Jayesh Gujrati's Blog (in Marathi): Money

Search

Showing posts with label Money. Show all posts
Showing posts with label Money. Show all posts

Monday, March 26, 2012

Servants

"कोल्हापूर जवळील एका छोट्या खेड्या मध्ये न शिकलेले आई वडील शेतामध्ये मोलमजुरी करून आपला संसार चालवीत होते, पण मुलाने मात्र भरपूर शिकून मोठे व्हावे, ह्यासाठी त्याला मुंबई मधील महाविद्यालायात शिक्षणास पाठवितात ......  
 काही दिवसांनी आपल्या मुलाला भेटायला ते दोघे मुंबईला जातात व जाताना मुलाच्या आवडीची आईच्या हाताची चटणी-भाकर ते घेऊन जातात.  
महाविद्यालयात गेल्यावर त्यांना अतिशय साध्या कपड्यांमध्ये बघून त्या मुलाची प्रेयसी विचारते 
"Who are they ?
मुलगा म्हणतो
"They are the servants from my village !!!" ते 
ऐकून आई वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात ... 
का?  तर आपलां मुलगा इंग्रजी बोलायला लागला म्हणून... 
 
BY: एक एकटा एकटाच
 

Saturday, March 24, 2012

टेलिफोन बूथ

एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो,
मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ?
फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे.
 
मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना.

फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे.
 
मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ करण्याचे काम पण करेन.

फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात)
 
तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो "तू आजपासून माझ्याकडे काम कर..."

मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद
 
दुकानदार :- अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ?

मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारा मीच आहे, .... पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते.

तात्पर्य :- 
१) आमीर खान, राहुल द्रविड हे जन्मापासून परफेक्ट नव्हते, स्वताहाच्या चुका शोधून, त्यावर अभ्यास करून, मेहनत करून ते परफेक्ट झाले.
 
२) प्रेम व मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो हे बघण्यापेक्षा स्वतः आपण किती चुकतो हे नेहमी बघत राहिल्यास, प्रेमाच फुल कधीच कोमजणार नाही. 
 
३) भारत देश असा, भारत देश तसा, ह्या भारताचे काहीच होणार नाही, असं म्हणत बसण्यापेक्षा, आपण भारतीय संस्कृती व भारताच्या सिद्धांताप्रमाणे खरोखर वागतो कि नाही, व आपण भारतासाठी काय करू शकतो हे पाहणे जास्त जरुरीच आहे.
 
by: एक एकटा एकटाच

Monday, March 19, 2012

Be Practical

आमच्या junior college मध्ये एक मुलगी होती.. खूपच सुंदर, निळे डोळे, ओठांवर एक निरागस हसू, गालावर खाली, सोन्यासारखा कांती होतीतिची... जणू काही ती एक अप्सराच होती.. हो, खरच...
सगळ्या मुली तिच्यावर जळायच्या.. आणि सगळे मुले तिच्यावर जीव ओवाळून टाकायचे.. 

पण ती मात्र स्वत:तच गुंग असायची..एक मुलगा तिला आवडायचा.. handsome dashing बोल्ड असा होता तो... तिला साजेसा.. 
योगायोगाने त्यालाही ती आवडायची... फिदा होता तो तिच्यावर... ते दोघे made for each other होते... तो तिला propose करणार होता... RoseDay  होता त्या दिवशी.. त्याने तिला एक मोठा Red Roses चा बुके दिला.. आणि सर्व college समोर तिला तो I Love You म्हणाला... ती हलकेच लाजली, आणि संमती दर्शविली... तेव्हा त्याने अख्या कॉलेज ला सामोसेखाऊ घातले होते.... 
Propose करताना तो तिला म्हणाला "आयुष्यात अगदी काहीही झालं तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही.. दुसऱ्या कुठल्या मुलीकडे कधी वळून सुद्धा बघणार नाही.. जर देवाने मला माझ्या life मध्ये आणि तुझ्या मध्ये काही एक choose करायला सांगितलं तर मी तुलाच choose करेल.. तू फक्त माझी आहेस.. गर्दीत तुला हरवू देणार नाही, तुझा हात कधीच हातातून निसटू देणार नाही.." ती म्हणाली, "मी सुद्धा तुझ्यावर तितकच प्रेम करते.."
एक दिवस ती गाडीवरून घरी येत होती, कानात headfone त्याचाशी बोलत होती.. बोलण्याच्या नादात तिला ट्रकचा होर्न ऐकूच नाही आला, आणि accident झाला.... खूपच गंभीर होता तो accident... त्यात तिचा डावा पाय ट्रक च्या खाली आला, आणि चुराडा झाला पायाचा... डोक्याला खूप लागल.. खूप रक्त गेल... ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.. घरच्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेल.. डॉक्टरांनी सांगितलं कि पाय पूर्णच गेलाय.. artificial पाय बसवावा लागेल.. इतका वेळ ती बेशुद्ध च होती.. ती शुद्धीवर आल्यावर तिला कळाल कि तिला दुसरा पायबसवलाय.. तो तिला भेटायला गेला होता.. त्याला फार वाईट वाटल.. पण तिने त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम नाही तर सहानुभूती पाहिली... नंतर हॉस्पिटल मध्ये तो तिला भेटायला यायचा.. पण खूप कमी बोलायचा.. एकदा तिने हिम्मत करून विचारला, "तू असा का वागतो आहेस?? काय झालाय तुला???" तो म्हणाला, "मला नाही वाटत कि मी हे relationship टिकवू शकेल पुढे..., आपण break up करून टाकू??" ती म्हणाली, "तू पण इतरांसारखाच आहेस... तू तर म्हणाला होतास कि काही झालं तरी माझी साथ सोडणार नाहिसं... मग आता काय झालं??? का ते प्रेम पण खोटं होतं???" तो म्हणाला, "Be Practical यार, मी तुझ्यासोबत आता माझा सगळं आयुष्य कस काढणार??"
शेवटी तो तिला सोडून निघून गेला,. कायमचा... का नाही जाणार??? तो Practical होता...
जो असं वागत नाही त्याला पश्चातापाशिवाय काहीही मिळत नाही...

काय वाटतं तुम्हाला...? शेवटची Line चुकली ना...? मग बदला तर... जशी तुम्हाला वाटते तशीच लिहून काढा... Comment मध्ये...
- Jayesh

Saturday, March 17, 2012

तो एक भिकारी होता...

तो एक भिकारी होता...
लहानपणापासूनच गणपती मंदीरासमोर बसायचा...
येणार्‍या-जाणार्‍याकडे आशाळभूत नजरेने पहायचा...
त्याचा आवाज खूप चांगला होता...
सुरेल आवाजात भक्तीगीतं गायचा...
स्वतःला विसरुन सुरांमध्ये तल्लीन होऊन जायचा...
ती मंदीराजवळच रहायची...
दर मंगळवारी न चुकता मंदीरात यायची...
या मुलाचं तिला विशेष कौतुक वाटायचं...
त्याच्या आवाजातील कारुण्य, तिच्या मनात दाटायचं...
एकदा जाऊन ती त्याच्याशी बोलली...
एकमेकांच्या नकळत, त्यांची मैत्री फुलली...

आता, ती रोज मंदीरात येऊ लागली...
त्याच्यासोबत अखंड गप्पा मारु लागली...
तिनं त्याला लिहायला, वाचायला शिकवलं...
त्यानेही सगळं झटकन आत्मसात केलं...
हळूहळू त्याच्या पंखांना पालवी फुटू लागली...
त्याच्या मनात तिच्याविषयी प्रीत मग दाटू लागली...
त्यानं ठरवलं, स्वतःच्या पायावर उभं रहायचं...
आणि मग कर्तृत्वाच्या जोरावर, तिला मिळवायचं...
वर्ष सरत होती... काळ सरकत होता...
त्याच्या मनात प्रेमाचा अवीट झरा झरत होता...
मग एके दिवशी त्याने, शहरात जायचं ठरवलं...
संगीताच्या विश्वात, नशीब कमवायचं ठरवलं...
तिला न भेटताच, तो शहरात निघून आला...
आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, जोमानं लढू लागला...
रोज भर उन्हात, पायी रखडत जायचा...
मान्यवर संगीतकारांचे उंबरे झिजवायचा...
पण त्याला कधीच कोणी संधी दिली नाही...
त्याच्या गुणांची कोणी कदरच केली नाही...
दिवस उलटत होते, पण त्याचा निर्णय पक्का होता...
स्वतःच्या कर्तृत्वावर, त्याचा विश्वास सच्चा होता...
आणि एके दिवशी, ती सुवर्णसंधी चालून आली...
गायकीच्या स्पर्धेसाठी, प्रवेशिका त्यानं दिली...
त्याच्या आवजाला तिथं वाखाणलं गेलं...
त्याच्या गुणांचे मोल, खरोखर जाणलं गेलं...
आणि मग त्याच्यातील गायकाचा उदय झाला...
त्याच्या तेजाने मग, तो विश्व उजळून गेला...
किर्ती,प्रसिद्धी,पैसा,प्रतिष् tha सर्व त्याला मिळाले...
तरीही त्याचे मन, केवळ तिच्याचसाठी तळमळले...
तिची आठवण येताच, तो गावाकडे परतला...
जाऊन तिच्या घराच्या, अंगणात उभा राहीला...
पण हे काय? ते घर अगदी उदास भासत होते...
कोणते तरी दुःख, त्या घरास ग्रासत होते...
आत पाऊल टाकताच, त्याच्या ह्रदयात धस्स झाले...
मनातल्या स्वप्नांचे डोलारे, क्षणार्धात लुप्त झाले...
तिचा फुलांच्या हारने सजलेला फोटो,
त्याच्या ह्रदयात बाणासारखा शिरला...
अन् यशाच्या शिखरावर पोहोचुनही,
शेवटी तो एक भिकारीच उरला.........

Saturday, March 10, 2012

First Gear

त्या दिवशी गाडी चालवत होतो. मुंबईत गाडी चालवायची म्हणजे क्लचब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जाणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली. 

गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअरटाकतो. हा 'फर्स्ट गिअरम्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई-बाबाजोडीदारमुलंजवळचे मित्र...


हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता 'पुढेजात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कारफर्स्ट गिअर करतो.



इथे आपल्याला unconditional प्रेम मिळतंसुरक्षितता मिळते. गाडी 'बंद पडणार नाहीयाची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी 'पळण्यासाठीइतका कमी वेग पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो ! इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं.

शाळा कॉलेजपुस्तकंमिडियाआपले छंदविविध कला..... बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहेहे कळतं.
समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो. गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घरकपडा लत्ताभांडीकुंडीपहिला फ्रीजपहिला टीव्हीप्रसंगानुरूप हॉटेलिंगसणासुदीला नवीन कपडेचांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअर मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्यपण आता तोच वेग कमी वाटू लागतो.
आपण आता 'फोर्थ गिअरटाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्सगाडी, latest मोबाईल, 1 BHK मधून 2 BHK, laptop, ह्याउ नि त्याउ..!

या वेगाची नशाच काही और! गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही...आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी... खर्व.... निखर्व......रुपये नाहीतगरजा! हा 'वेगखूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये, 'लालसिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं....
आणि... आणि.....आणि...

... 'नियतीनावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो.
गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो. पाच.. चार.. तीन..दोन...एक.... खाट खाट गिअर मागे टाकत आपण आता neutral वर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो.
पाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखील टाकला होता याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती...
आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं. 

गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे.. मला सांगा कुठला गिअर टाकाल ?

सुसाट वेगाचा पाचवा गिअर की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा 'फर्स्ट गिअर' ?

आयुष्यात जेव्हा पराभवाचेनिराशेचे क्षण आले होतेतेव्हा कोण होतं तुमच्या जवळकोणी दिला होता आधार आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने ?

EMI भरत विकत घेतलेल्या extra बेडरूमनेनव्या कोऱ्या गाडीने ? 'You are promoted' असं लिहिलेल्या कागदाने ?
मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने !
आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबानिरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, 'होईल सगळं व्यवस्थितम्हणत डोक्याला बाम चोळून देणारी 'बायकोनावाची मैत्रीणबाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, 'त्याकाळात आपल्या frustration चा 'कानहोणारे आणि योग्य सल्ला देणारे जिवाभावाचे मित्र हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते का ?
Don't get me wrong. माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही. त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया. फक्त त्यावेळी आपल्या 'फर्स्ट गिअर्सचं स्मरण ठेवूया.
आयुष्याचा वेग मधून मधून थोssडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.
सुसाट वेगाचा 'arrogance' इथे नाही... गाडी थोडी हळू चालेल हे मान्य. 'फर्स्ट गिअरचंअस्तित्व लक्षात घ्यावंच लागेल असा हा वेग असेल. 
त्या निवांतपणाशी थोडं खेळूया आणि मग टाकूया पुढचा गिअर !
जाता जाता आणखी एक.
स्वत:लाच एक प्रश्न विचारूया - दुसऱ्या कुणाच्या आयुष्याचा मी बनू शकेन का 'फर्स्ट गिअर' ?

Thursday, March 01, 2012

चोर-चोर

'काही लोकांचा स्वभाव इतका वेगळा असतो ना कि कौतुक करावस वाटत. पण कौतुक करण्याइतके आपण अजून मोठे झालो नाही हे लक्षात येत. खर तर अश्या लोकांकडे बघून कळत कि आपण किती खुजे आहोत.'
असाच एक प्रसंग आज तुम्हाला सांगतो..
एका महानगरात नौकरी गमावलेला एक तरुण सिटीबस मधून उतरतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते की त्याचे पाकीट चोराने लांबवले. 
 तो तरुण बुचकळ्यात पडतो. कारण त्याची नौकरी गेलेली असते आणि खिशात फक्त १५० रुपये आणि त्याने त्याच्या आईला लिहून ठेवलेले एक पत्र असते. ज्यात त्याने लिहिलेले असते की ,
"माझी नौकरी मी गमावून बसलो आणि तुला आता काही दिवस पैसे पाठवू शकत नाही."
तीन दिवसापासून ते पत्र त्याच्या खिशात असते. पोस्ट करू की नाही ह्या मनस्थितीतच त्याचे १५० रुपये आणि ते पत्र चोरी होते. १५० रुपये काही फार मोठी रक्कम नाही, पण त्या तरुणासाठी ते १५०० रुपयापेक्षा कमी नव्हते.

काही दिवसांनी त्याच्या आईचे पत्र त्याला मिळाले. तो तरुण आपल्या आईचे पत्र वाचून आश्चर्यचकित होतो. त्याची आई ने पत्रात लिहिले असते - "बाळ, तु पाठवलेले ५०० रुपयांचे मनीऑर्डर मला मिळाले. काळजी घे स्वतःची."

तो तरुण जाम बुचकळ्यात पडतो. त्याला प्रश्न पडतो, कोणी ५०० ची मनीऑर्डर केली असेल.

काही दिवसांनी परत त्याला एक पत्र येते, तोडक्या मोडक्या अक्षरात लिहिलेले, वाचण्यास अवघड पण ३ ते ४ ओळीचे -
 
“प्रिय भाई, 150 रुपए तुम्हारे.. और 350 रुपए अपनी ओर से मिलाकर मैंने तुम्हारी माँ को.. मनीआर्डर.. भेज दिया है..। फिकर.. न करना। माँ तो सबकी.. एक- जैसी ही होती है न..! वह क्यों भूखी रहे...?
तुम्हारा— जेबकतरा भाई..!!!
 
by : एक एकटा एकटाच

Monday, February 27, 2012

तासाला किती कमवतो ?

एक नोकरदार माणूस रोजसारखा घरी आला... रोजसारखाचं उशीरा... त्याचा मुलगा सहा-सात वर्षाचा;  त्याची वाटचं पहात होता अगदी रोज पहातो तशीचं... 
तो घरात आला त्याचा मुलगा त्याच्या कडे पाहात होता... तो म्हणाला "काय रे काय झाले ? असा का पहातो आहे"
मुलगा म्हणाला "बाबा , एक प्रश्न विचारु का ?"
काहीसा त्रासिकपणे "हो विचार"
मुलगा "बाबा तुम्हाला एक तास काम केल्यावर किती पैसे मिळतात"
माणूस रागात "तुला काय त्याचे देणे घेणे ?? असे काही पण काय विचारतो ?"
मुलगा "सहज विचारले . सांगा ना... एका तासाला किती पैसे मिळतात ?"
माणूस वैतागून "तुला ऐकायचेच आहे ना... तासाला १०० रुपये"
मुलगा "असं का" काही क्षण गेले "बाबा माला ५० रु. द्या ना"
आता तो माणूस अगदि चिडलाचं... मुलावर ओरडला "असं का हे कारण होतं म्हणून तुला पैसे पाहीजे आहेत... म्हणून इतकी विचारपूस करतो का... खेळने घ्यायचे असेल काही त्या पैशांचे, नाही तर उधळपट्टी करणार असशील मी मर मर मरतो काम करतो आणि तु असा पैसा उधळतो, स्वार्थी  कुठला बापाची काळजी नाही कसली वरुन
मला विचारतो म्हणे तासाला किती कमवतो मी.... असे म्हणून त्याच्या एक कानात वाजवतो...
 
मुलगा हिरमुसला त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आले तो आतल्या खोलीत गेला... माणूस ही जरा रागातचं होता बसला थोडा... मुलाचे शब्द डोक्यातचं घोळत होते असे कसे तो विचारतो मला तासाला किती कमवतो... पहाता-पहाता तास दोन तास निघून गेले... माणसाचा राग बराचं शांत झाला पण अजूनही मनात तेचं शब्द ...
"तासाला किती कमवतो"
 
असे का विचारले असे कधी विचारत नाही तो त्याला नक्की काय म्हणायचे होते ... त्याला काही पाहीजे आहे का... त्याला पैसे लागणार असतील... उगाचं चिडलो इतका असे म्हणून तो खोलीकडे वळला... दार उघडले
"बाळा झोपला का रे" माणूस म्हणाला
"नाही बाबा मी जागाचं आहे" मुलगा उत्तरला
"अरे बाळा रागवला का रे, मी तुला मारले ना ...
अरे तेव्हा मी कसा इतका चिडलो समजलेचं नाही , घे हे ५० रु."
मुलगा उठून बसला गोड हसला आनंदाने म्हणाला
"बाबा खरचं देता आहेत"
असे म्हणून ते ५० रु. घेतले मग त्याने उशी खालून अजून ५० रु. काढले माणसाने पाहीले की मुलाकडे तर आधीचं पैसे आहेत नेमके तीतेकेचं
मुलगा पैसे मोजत होता मग त्याने वडीलांकडे पाहीले हा परत थोडा चिडला
"अरे तुझ्या कडे आहेत ना पैसे "
"पण पुरेसे नव्हते" मुलगा उत्तरला "पण आता झाले"
पुढे म्हणाला "बाबा, तुम्ही दिलेले ५० रु आणि मी जमवलेले पैसे हे तुम्ही घ्या पूर्ण १०० रु आहेत... माणूस गोंधळला काय चालले आहे त्याला कळतचं नव्हते मुलगा असा काय वागतो आहे... मुलगा पुढे म्हणाला
"बाबा माला तुमचा एक तास हवा आहे, उद्या घरी एक तास लवकर या मला तुमच्या सोबत जेवायचे आहे उद्या माझा वाढदिवस आहे..."
माणसाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होते... त्याने मुलाला मिठीत घेतले... मुलगाही अगदी सुखावला  बाबांनी त्याला फार दिवसांनी असे मिठीत घेतले होते... 
ही गोष्ट त्यांच्यासाठी एक short reminder आहे जे नेहमी काम-काम आणि कामचं करतात करियर, पैसा कमवायच्या धडपडीत बरेच काही आहे ज्यापासून दुरावत आहेत .जमलंचं तर थोडा वेळ त्यांच्यासाठीही काढा जे आपल्या सहवासासाठी असुलेले आहेत आपला परिवार आपले नातलग मित्र मैत्रीणी सारे आपल्यावर प्रेम करतात आणि त्यांना फक्त थोडा वेळ  पाहीजे आपल्याकडून बाकी काही नाही... जमलंचं तर थोडा विचार करा...

Friday, February 24, 2012

दिनूचे बिल.

दिनूचे वडील डॉक्टर होते. दिनू कधीकधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे. तेथे पुष्कळसे लोक येत. कोणीतपासून घेण्यासाठी येत. कोणी औषधे घेण्यासाठी येत. कोणी म्हणे, "डॉक्टर, माझं पोट दुखतंय. मला तपासा."तर कोणी म्हणे, "डॉक्टर, माझं बिल किती झालं ते सांगा." 
दिनू एका लहानश्या खुर्चीवर बसून ते सारं पाहत असे व ऐकत असे. दवाखान्यातल्या ...बऱ्याचशा गोष्टी त्याला आताकळू लागल्या होत्या, पण "बिल" म्हणजे काय, हे त्याला अजून कळले नव्हते.

 
दिनूने एकदा वडिलांना विचारले, "बाबा, बिल म्हणजे काय हो?"

डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला. "हे बघ. याला म्हणतात बिल. वाच!"


दिनू तो कागद वाचू लागला. त्यावर लिहिलं होतं -

_________________________________
रोग्याला तपासण्याबद्दल ... १० रुपये
दोनदा घरी येण्याबद्दल ... २० रुपये
आठ वेळा औषधांबद्दल ... ८ रुपये
________________________________
एकूण ... ३८ रुपये
________________________________

दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता. तो एकदम मध्येच हसला. त्याला काय वाटले कोणास ठाऊक? काहीतरीविचार त्याच्या डोक्यात आला. घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि एका कागदावर त्याने आपल्याआईच्या नावावर एक बिल तयार केले. त्याच्यावर लिहिलं होतं -
___________________________________________
आज बागेतून फुले आणल्याबद्दल ... ५० पैसे
बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल ... २ रुपये
शेजारच्या काकूंकडे निरोप दिल्याबद्दल ... १ रुपया
दुकानातून साखर आणल्याबद्दल ... ५० पैसे
___________________________________________
एकूण ... ४ रुपये
___________________________________________

ते बिल त्याने आपल्या आईच्या खोलीत नेऊन ठेवले. दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी लवकर उठला. त्याच्या उशाशी ४ रुपये ठेवलेले होते. दिनूने ते उचलले. तेवढ्यात तेथे ठेवलेला एक कागद त्याला दिसला. त्यावर काहीतरीलिहिलेले होते. त्याने कागद उचलला व चटकन वाचला. आईने दिनूच्या नावावर एक बिल तयार केले होते.

________________________________________________________________
लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल ... काही नाही
चारदा आजारपणात दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल ... काही नाही
गोष्ट सांगून करमणूक केल्याबद्दल ... काही नाही
वाचायला शिकवल्याबद्दल ... काही नाही
________________________________________________________________
एकूण ... काही नाही.
________________________________________________________________
दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आले. त्याचा गळा भरून आला. त्याच्या हातातला कागद गळून पडला. ते पैसेघेऊन तो तसाच आईकडे धावत गेला. काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले, व तो आईच्या मांडीवर डोकेठेवून रडू लागला.

आईने दिनूला कुरवाळले. आणि त्याचा मुका घेत ती म्हणाली,

"तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं, दिनू!"

 
- आचार्य अत्रे

Read This Heart Touching Stories