Jayesh Gujrati's Blog (in Marathi)

Search

Tuesday, January 24, 2012

संवाद

 एकदा एका साधुने त्याच्या शिष्यांना विचारले, "आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का ?". सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दीले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचीत ओरडून बोलतो." 
 यावर साधुमहाराज म्हणाले, " पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्दा आपण ओरडतो। जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरीदेखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो". यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याच उत्तराने साधुचे समाधान झाले नाही. शेवटी साधुमहाराजांनी स्वतःच उत्तर दीले. ते म्हणाले , " जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात."

"आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतीशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?" असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले," कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते. आणि जसजसे दोन व्यक्तीमधील प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतुनच किंवा देहबोलीतुनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.


शिकवण - परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतच राहतात मात्र कीतीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढु देउ नका। तसे होउ दील्यास दोन व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होइल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही.
 
By  एक एकटा एकटा

Monday, January 23, 2012

चौथा आश्रम

समुद्र किनाऱ्यावर छोटे बहिण भाऊ वाळूचं घर बनवण्यात मग्न होते...

"थांब दादा असं नाही...... इथे आपण गाडी ठेवायची." त्यांचा खेळ कल्पना पाहताना त्यांच्या आईला फार बर वाटत होत.
 "आई बघ हं, ही रूम माझी, ही ताई ची, आणि ही तुझी. किती छान आहे ना आपलं घर?" आपण बनवलेलं घर आपल्या आईला कौतुकाने दाखवत मुलगा म्हणाला. इतक्यात त्याचे बाबा मुलांसाठी आईस क्रीम घेऊन आले, आणि विचारलं "आणि माझी रूम रे? मी कुठे राहायचं ?"

निरागसपणे त्या छोट्या जीवांनी उत्तर दिलं, "बाबा तुम्हाला कशाला हवीये रूम ? तुम्ही कसं आजोबांना वृद्धाश्रमात पाठवलंत, आम्ही पण तुम्हाला पाठवणार. बाबा म्हातारे झाले कि त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात ना ?"

हे ऐकून त्या बापाला आपल्या केलेल्या कर्माची फळ दिसू लागली. विचार चक्र जोरात फिरू लागलं....... 'हे आपण काय शिकवलं?'
विचार चक्राची गती वाढत गेली आणि तो बाप चक्कर येऊन तिथेच थंड पडला.
.
.
विचार करा...... आपण जसे वागतो त्याचेच अनुकरण करत आपली पुढची पिढी घडतेय. कर्म प्रमाणे फळ मिळतंय....... सावधान व्हा!

युगान युगे चालत आलेल्या तीन आश्रमा नंतर चा हा मनुष्याने कलियुगात शोधून काढलेला चौथा आश्रम..... 'वृद्धाश्रम'.

कुठे तरी आपण सावध झालंच पाहिजे.........
 
- जयेश विसपुते.
 

Saturday, January 21, 2012

बाबा

आई बद्दल सगळेच लिहितात पण बापाबद्दल कोणीच नाही... 
आपला मुलगा/मुलगी पास झाल्यावर अगदी आनंदी होऊन आपल्या पाल्याबाबत सगळ्यांना सांगणारी आई सगळ्यांना दिसते...
पण मागून हळूच मिठाइच्या दुकानात जाऊन पेढ्यांचा box आणणारा बाप कोणालाच दिसत नाही...
 
 
पायाला कुठे छोटीसी ठेस लागली तर तोंडातून लगेच निघतं... "आई गं..." पण तेच एखादा truck समोर आला तर... "बाप रे..."
 
आई सौम्य असते... ती आपल्या भावना व्यक्त करते... बाप कठोर असतो... किंबहुना ह्या धकाधकीच्या जीवनात जगतांना त्याला कठोर व्हावंच लागतं...

पण मनात वादळ उठलेलं असतांना चेहऱ्यावर काहीच झालेलं नाही हे दाखवण्यासाठी खूप सामर्थ्य लागतं... आणि ते बापामधेच असतं....
 
 सौजन्य  : Facebook एक एकटा एकटाच
 

Read This Heart Touching Stories