Jayesh Gujrati's Blog (in Marathi): Comedy

Search

Showing posts with label Comedy. Show all posts
Showing posts with label Comedy. Show all posts

Tuesday, March 13, 2012

मैत्र जीवांचे

कधी कुठुन तो येईल आणि कचकचुन चावेल याचा नेम नव्हता. अख्खी रात्र अशीच घाबरत, या कुशीवरुन त्या कुशीवर काढली. झोप अनावर झाली होती पण.. खोलीत कुठेतरी तो आहेच... या नुसत्या कल्पनेनेही अंगावर काटा उभा राहीला होता. त्या पुर्वी त्याला इतक्या स्पष्ट, जवळ कधीच पाहीला नव्हता. पण काल रात्री मात्र.... एकाचे दोन.. दोनाचे चार... मग मात्र मला आणि माझ्या मैत्रीणीला हातात चप्पल घ्यावी लागली. 
 इतक्या महिन्यानंतर गप्पा रंगात आलेल्या असताना रंगाचा भंग करायला तो अचानकच कुठुन तरी यायचा. पहाटे पाच-सहा पर्यंत हा चोर-पोलिसाचा खेळ चालुच होता. माझ्या आयुष्यात मी त्याला काल प्रथमच पाहिलं. पण रात्रभर त्याला आणि त्याच्या फ़ौजेला शोधाशोधीच्या त्रासाचीही नंतर गंमत वाटु लागली. सकाळी पाच - सहा नंतर मात्र तो आणि त्याची फ़ौज बहुदा दमुन झोपली. तसंही बर्याच जणांची आम्ही रात्रभर पाण्यात टाकुन, चप्पलेने वगैरे कत्तलच केली होती. पण पहाटे पर्यंत आम्ही लढवलेली खिंड उद्या नक्कीच "पेस्ट कंट्रोल" वाल्या काकांच्या हाती द्यायची असं एकमताने ठरवुन... "ढेकुणां" बरोबरची लढाई आम्ही संपवली.
माझं घर कोकणात असल्यामुळे, जन्मापासुन १८-१९ वर्षांत घरातील, उंदीर, घुस, पाल, डोंगळे, आधेलं, विंचु, इंगळी, गोम (घोण), नाकतोडा, रातकिडा, वेगवेगळे किटक..इत्यादी प्राण्या-पक्ष्यांशी दोस्ती झाली होती. वेगवेगळ्या ऋतुंमध्ये ही मंडळी हमखास घरी भेटायला यायची. अजुनही पेस्ट कंट्रोल नावाचा प्रकार तिकडे वापरात आला नसल्यामुळे... आलेल्यांचं स्वागत आणि गेलेल्यांचे आभार मानुन सगळे गुण्यागोविंदाने राहात होतो. (पाहुण्यांसाठीही हेच लागु होतं.) पण या आमच्या ग्रुपमध्ये "ढेकुण" मात्र नव्हता. काल एकदाची त्याचीही चांगलीच ओळख झाली. "घर आमचं पण आहे!" हे वाक्य हे सगळेजण वारंवार मला जाणवुन देतात. तेव्हा... "नांदा पण सुखाने आणि जगा व जगु द्या!" हे एकच वाक्य म्हणण्याशिवाय गत्यंतर राहात नाही.


(सुचना: पुर्ण आयुष्य शहराच्या झगमगाटात आणि फ़िनाईल ने पुसलेल्या चकचकीत फ़रशांवर गेलेल्या व्यक्तींना कदाचित हे वर्णन रुचणार नाही. परंतु, कोकणातील शेणाने सारवलेल्या जमीनींना, मातीने लिंपलेल्या भिंतींना आणि तिथल्या घरगुती प्राणीसंग्रहालयाला ज्यांनी अनुभवलं आहे.. अशांना नक्कीच हे सर्व प्राणी ’मैत्र जीवांचे!" वाटतील यात शंका नाही.)
 
by-मुग्धा माईणकर

Thursday, March 08, 2012

Friends Forever...

संध्याकाळचे ५ वाजलेत. सर्वजण वैभवच्या 'रूम' वर. अभ्यास करून कंटाळलेत.... चहा करण्यासाठी दुध आणायच आहे. तेव्हाचा हा प्रसंग...
सागर नेहमीच कोणाची ना कोणाची नक्कल करत. कधी हैद्राबादी बोले तर कधी खानदेशी किंवा अजून काही. पण एकदा भूमिका घेतली की शेवटपर्यंत त्यावर मजबूत पकड. आज त्याच्या अंगात श्रीमंत पेशवे संचारलेले.  विशाल बेडवर कसलीशी कादंबरी वाचत पडला आहे. सुश्या जरनल पूर्ण करत बसला आहे. बाकी सगळे काही ना काही लिहीत बसले आहेत....


वैभव:- ए विशल्या, दुध आण जा....
विशाल:- मी नाही जाणार. मी पुस्तक वाचतोय... (खुपच गंभीर पणे पुस्तक वाचतोय अशा दिखाव्यात )
वैभव:- जा रे, त्या दुकानवाल्या मारवाड्याची पोरगी चिकनी आहे...
सागर:- (श्रीमंतांच्या स्टाईल मध्ये) जा विशालपंत. मारवाड तुम्ही काबीज करणे अशी श्रींची... सॉरी-सॉरी श्रीमंतांची इच्छा आहे.. (चुकून १६०० मध्ये गेला हा....)
 विशाल:- बघ मग पोरगी म्हणाल्यावर मी लगेच येणार नाही..
वैभव:- तु असा किती वेळ टिकणार रे झंगुर.....(हश्या....)
सागर:- पंत, म्हणजे आमच्या कानी आले ते सत्यच आहे तर.... आपण दोन 'बा' साठी काहीही करू शकता??? (तेवढ्यात कोणी म्हणाल 'बाई' आणि 'बाटली' रे)
सुश्या:- तो बाई प्रकरणातच एवढा गुंतलाय, बाटली पर्यंत जाईल अस काही वाटत नाही.
विशाल:- अशा खाजगीतल्या गोष्टी सभेत मांडू नये श्रीमंत, मी जातो पण ह्या वैभ्यावर एक लाथ घाल.
(सागर वैभवच्या पृष्ठभागावर जोरात लाथ घालतो. वैभव 'आयो आयो' करत 'भ' ची बाराखडी चालू करतो)
सागर:- (त्याच्या शिव्यांना प्रत्युतरही ऐतिहासिक भाषेत ) खबरदार अपशब्द वापराल तर... आम्ही तुमच पानिपत्य करू...
सुश्या:- (लिहिता लिहीताच खाली मान घालून ) पानिपत्य नाही पारिपत्य.... हा पहिला बाजीराव की दुसरा रे?????
सागर:- कोणता का असेना, श्रीमंत मिन्स श्रीमंत... नो क़्वेस्शन.... (मग वैभवला उद्देशून) अरे त्या काळात राजांनी कानाखाली मारली तरी देव प्रसन्न झाला असे समजायचे....
विशाल:- तू ह्याच्या कुठे लाथ मारलीस??? मग ह्याला 'कामदेव' प्रसन्न होईल... (सगळे हसायला लागतात)
वैभव:- (सगळ्यांचा आपल्यावरील हल्ला वाचवण्यासाठी विषय बदलून) ए तो सुश्या सुमडीत बसलाय. जा दुध आन सुश्या...
सुश्या:- पैसे नाहीयेत राव सुट्टे, बघ.. (सुश्याच्या पाकिटात सुटे १० ची नोट सापडते).. ए ती नाही, ती लकी नोट आहे. ट्रेन मध्ये एका
छक्क्याला दिली तर त्याने ('त्याने' म्हणाव की 'तिने' या गोंधळात) परत दिली... म्हणाला -'ले, आज तक किसी को वापस नाही दिया'... तेव्हापासून माझं पाकीट नेहमी भरलेल असतं... (छाती फुगवून)
(सगळेजण माना वळवून, गंभीरपणे त्याचा किस्सा ऐकत असतात. तेवढ्यात ती शांतता भंगत....)
विशाल:- बरोबर पूर्ण ट्रेन मध्ये त्याने आपला माणूस बरोबर ओळखला (सगळेजण सुश्यावर हसायला लागतात. सुश्या गुपचूप दुध आणायला जातो... दारापाशी गेल्याबर मागे वळून...)
सुश्या:- अरे अजून दहा द्या, हे कमी पडतील.
वैभव:- अरे एकदा 'टाळी' वाजव ते सुद्धा परत येतील....... (लोळून लोळून हसत....)
 
by: निलेश (Facebook)

Wednesday, March 07, 2012

शाळेतलं प्रेम ?

शाळेत असतान मीही एकदा पडलो होतो प्रेमात
कळलंच नाही, 'काय बघितलं होतं कुलंकर्ण्याच्या हेमात?
कुलंकर्ण्याची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं
नाकावरती सोडावॉटर आणि मागे वेण्या दोन
 
वारं आलं तर उडून जाईल अशी तिची काया
रूप पक्क काकूबाई... पण अभ्यासावर माया
गॅदरिंगमध्ये एकदा तिनं गायलं होतं गाणं
तेव्हापासून तिच्या घरी वाढलं येणं जाणं
नारळीपौर्णिमेला तिनं मला नारळीभात वाढला होता
हातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला होता
नको त्या वयात प्रेम करायची माझी मस्ती जिरून गेली
शाळेमधील प्रेमकहाणी शाळेमध्येच विरून गेली
थोड्याच दिवसांत वेगळं व्हायची वेळ आमच्यावर आली होती
मित्रांकडून कळलं, हेमाच्या वडीलांची बदली झाली होती
पुलाखालून दरम्यानच्या काळात बरचं पाणी वाहून गेलं
पुढं हेमाचं काय झालं? हे विचारायचंच राहून गेलं
परवाच मला बाजारात अचानक हेमा दिसली
'ओळखलंच नाही मी..' म्हटल्यावर खुदकन गालात हसली
आईशप्पथ सांगतो तुम्हाला तिच्यात काय बदल झाला होता
चवळीच्या शेंगेला जणू आंब्याचा मोहोर आला होता
लग्नानंतर पाच वर्षात हेमा गरगरीत भरली होती
मागे उभ्या नवऱ्याने हातात भाजीची पिशवी धरली होती
सोडावॉटर जाऊन आता कॉन्टॅक्ट लेन्स आले होते
कडेवर एक आणि हातामध्ये एक असे दोन प्रिन्स झाले होते
मंगळसुत्र मिरवत म्हणाली, "हे आमचे हे"
"बराच वेळ हात अवघडलाय जरा भाच्याला घे"
बरं झालं बरोबर मी माझ्या बायकोला नेलं होतं
माझ्या प्रेयसीनं नवऱ्यासमोर मलाच 'मामा' केलं होतं
म्हणून, आयुष्यात माणसाने कधी चुकू नये नेमात
शाळेत असतान मीही एकदा पडलो होतो प्रेमात......
Source : unkown

Saturday, February 25, 2012

आपण कोण-कोण झाला आहात ?

 एका झाडा खाली पोपट वाघ आणि डुक्कर राहत आसतात, त्यांची खूप मैत्री होती, ते एक मेका शिवाय राहू शकत नव्हते, एके दिवशी वादळ आल, आणि त्या वादळामध्ये झाड कोसळून खाली पडले, आणि या प्रसंगा मध्ये पोपट मरण पावले. आपला मित्र मरण पावल्यामुळे वाघ आजारी पडला आणि त्या आजारात त्याचा मृत्यू झाला. आपले दोन्ही मित्र मरण पावल्यामुळे डुक्कर सुद्धा त्या परीस्तीतीत जिवंत राहू शकत नव्हता, आणि त्याने सुद्धा त्या ठिकाणी आपले प्राण सोडले.
     ..खूप दिवसांनी ज्या ठिकाणी पोपट वाघ आणि डुक्कर मरण पावले होते  त्या ठिकाणी एक ''मव्हाचे'' झाड रुजू लागले. पुढे मव्हाच्या झाडापासून मानवाने ''दारू'' बनवली. .. आणि म्हणूनच. ज्या वेळी माणूस दारू पितो त्यावेळी पहिले तो पोपट  होतो ..आणि पोपटा सारख बोलू लागतो. 
थोड्या वेळाने तो वाघ होतो..आणि कुणालाच मग तो ऐकत नाही, मीच मोठा-मोठा असे तो करतो. सगळ्यात शेवटी तो डुक्कर होतो.. आणि मग ज्या प्रमाणे डुक्कर चिखलात लोळतो त्याच प्रमाणे तो रस्तावर, गटारात लोळतो....
... आपण आता पर्यंत कोण कोण झाला आहात ?

Thursday, February 23, 2012

पोपट...

मी, ती आणि आपली नेहमीचीच बस..... छोटीशी प्रेम कथा
सकाळी ७.५० च्या बसमध्ये मी नेहमी प्रमाणे चढलो..
तिकीट काढल सगळ झाल आणि वरच्या दांडीला लटकलो
इकड तिकड बघताना सहज तिच्यावर नजर गेली..
शब्द नाहीत, smile नाही direct काळजाला जाऊन
भिडली...

तिच्याकडे बघून मग मी एकटा मनाशी हसायचो..
तिला दिसू नये म्हणून ते smile ओठातच ठेवायचो...
अस रोज घडता घडता माझ smile तिला दिसलं
ओळख नाही पाळख नाही तिन पण आपल्याला smile दिलं..
क्षणात मनाच्या मोराचा झकास पिसारा फुलला....
तीच ते हसू बघून दिल garden garden झाला...
दुसऱ्या दिवशी धाडस करून मी तिच्याशी बोललो
बोलता बोलता मी चक्क तिच्या प्रेमातच पडलो ..
हळू हळू ती रोज माझ्यासाठी जागा धरायला लागली..
मग ती कस तिकीट काढणार?
म्हणून तिकीटाची जबाबदारी माझ्यावर आली..
अस होत होत चहा झाला कॉफी झाली..
दोन पिक्चर झाले तिच्या birthday ची party झाली..
म्हंटल तिला आता आपल्या मनीच गुज सांगाव
तिचा होकार येताच तिला आपल्या मिठीत घ्याव ..
म्हणून दुसऱ्या दिवशी ग्रीटिंग card नी गुलाबाचं फूल
आणलं..
नवीन शर्ट घालून तिच्या शेजारी स्थान ग्रहण केल..
तिला ग्रीटिंग देणार तेवढ्यात तिन हातात
पत्रिका ठेवली
म्हणाली "२३ ला लग्न आहे कालच engagement
झाली "
म्हणल च्यायला नेहमी आपलाच का असा पोपट होतो?
कुणावर प्रेम केल कि त्याचा नेहमी असा का शेवट होतो?
सगळ मनात ठेवून मग तीच अभिनंदन केल
आता उद्यापासून नाही म्हणून तीच शेवटच ticket काढलं..
२३ ला आठवणीने तिच्या लग्नाला गेलो
तिला आणि तिचा नवऱ्याला दोघांना congrats करून
आलो.
…………………
आता मी रोज तसाच बसने जातो एकट्याच ticket काढतो
जागा मिळाली तर बसतो नाहीतर दांडीला लटकतो
पण कुणीही बघून हसलं तरी मुळीच हसत नाही
आणि जागा मिळाली तरीही मुलींजवळ बसत नाही...

Thursday, February 09, 2012

कुणाचा मृत्यू अत्यंत भयानक तऱ्हेने झाला?

दोन जण स्वर्गात जाण्याच्या रांगेत उभे होते. यमाने त्यांना थांबवित म्हटले, ''स्वर्ग जवळपास फुल झालेला आहे त्यामुळे तुम्हापैकी ज्या कुणाचा मृत्यू अत्यंत भयानक तऱ्हेने झाला आहे अशालाच मी आत सोडणार आहे ... तर तुम्ही तुमची कहानी सांगा... आणि त्यावरुन मी ठरविन तुम्हाला आत सोडायचे आहे की नाही ''

पहिला माणूस आपली कहानी सांगू लागला,
''एवढ्यात मला माझ्या बायकोवर संशय होताच... की तीचं कुठंतरी दुसरीकडे लफडं चालू असावं... म्हणून आज मी लवकर घरी आलो होतो की जेणेकरुन तिला रेड हॅन्डेड पकडावं... जेव्हा मी माझ्या 25 व्या मजल्यावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये गेलो... घरात काहीतरी मला खटकलं... पण घरात सर्वत्र शोध घेतला तरी कुणी सापडलं नाही... शेवटी मी बाल्कनीत गेलो आणि तिथे मला तो माणूस सापडला होता तो बाल्कनीत रेलींगला लोंबकळत होता... 25 मजले जमिनीपासून वर!... त्याला पाहताच माझा दिमाग सटकला आणि मी त्याला मारायला लागलो... हाताने पायाने सर्व प्रकाराने मी त्याला मारायला लागलो पण तो साला खाली पडतच नव्हता... शेवटी मी घरात परत आलो, एक हातोडा आणला आणि त्याच्या बोटांवर मारायला लागलो... तो काही जास्त वेळ ते सहन करु शकला नाही आणि तो खाली पडला... पण 25 व्या मजल्यावरुन पडूनही खाली तो एका झुडपात पडला आणि वाचला... माझं डोकं अजुनच सटकलं... मी किचनमध्ये गेलो आणि फ्रिज उचलून वरुन त्या माणसाच्या अंगावर टाकला... तो फ्रिज बरोबर त्याच्या अंगावर पडून तो जागच्या जागीच मेला.. पण तोपर्यंत माझा राग आणि ताण एवढा जास्त झाला होता की मीही हार्टअटॅक येवून बाल्कनीवर तिथल्या तिथेच मेलो..''

'' अरेरे ... तुझ्यासाठी आजचा दिवस फारच वाईट ठरला ... नाही?'' यम त्या माणसाला म्हणाला आणि त्याने त्याला आत घेतले.

रांगेतला दुसरा माणूस पुढे येताच यमाने त्यालाही तेच स्वर्ग जवळपास भरल्याचे सांगितले आणि त्याला त्याची कहानी सांगायला सांगितली.

दुसरा माणूस त्याची कहानी सांगायला लागला -

''आजचा दिवस माझ्यासाठी फारच चमत्कारीक होता... काय झालं मी 26व्या फ्लोअरवर माझ्या अपार्टमेंटमधे राहतो आणि रोज सकाळी मी माझ्या बाल्कनीत व्यायाम करीत असतो... पण आज काय झालं... मी व्यायाम करतांना घसरलो असेन किंवा तसंच काहीतरी ... कारण मी माझ्या बाल्कनीच्या काठावरुन खाली पडलो ... पण माझं नशिब चांगलं माझ्या खालच्या फ्लोअरच्या बाल्कनीचं रेलींग माझ्या हाताला लागलं... मला माहित होतं की मी असा जास्तवेळ लटकत राहू शकणार नाही... तेवढ्यात अचानक हा माणूस बाल्कनीत आला... मला वाटलं की चला आता हा आपल्याला वाचवणार .. पण तो साला मला लाथा बुक्याने मारायला लागला.. मी आटोकाट प्रयत्न करुन रेलींगला धरुन लटकत होतो पण तेवढ्यात हा साला आत गेला आणि हातोडा घेवून येवून माझ्या बोटांवर हातोड्याने मारायला लागला... शेवटी माझे हात सुटले आणि मी म्हटलं जावूद्या आपण काही आज वाचत नाही ... पण पुन्हा मी लकी ठरलो आणि खाली एका झुडपात पडलो... घाबरलो होतो पण मला विषेश लागलं नव्हतं... जेव्हा मी विचार करीत होतो की आपण ठिक आहोत... तेवढ्यात एक रेफ्रिजरेटर वरुन खाली माझ्या अंगावर पडलं ... आणि मी इथे पोहोचलो''
by: एक एकटा एकटाच

Read This Heart Touching Stories