Search
Thursday, January 26, 2012
पिझ्झा कुठ मिळतो ?
आत्ताच येताना एक माणूस भेटला. अगदी साधा, सडपातळ, जेमतेम उंची, गरीब दिसत होता, हातात सायकल होती. मला म्हणाला.....
"अवो इथ पिझ्झा कुठ मिळतो".....
त्याच्या त्या 'अवो' ने मी जरासा गोंधळूनच म्हणालो
"हा इथून खाली".
त्याचा आवाज अगदीच घाबरा आणि कोमेजलेला होता, तो बोलतानाही अंग चोरून उभा होता. तो तेथून सायकल हातात धरून चालतच निघाला.त्याच्याकडे पाहून त्याला पिझ्झा
खायची इच्छा झाली असेल असं कोणीच म्हणणार नाही आणि झाली तरी त्याच्या
खिशाला ती परवडणारी नव्हतीच. म्हणजे घरात पोरगा रडत असणार, पिझ्झाच हवा
म्हणत असणार,...
खूप वाईट वाटलं. त्याचा तो दीनवाणा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. सगळं डोळ्यापुढे येत होतं-- 'हा डॉमिनोज मध्ये जाणार, सगळे त्याला हसणार, तो कसाबसा मुलासाठी तो अपमान सहन करून पिझ्झा मागणार . तेवढे पैसे जवळ असतील तर ठीक नाहीतर मुलाचा रडका चेहरा आठवत तसाच बाहेर पडणार....
मित्रांनो आपले आई बापही असेच आपले हट्ट पुरवत
असतील, कदाचित आपल्याला ते माहीतही नसेल, आई वडील असे एकमेव असतात ज्यांचा
प्रेम आपल्या जन्मापासून मरणापर्यंत कधीही बदलत नाही. बाकी सगळ्यांचं प्रेम
वेळेनुसार बदलू शकतं..... विचार करून पहा हवं तर......
स्त्रोत: निलेश केमसे.
पोट
फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे...........
देवाने पृथ्वी निर्माण केली,..... तिथे राहणाऱ्या विविध प्राणी पक्ष्यांची
उत्पत्ती केली. सारे नवीन,........... सगळे प्राणी पक्षी एकमेकांकडे
कुतूहलाने पाहत होते, एकमेकांशी ओळख करून घेत होते.
जो तो समोर
येणाऱ्या प्रत्येक जीव जनावरच्या विशिष्ट रचनेवर आश्चर्य व्यक्त करत होता.
कोणाचे कान मोठे, कोणाची मान लांब, कोणी अवाढव्य तर कोणी अगदी इवलेसे.
चर्चा, ओळख पाळख सुरु होती. आणि विशेष म्हणजे या सगळ्यानमध्ये माणूस सुद्धा होता.
माणसाकडे कुतूहलाने पाहत सगळेच म्हणत होते, "हा प्राणी फारच सुंदर आणि आपल्याहून हुशार आहे."
हे माणसाने ऐकलं आणि फार खुश झाला.
आपली स्तुती ऐकता ऐकता त्याला स्वतः बद्दल काही तरी वेगळा ऐकू आलं.......... काही हत्ती त्याच्या बद्दल बोलत होते.
न राहून त्याने एका हत्ती ला विचारल. "तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का ?"
हत्ती: "हो......... म्हणजे बघ ना, देवाने आम्हाला सर्वांना एवढा मोठ्ठा पोट दिलाय आणि तुला फक्त वितभर."
हे ऐकून सगळ्यांनीच सहमती दर्शवत म्हटले "हो, हे चुकीच आहे."
हे ऐकून माणूस नाराज झाला.
रागाने तो पुन्हा देवा जवळ गेला, आणि विचारू लागला, "देवा माझ्यावर हा
अन्याय का ? त्या सर्व जनावरांना एवढा मोठ पोट दिलंस, मग मला इतका लहान का ?"
देव: "तू नको चिंता करू , मी तुला जेवढं पोट दिलंय ना ते योग्यच आहे . विश्वास ठेव."
माणूस: "नाही, ते काही नाही. तू दुजा भाव करतोयस देवा, मला हि इतरांसारखं मोठ पोट हवंय. मी नाही ऐकणार."
देव: "बर ठीक आहे, देतो मी तुला मोठ पोट. पण एक गोष्ट !"
माणूस: "काय देवा ?"
देव: "मी तुला आता दिलेलं पोट आहे ना ते आधी पूर्ण भरून ये. ते भरलं कि तू मला सांग. मी लगेच तुला मोठ पोट देईन."
हे ऐकून माणूस कुश झाला आणि आनंदाने पृथ्वीवर परतला.
पण मग पुढे काय झाल ?.......................... ..................
कित्येक वर्ष, भला मोठा काळ, चार युग लोटली, कलियुग आलं...............
आणि या युगात तर माणूस खातोच आहे................. पण अजून तो देवाला
सांगायला नाही गेलाय कि देवा माझ पोट भरलंय.........
काय ? पटतंय ना आजची परिस्थिती पाहून ?
स्त्रोत:- जयेश विसपुते.
Subscribe to:
Posts (Atom)