेच बिंबून गेलंय. अशा दहा साखाल्याही ती तोडू शकेल एवढी ताकद तिच्या अंगात आहे, पण पुन्हा प्रयत्न करण्याचा विचारही तिच्या मनात येत नाही. उलट तिच्या पिल्लाचे तिला हसू येत असेल."

आपलही असंच होतं. एखाद्या गोष्टीत अपयश आल्यावर 'ते आपल्याला जमणार नाही' असं मनात ठरवून चालतो.कालांतराने गोष्टी बदलतात. अन् आता आपल्याला शक्य असूनही आपण प्रयत्न करीत नाही.

म्हणूनच कुणी म्हटलंय.." तुम्ही तो पर्यन्त हरत नाही, जो पर्यन्त तुम्ही प्रयत्न करायचे सोडत नाही !"
 
by : एक एकटा एकटाच

पिझ्झा कुठ मिळतो ?

आत्ताच येताना एक माणूस भेटला. अगदी साधा, सडपातळ, जेमतेम उंची, गरीब दिसत होता, हातात सायकल होती. मला म्हणाला.....
"अवो इथ पिझ्झा कुठ मिळतो".....
त्याच्या त्या 'अवो' ने मी जरासा गोंधळूनच म्हणालो
"हा इथून खाली".
 त्याचा आवाज अगदीच घाबरा आणि कोमेजलेला होता, तो बोलतानाही अंग चोरून उभा होता. तो तेथून सायकल हातात धरून चालतच निघाला.त्याच्याकडे पाहून त्याला पिझ्झा खायची इच्छा झाली असेल असं कोणीच म्हणणार नाही आणि झाली तरी त्याच्या खिशाला ती परवडणारी नव्हतीच. म्हणजे घरात पोरगा रडत असणार, पिझ्झाच हवा म्हणत असणार,...

 
खूप वाईट वाटलं. त्याचा तो दीनवाणा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. सगळं डोळ्यापुढे येत होतं-- 'हा डॉमिनोज मध्ये जाणार, सगळे त्याला हसणार, तो कसाबसा मुलासाठी तो अपमान सहन करून पिझ्झा मागणार . तेवढे पैसे जवळ असतील तर ठीक नाहीतर मुलाचा रडका चेहरा आठवत तसाच बाहेर पडणार....

मित्रांनो आपले आई बापही असेच आपले हट्ट पुरवत असतील, कदाचित आपल्याला ते माहीतही नसेल, आई वडील असे एकमेव असतात ज्यांचा प्रेम आपल्या जन्मापासून मरणापर्यंत कधीही बदलत नाही. बाकी सगळ्यांचं प्रेम वेळेनुसार बदलू शकतं..... विचार करून पहा हवं तर......

 
स्त्रोत: निलेश केमसे.

पोट

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे...........

देवाने पृथ्वी निर्माण केली,..... तिथे राहणाऱ्या विविध प्राणी पक्ष्यांची उत्पत्ती केली. सारे नवीन,........... सगळे प्राणी पक्षी एकमेकांकडे कुतूहलाने पाहत होते, एकमेकांशी ओळख करून घेत होते.
जो तो समोर येणाऱ्या प्रत्येक जीव जनावरच्या विशिष्ट रचनेवर आश्चर्य व्यक्त करत होता. कोणाचे कान मोठे, कोणाची मान लांब, कोणी अवाढव्य तर कोणी अगदी इवलेसे.
 चर्चा, ओळख पाळख सुरु होती. आणि विशेष म्हणजे या सगळ्यानमध्ये माणूस सुद्धा होता.
माणसाकडे कुतूहलाने पाहत सगळेच म्हणत होते, "हा प्राणी फारच सुंदर आणि आपल्याहून हुशार आहे."
हे माणसाने ऐकलं आणि फार खुश झाला.

आपली स्तुती ऐकता ऐकता त्याला स्वतः बद्दल काही तरी वेगळा ऐकू आलं.......... काही हत्ती त्याच्या बद्दल बोलत होते.
न राहून त्याने एका हत्ती ला विचारल. "तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का ?"
हत्ती: "हो......... म्हणजे बघ ना, देवाने आम्हाला सर्वांना एवढा मोठ्ठा पोट दिलाय आणि तुला फक्त वितभर."
हे ऐकून सगळ्यांनीच सहमती दर्शवत म्हटले "हो, हे चुकीच आहे."
हे ऐकून माणूस नाराज झाला.

रागाने तो पुन्हा देवा जवळ गेला, आणि विचारू लागला, "देवा माझ्यावर हा अन्याय का ? त्या सर्व जनावरांना एवढा मोठ पोट दिलंस, मग मला इतका लहान का ?"

देव: "तू नको चिंता करू , मी तुला जेवढं पोट दिलंय ना ते योग्यच आहे . विश्वास ठेव."
माणूस: "नाही, ते काही नाही. तू दुजा भाव करतोयस देवा, मला हि इतरांसारखं मोठ पोट हवंय. मी नाही ऐकणार."
देव: "बर ठीक आहे, देतो मी तुला मोठ पोट. पण एक गोष्ट !"
माणूस: "काय देवा ?"
देव: "मी तुला आता दिलेलं पोट आहे ना ते आधी पूर्ण भरून ये. ते भरलं कि तू मला सांग. मी लगेच तुला मोठ पोट देईन."
हे ऐकून माणूस कुश झाला आणि आनंदाने पृथ्वीवर परतला.
पण मग पुढे काय झाल ?............................................

कित्येक वर्ष, भला मोठा काळ, चार युग लोटली, कलियुग आलं............... आणि या युगात तर माणूस खातोच आहे................. पण अजून तो देवाला सांगायला नाही गेलाय कि देवा माझ पोट भरलंय.........
काय ? पटतंय ना आजची परिस्थिती पाहून ?

 
स्त्रोत:- जयेश विसपुते.

Tuesday, January 24, 2012

संवाद

 एकदा एका साधुने त्याच्या शिष्यांना विचारले, "आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का ?". सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दीले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचीत ओरडून बोलतो." 
 यावर साधुमहाराज म्हणाले, " पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्दा आपण ओरडतो। जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरीदेखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो". यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याच उत्तराने साधुचे समाधान झाले नाही. शेवटी साधुमहाराजांनी स्वतःच उत्तर दीले. ते म्हणाले , " जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात."

"आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतीशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?" असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले," कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते. आणि जसजसे दोन व्यक्तीमधील प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतुनच किंवा देहबोलीतुनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.


शिकवण - परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतच राहतात मात्र कीतीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढु देउ नका। तसे होउ दील्यास दोन व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होइल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही.
 
By  एक एकटा एकटा

Monday, January 23, 2012

चौथा आश्रम

समुद्र किनाऱ्यावर छोटे बहिण भाऊ वाळूचं घर बनवण्यात मग्न होते...

"थांब दादा असं नाही...... इथे आपण गाडी ठेवायची." त्यांचा खेळ कल्पना पाहताना त्यांच्या आईला फार बर वाटत होत.
 "आई बघ हं, ही रूम माझी, ही ताई ची, आणि ही तुझी. किती छान आहे ना आपलं घर?" आपण बनवलेलं घर आपल्या आईला कौतुकाने दाखवत मुलगा म्हणाला. इतक्यात त्याचे बाबा मुलांसाठी आईस क्रीम घेऊन आले, आणि विचारलं "आणि माझी रूम रे? मी कुठे राहायचं ?"

निरागसपणे त्या छोट्या जीवांनी उत्तर दिलं, "बाबा तुम्हाला कशाला हवीये रूम ? तुम्ही कसं आजोबांना वृद्धाश्रमात पाठवलंत, आम्ही पण तुम्हाला पाठवणार. बाबा म्हातारे झाले कि त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात ना ?"

हे ऐकून त्या बापाला आपल्या केलेल्या कर्माची फळ दिसू लागली. विचार चक्र जोरात फिरू लागलं....... 'हे आपण काय शिकवलं?'
विचार चक्राची गती वाढत गेली आणि तो बाप चक्कर येऊन तिथेच थंड पडला.
.
.
विचार करा...... आपण जसे वागतो त्याचेच अनुकरण करत आपली पुढची पिढी घडतेय. कर्म प्रमाणे फळ मिळतंय....... सावधान व्हा!

युगान युगे चालत आलेल्या तीन आश्रमा नंतर चा हा मनुष्याने कलियुगात शोधून काढलेला चौथा आश्रम..... 'वृद्धाश्रम'.

कुठे तरी आपण सावध झालंच पाहिजे.........
 
- जयेश विसपुते.
 

Saturday, January 21, 2012

बाबा

आई बद्दल सगळेच लिहितात पण बापाबद्दल कोणीच नाही... 
आपला मुलगा/मुलगी पास झाल्यावर अगदी आनंदी होऊन आपल्या पाल्याबाबत सगळ्यांना सांगणारी आई सगळ्यांना दिसते...
पण मागून हळूच मिठाइच्या दुकानात जाऊन पेढ्यांचा box आणणारा बाप कोणालाच दिसत नाही...
 
 
पायाला कुठे छोटीसी ठेस लागली तर तोंडातून लगेच निघतं... "आई गं..." पण तेच एखादा truck समोर आला तर... "बाप रे..."
 
आई सौम्य असते... ती आपल्या भावना व्यक्त करते... बाप कठोर असतो... किंबहुना ह्या धकाधकीच्या जीवनात जगतांना त्याला कठोर व्हावंच लागतं...

पण मनात वादळ उठलेलं असतांना चेहऱ्यावर काहीच झालेलं नाही हे दाखवण्यासाठी खूप सामर्थ्य लागतं... आणि ते बापामधेच असतं....
 
 सौजन्य  : Facebook एक एकटा एकटाच
 

Friday, January 20, 2012

The Cookie Thief

एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती. थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला. कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया’त जाऊन पुस्तक वाचत बसली.
 

तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते. शेजारी बिस्किटाचा पुडा होता. तिने एक बिस्कीट खाताच त्यांनीही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले. त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला. “काय निर्लज्ज मनुष्य आहे हा! माझ्या अंगी थोडी हिंमत असती, तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!" ती मनात विचार करत होती.

दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते. आता शेवटचे बिस्कीट उरले.

“आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल, का मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?" ती विचार करत होती. “आता हे अतिच झालं” असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली.

थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली. पाहते तर काय, तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता.

आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली, याची तिला खूप लाज वाटली. एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती. तिने नजर टाकली, तर शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते.

                                                                                                                                         (The Cookie Thief - by Valerie Cox)

निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे; पण आपल्याला त्याची जाणीवच नसते. दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का? कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात.
by : Yogesh Patil (Facebook)

जीवन जगण्याची कला

एकदा न राहवून रामूने विचारलं "आजोबा...कशाला खर्च करता लॉटरीवर...! इतक्या वर्षात एकदाही लागली नाहीये....!"

आजोबा मंद हसले...आणि म्हणाले ..

"बाळा..लॉटरी लागावी म्हणून मी तिकीट नाही कधी काढत.. १ तारखेला लॉटरीच तिकीट काढला की १५ तारखेपर्यंत मी मला १५ लाख मिळाले तर काय काय करेन याची स्वप्न पाहतो. १५ तारखेला लॉटरी लागली नसली की पुन्हा १ रुपयाचं तिकीट काढतो.. आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत स्वप्न पाहतो...! असा २ रुपयात माझा प्रत्येक महिना छान जातो...! "
 

"बाळा ही स्वप्नच मला जगायची उमेद देतात...... स्वप्नात मी तुझ्या आज्जी बरोबर सगळे देश फिरून येतो... रोज सकाळी लंडनमधे तर रात्री पॅरीसच्या टॉवरवर आम्ही कॉफी घेतो... जिवंतपणी आजीला कधी मुंबईला पण नेऊ शकलो नाही.. पण आता मात्र तिला सगळीकेडे नेतो... तिला हव ते घेऊन देतो... कालच मला म्हणाली की "जीन्स ची पॅंट आणून द्या...!" दुसर्याना त्रास न देता मनातल्या-मनात स्वप्न बघितली तर काय वाईट...?"

रामू म्हणाला... "आजोबा पण स्वप्न मोडली की त्रास नाहीका होत...?"

आजोबा म्हणाले.. "अरे.. मग लॉटरी लागेपर्यंत वाट पाहायची आणि वाट पाहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून नव-नवीनस्वप्न बघायची... २ रुपयात.. महिना छान घालवायचा..."
 सौजन्य  : Facebook एक एकटा एकटाच 

आई

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते,  उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊली बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले, तितक्यात मुलगा शाळेतून आला आई ला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन.


मुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले, मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो

माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई ला म्हणाला "मला लवकर दुध आणि भाकरी दे मला उशीर होतोय." आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच सापडत नव्हते पुन्हा मुलाचा आवाज आला "आई लवकर कर" माउलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या हाताची लाही लाही झाली, पुन्हा मुलाचा आवाज आला "आई लवकर कर न उशीर होतोय" त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले, त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली. आई ने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले.


मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आई ने विचारले "बाळा जत्रेत काय-काय पहिले" मुलाने जत्रेतल्या गमती-जमती सांगितल्या मग आईने विचारले "दिलेल्या १० रुपयाचे की केलेस काही खाल्लेस कि नाही."

 
त्या मुलाने आई ला सांगितले की "तू डोळे बंद कर मी काहीतरी आणले आहे तुज्यासाठी" माऊलीने डोळे बंद केले मुलाने खिश्यातून सांडशी (गरम भांडे उचलायची पक्कड ) काढून आईच्या हातात दिली, आईच्या डोळ्यात त्या सांड्शीच्या स्पर्शाने अश्रू आले

 
आई धन्य झाली.....आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर इजा करून गेली
 
सौजन्य : Yogesh Patil (Facebook)

हर घडी बस तेरा चेहरा




हाल कुछ ऐसा है अपना,
लगता है जैसा कोई सपना,
था मैं तनहा इस सफ़र में,
अब कोई बन गया है अपना,

       साथ तेरा पाके ओ जाना,
       ख्वाब पूरे हो गए हैं,  
       हर घडी बस तेरा चेहरा,
       बस वही लागे है अपना…




Thursday, January 19, 2012

वफा





जाने क्या सोच के लहरें साहिल से टकराती हैं
और फिर से लौट जाती हैं..
 
    समज नहीं आता के वोह किनारों से बेवफाई करती हैं
    या फिर लौट के समंदर से वफ़ा निभाती हैं…


Tuesday, January 17, 2012

छान प्रेमकथा



एक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही सुंदर तिची आपल्या नवर्यावर प्रेम करण्याची पद्धत होती, जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात असे तेव्हा तेव्हा ती रोज एक गुलाबाचे फुल आपल्या नवर्याला पाठवत असे, आणि जाणवून देत असे कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच आहे ...
 
ती दुसरीकडे असताना तिच्या रोज येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखद सवय झाली होती. पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे सुंदर प्रेम देवालाही आवडले असावे म्हणून कि काय पण देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले, तिच्या विमानास अपघात झाला आणि बिचारी आपले प्राण गमावून बसली .....................

हि बातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कोणी एवढे रडले नसेल ...

... पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता सुरु झाले होते, तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते.... 


हे बघून तिचा नवरा आश्चर्य चकित झाला व ह्या मागाचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणार्या मुलास विचारले
तिचा नवरा :- तुला हे फुल कोण देत नक्की, माझी बायको मरून १५ दिवस झाले तरी तू रोज फुल आणून देत आहेस, नक्की प्रकार काय आहे ?
मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप प्रेम करते, तिची विचारशक्ती खूप पुढची होती, म्हणून तिने आधीच विचार करून ठेवला होता कि, "जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण प्रेमाला कधी संपवायचे नाही" आणि ह्या विचाराने तिने मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत जेणे करून आयुष्यभर ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल .... आणि तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव करून देईल....

Read This Heart Touching Stories