Jayesh Gujrati's Blog (in Marathi): Father

Search

Showing posts with label Father. Show all posts
Showing posts with label Father. Show all posts

Thursday, May 03, 2012

तो बाप असतो


बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो
औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो
पैश्याची जुळवाजुळव करतो
तो बाप असतो



सगळ्यांना ने आण करतो
स्वयंपाक हि करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,
म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो

तो बाप असतो
 

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो

तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो, होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो

तो बाप असतो

स्वतः टपरा मोबाईल वापरून, तुम्हाला stylish मोबाईल घेऊन देतो
तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो

तो बाप असतो

love marriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का?" अस ऐकल्यावर खूप रडतो
 तो बाप असतो
 

जाताना पोरगी सासरी,धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
तो बाप असतो

Tuesday, March 27, 2012

औषधं

मुलगा नुकताच ऑफिस मधून थकून घरी आलेला. त्याच्या वडिलांना दम्याचाआजार असतो, ते विचारतात “बेटा माझे औषधं आणली काय, काल पासून संपली आहेत.” … …

मुलगा : “मी आज खूप थकून आलोआहे, मी उद्या घेवून येईन.”
 
 बाप: “ठीक आहे बेटा तू आराम कर, खूप थकला असशील..!”

(रात्री अचानक त्याच्या वडिलांना त्रास सुरु होतो… घरी औषधं नसल्यानं त्यांना दवाखान्यात नेई पर्यंत त्यांचा मृत्यू होतो…)


काही दिवसांनंतर मुलाला त्याच्या रूम ची सफाई करतांना जुनी डायरी सापडते. ती त्याच्या वडिलांची असते.

त्यात त्याला ३० वर्ष अगोदरची एक लिहिलेली नोंद सापडते, ती असते..  “आज माझ्या सोन्याला ताप आला होता, ‘Taxi’ न मिळाल्यामुळे व दवाखान्याची लिफ्ट बंद असल्यामुळे त्याला खांद्यावर नेतांना थोडा त्रास झाला, पण माझं बाळ आता शांत झोपी गेला आहे.." (वेळ : रात्री २ वाजता..)

त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण … आता सर्व संपले होते.

प्लीज नेवर हर्ट युअर पॅरेंटस… व्हाटेवर यु आर… इज ओन्ली बिकोझ ऑफ देम…!
by: एक एकटा एकटाच

Monday, March 26, 2012

Servants

"कोल्हापूर जवळील एका छोट्या खेड्या मध्ये न शिकलेले आई वडील शेतामध्ये मोलमजुरी करून आपला संसार चालवीत होते, पण मुलाने मात्र भरपूर शिकून मोठे व्हावे, ह्यासाठी त्याला मुंबई मधील महाविद्यालायात शिक्षणास पाठवितात ......  
 काही दिवसांनी आपल्या मुलाला भेटायला ते दोघे मुंबईला जातात व जाताना मुलाच्या आवडीची आईच्या हाताची चटणी-भाकर ते घेऊन जातात.  
महाविद्यालयात गेल्यावर त्यांना अतिशय साध्या कपड्यांमध्ये बघून त्या मुलाची प्रेयसी विचारते 
"Who are they ?
मुलगा म्हणतो
"They are the servants from my village !!!" ते 
ऐकून आई वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात ... 
का?  तर आपलां मुलगा इंग्रजी बोलायला लागला म्हणून... 
 
BY: एक एकटा एकटाच
 

Thursday, March 22, 2012

नाती रक्ताची



लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|

लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|

बाबा, लव्ह यू

एकदा एक माणूस नवी कोरी कार धूत होता. अगदी मन लावून त्याचे काम चालले होते. तिथेच... असलेली त्याची चार वर्षाची मुलगी दगड घेऊन काही तरी करत होती. 

थोड्यावेळाने त्याने पाहिले तर ती टोकदार दगड घेऊन त्या गाडीवर काही तरी लिहीत होती. त्याचा संताप अनावर झाला. "केलास सत्यानाश?" असं म्हणत संतापाच्या भरात त्याने जवळची एक काठी घेतली आणि मुलीच्या बोटांवर मारली. चार वर्षाची चिमुरडी बिचारी कळवळून रडायला लागली.

काठीच्या मार एवढा जोरात होता की तिच्या नाजूक हाताची बोटे फ्रॅक्चर झाली. तातडीने तिला हॉस्पिटलमधये एडमिट करावं लागलं. वडिलांनी मारलं तरी मुलगी मात्र त्यांच्यावर रागावली नव्हती. 
"बाबा, माझी बोटं पुन्हा चांगली कधी होणार" असं ती त्यांना विचारत राहिली.

तिचे वडिल काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून फक्त आपल्या कृत्याचा पश्चात्ताप तेवढा वहात होता. त्यांना स्वतःच्या कृतीवर संताप आला. आपण गाडीच्या प्रेमापोटी आपल्या मुलीला मारले हे त्यांना सहनच झाले नाही.

त्याच भरात ते गाडीजवळ गेले आणि तिच्यामुळे हे घडले म्हणून त्या नव्या कोर्या गाडीवर लाथा झाडायला लागले. थोड्यावेळाने त्यांचे लक्ष
गाडीवर लिहिलेल्या अक्षरांवर गेले. त्यांच्या मुलीने तिथेच काही तरी खरडलं होतं. त्यांनी जवळ जाऊन नीट पाहिलं. त्यावर त्या मुलीनं लिहिलं होतं, 
"बाबा, लव्ह यू"

Monday, February 27, 2012

तासाला किती कमवतो ?

एक नोकरदार माणूस रोजसारखा घरी आला... रोजसारखाचं उशीरा... त्याचा मुलगा सहा-सात वर्षाचा;  त्याची वाटचं पहात होता अगदी रोज पहातो तशीचं... 
तो घरात आला त्याचा मुलगा त्याच्या कडे पाहात होता... तो म्हणाला "काय रे काय झाले ? असा का पहातो आहे"
मुलगा म्हणाला "बाबा , एक प्रश्न विचारु का ?"
काहीसा त्रासिकपणे "हो विचार"
मुलगा "बाबा तुम्हाला एक तास काम केल्यावर किती पैसे मिळतात"
माणूस रागात "तुला काय त्याचे देणे घेणे ?? असे काही पण काय विचारतो ?"
मुलगा "सहज विचारले . सांगा ना... एका तासाला किती पैसे मिळतात ?"
माणूस वैतागून "तुला ऐकायचेच आहे ना... तासाला १०० रुपये"
मुलगा "असं का" काही क्षण गेले "बाबा माला ५० रु. द्या ना"
आता तो माणूस अगदि चिडलाचं... मुलावर ओरडला "असं का हे कारण होतं म्हणून तुला पैसे पाहीजे आहेत... म्हणून इतकी विचारपूस करतो का... खेळने घ्यायचे असेल काही त्या पैशांचे, नाही तर उधळपट्टी करणार असशील मी मर मर मरतो काम करतो आणि तु असा पैसा उधळतो, स्वार्थी  कुठला बापाची काळजी नाही कसली वरुन
मला विचारतो म्हणे तासाला किती कमवतो मी.... असे म्हणून त्याच्या एक कानात वाजवतो...
 
मुलगा हिरमुसला त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आले तो आतल्या खोलीत गेला... माणूस ही जरा रागातचं होता बसला थोडा... मुलाचे शब्द डोक्यातचं घोळत होते असे कसे तो विचारतो मला तासाला किती कमवतो... पहाता-पहाता तास दोन तास निघून गेले... माणसाचा राग बराचं शांत झाला पण अजूनही मनात तेचं शब्द ...
"तासाला किती कमवतो"
 
असे का विचारले असे कधी विचारत नाही तो त्याला नक्की काय म्हणायचे होते ... त्याला काही पाहीजे आहे का... त्याला पैसे लागणार असतील... उगाचं चिडलो इतका असे म्हणून तो खोलीकडे वळला... दार उघडले
"बाळा झोपला का रे" माणूस म्हणाला
"नाही बाबा मी जागाचं आहे" मुलगा उत्तरला
"अरे बाळा रागवला का रे, मी तुला मारले ना ...
अरे तेव्हा मी कसा इतका चिडलो समजलेचं नाही , घे हे ५० रु."
मुलगा उठून बसला गोड हसला आनंदाने म्हणाला
"बाबा खरचं देता आहेत"
असे म्हणून ते ५० रु. घेतले मग त्याने उशी खालून अजून ५० रु. काढले माणसाने पाहीले की मुलाकडे तर आधीचं पैसे आहेत नेमके तीतेकेचं
मुलगा पैसे मोजत होता मग त्याने वडीलांकडे पाहीले हा परत थोडा चिडला
"अरे तुझ्या कडे आहेत ना पैसे "
"पण पुरेसे नव्हते" मुलगा उत्तरला "पण आता झाले"
पुढे म्हणाला "बाबा, तुम्ही दिलेले ५० रु आणि मी जमवलेले पैसे हे तुम्ही घ्या पूर्ण १०० रु आहेत... माणूस गोंधळला काय चालले आहे त्याला कळतचं नव्हते मुलगा असा काय वागतो आहे... मुलगा पुढे म्हणाला
"बाबा माला तुमचा एक तास हवा आहे, उद्या घरी एक तास लवकर या मला तुमच्या सोबत जेवायचे आहे उद्या माझा वाढदिवस आहे..."
माणसाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होते... त्याने मुलाला मिठीत घेतले... मुलगाही अगदी सुखावला  बाबांनी त्याला फार दिवसांनी असे मिठीत घेतले होते... 
ही गोष्ट त्यांच्यासाठी एक short reminder आहे जे नेहमी काम-काम आणि कामचं करतात करियर, पैसा कमवायच्या धडपडीत बरेच काही आहे ज्यापासून दुरावत आहेत .जमलंचं तर थोडा वेळ त्यांच्यासाठीही काढा जे आपल्या सहवासासाठी असुलेले आहेत आपला परिवार आपले नातलग मित्र मैत्रीणी सारे आपल्यावर प्रेम करतात आणि त्यांना फक्त थोडा वेळ  पाहीजे आपल्याकडून बाकी काही नाही... जमलंचं तर थोडा विचार करा...

Thursday, February 09, 2012

राग

एकदा एक माणुस ऑफिसमध्ये Boss खुप रागावले म्हणुन तडकाफडकी Half day सुटुन बसने घरी जायला निघतो.

बसमध्ये जेमतेम 10-12 जण असतील , तो रिकामी Seat पाहुन Tension मध्येच बसतो
पुढच्या Stop वर एक माणुस आपल्या दोन चिमुरड्यांसह त्या व्यक्तीच्या पुढच्या Seat वर येवुन बसतो.
 
ती लहान चिमुरडी मग बसमध्ये खुप धिंगाणा घालु लागतात, खिडकीच्या बाहेर डोकावुन मोठमोठ्याने ओरडतात, मध्येच भुक लागली म्हणुन रडकुंडलीला येतात .

त्या मागच्या Seat वर बसलेल्या व्यक्तीला याचा खुप राग येऊ लागतो, खुप वेळेस समाजावुनही ती मुले शांत होत नाहीत ते पाहुन तो त्यांच्या वडिलावर ओरडतो "सांभाळता येत नसेल मुलानां तर कशाला ऊगीच जन्माला घालताओ अशी मुलं ????"

त्यावर तो माणुस शांत पाणीदार डोळ्याने म्हणतो, " तुमच्या भावना मी समजु शकतो साहेब , पण या चिमुरड्या जीवाला कसं समजावु कि तुमची 'आई' या जगामध्ये नाही आता .., थोडयाच वेळापुर्वी तिच्यावर हॉस्पीटलमध्ये अंत्यसंस्कार करुन घरी निघालोय आम्ही. .
यावर त्या दुसर्या माणसाची मान शरमेने त्यापुढे झुकली...

MORAL :- कधीही समोरच्या माणसाच्या भावना लक्षात घेवुनच वर्तन करत जा.
 
by: एक एकटा एकटाच 

वाढदिवस

एका लहान मुलाचा वाढदिवस असतो...
तो त्याच्या वडिलांना विचारतो,
"बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला असे जुने कपडे का घातले आहेत???"
तेव्हा त्याचे वडील म्हणाले :
"कारण माझ्या कडे तितकेच पैसे आहेत बाळा कि मी एका साठीच कपडे घेवू शकतो ...
आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे घेण महत्वाचा आहे...."

२० वर्षांचा काळ लोटला
आता वडील मुलाला विचारत होते
"अरे तू सगळी रक्कम जमा का करत आहेस आणि जुनेच कपडे घालून फिरतोस..."

मुलगा म्हणाला:
"बाबा मला एका घर घ्यायचं त्या माणसाठी ज्याने मला खालून इतका वर आणलं
त्यांनी मला एक ओळख मिळवून दिली...."

बाप हि निशब्द झाला
मनात म्हटला "जीवन सार्थ झाल... आता डोळे मिटलो तरी चिंता नाही...."

मुलगा लगेच म्हणाला "बाबा मला तुमची अजून हि गरज आहे..."

त्यानंतर १ तास तरी दोघा बाप लेकाला अश्रू आवरले नाही...


Saturday, February 04, 2012

आपण काय शिकलो?

 
मी घरी पोहचलो. साडे चार वाजले होते. हातपाय धूवून मी एका हाँटेलमध्ये गेलो. वडापाव संपवून मी चहा घेतला. तेवढ्यात तिथे एक ५०-५५ वर्षाची बाई आली. डोक्यावर भल मोठ जळणाचं ओझ तिनं बाजूला टाकल. कुठेतरी एखादा काळा केस, कपाळावरती मोठी कूंकुवाची छटा. घामामुळे कूंकुवाचा लाल रंग भुवईपर्यत आलेला, धारदार नाक, तंबाखूची मसेरीनं काळवंडलेले दात, सूरकुतलेले हात, तिन-चार जोड देऊन हातानेच शिवलेल नववारी लुगड आणि चोळी असा काही तिचा वेश होता.......
नुस्तच कालावाण मिळल का गं बाई? माझ्याकडं भाकर हाय. तिचा होकार मिळताच काळपट फडक्यातून त्या बाईन शिळी भाकर काढली. आणि दिलेल्या कालावणावर अधाशिपणान खाऊ लागली. मी विचार करीयला लागलो. आपण पैसे द्यावे का? हिला कुणीच नसेल का? आणि असेल तर अशी वेळ का यावी तिच्यावर? इतक्यात तिची भाकरी संपण्याच्या आत ती हाँटेलवाली मुलगी म्हणाली.
आजी, मिसळपाव घ्या. पैसे नाही घेणार! पोरी, आज खाईन पोटभरून पण उदया?
तुम्हाला मुलबाळ नाही का?

त्यावर त्या म्हणाल्या, तसं नाय काय, पोरगा मोठा, सायब हाय, परदेशाला इंजनेर हाय पण त्याला येळच न्हाय! कानाखाली कोणतरी जोराची चरकार मारावी आणि त्याचा आवाज मेंदूपर्यत घुमावा तसे हे शब्द माझ्या कानावर पडले. आणि विचारांच काहूर माजल. 
माणूस इतका बदलतो का? आपल संपूर्ण आयुष्य वाहून घेणा-या या माऊलीची त्याला क्षणभरही आठवण येत नसेल का? आणि सगळच अनुत्तरीत होत. माझी चेहरा खाली घालून मी आता विचार करीत होतो. इतक्यात माझ्या पाठीवर तोच थरथरता हात फिरला. मी वरती पाहील तर तिच बाई मला म्हणाली. इतका विचार करु नकोस बाळा, तुझ्या आई-बापाला निट जप म्हणजे झाल...........

मगतर मेल्याहून मेल्यासारख झाल. मी आता फक्त रडायचाच बाकी होतो. कारण एका क्षणात माझ पूर्ण अंतरंग त्या माऊलीन वाचलं. पण आम्हाला आमच्याच आई-वडीलांच थोडस दु:खसुद्धा कधीच जाणता येत नाही. जिवनाच्या सचोटीत एवढं शिक्षण घेऊनही आम्ही अगदीच अडाणी वाटतो यांच्यासमोर! कुठ शिक्षण घेतल असेल यांनी हे.
सेटलमेंट, न्यूजाँब, इनक्रिमेंट, प्रमोशनच्या घोळात आम्ही ही आमची माणसं कुठ हरवुन बसतो आम्हालाच कळत नाही. डोक जड झाल. मी उठलो आणि चालू लागलो. शेजारच्या जिल्हापरिषेद्येच्या शाळेत मास्तर मूलांना विचारत होते. आपण काय शिकलो? मी मनाशीच उत्तर दिलं, आयुष्यात इंजिनिअर नाही होता आल तरी चालेल पण चांगला, जबाबदार माणूस जरुर व्हायच .................
 

Thursday, January 26, 2012

पिझ्झा कुठ मिळतो ?

आत्ताच येताना एक माणूस भेटला. अगदी साधा, सडपातळ, जेमतेम उंची, गरीब दिसत होता, हातात सायकल होती. मला म्हणाला.....
"अवो इथ पिझ्झा कुठ मिळतो".....
त्याच्या त्या 'अवो' ने मी जरासा गोंधळूनच म्हणालो
"हा इथून खाली".
 त्याचा आवाज अगदीच घाबरा आणि कोमेजलेला होता, तो बोलतानाही अंग चोरून उभा होता. तो तेथून सायकल हातात धरून चालतच निघाला.त्याच्याकडे पाहून त्याला पिझ्झा खायची इच्छा झाली असेल असं कोणीच म्हणणार नाही आणि झाली तरी त्याच्या खिशाला ती परवडणारी नव्हतीच. म्हणजे घरात पोरगा रडत असणार, पिझ्झाच हवा म्हणत असणार,...

 
खूप वाईट वाटलं. त्याचा तो दीनवाणा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. सगळं डोळ्यापुढे येत होतं-- 'हा डॉमिनोज मध्ये जाणार, सगळे त्याला हसणार, तो कसाबसा मुलासाठी तो अपमान सहन करून पिझ्झा मागणार . तेवढे पैसे जवळ असतील तर ठीक नाहीतर मुलाचा रडका चेहरा आठवत तसाच बाहेर पडणार....

मित्रांनो आपले आई बापही असेच आपले हट्ट पुरवत असतील, कदाचित आपल्याला ते माहीतही नसेल, आई वडील असे एकमेव असतात ज्यांचा प्रेम आपल्या जन्मापासून मरणापर्यंत कधीही बदलत नाही. बाकी सगळ्यांचं प्रेम वेळेनुसार बदलू शकतं..... विचार करून पहा हवं तर......

 
स्त्रोत: निलेश केमसे.

Saturday, January 21, 2012

बाबा

आई बद्दल सगळेच लिहितात पण बापाबद्दल कोणीच नाही... 
आपला मुलगा/मुलगी पास झाल्यावर अगदी आनंदी होऊन आपल्या पाल्याबाबत सगळ्यांना सांगणारी आई सगळ्यांना दिसते...
पण मागून हळूच मिठाइच्या दुकानात जाऊन पेढ्यांचा box आणणारा बाप कोणालाच दिसत नाही...
 
 
पायाला कुठे छोटीसी ठेस लागली तर तोंडातून लगेच निघतं... "आई गं..." पण तेच एखादा truck समोर आला तर... "बाप रे..."
 
आई सौम्य असते... ती आपल्या भावना व्यक्त करते... बाप कठोर असतो... किंबहुना ह्या धकाधकीच्या जीवनात जगतांना त्याला कठोर व्हावंच लागतं...

पण मनात वादळ उठलेलं असतांना चेहऱ्यावर काहीच झालेलं नाही हे दाखवण्यासाठी खूप सामर्थ्य लागतं... आणि ते बापामधेच असतं....
 
 सौजन्य  : Facebook एक एकटा एकटाच
 

Read This Heart Touching Stories