Search
Friday, January 27, 2012
गोल्फ बॉल
आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी करावाशा वाटतात आणि दिवसाचे २४
तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप कॉफी हा लेख जरूर आठवून पहा
:)
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले, त्यांनी येताना कही
वस्तू बरोबर आणाल्या होत्या, तास सुरू झाला आणि सरांनी कही न बोलता मोठी
काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात गोल्फ बॉल भरु लागले, ते भरून
झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पूर्ण भरली
का म्हणून विचारले, मुले हो म्हणाली, मग सरांनी दगड खड्यांचा बॊक्स घेऊन
तो बरणीत रिकामा केला आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा
होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले, त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का
म्हणुन विचारले, मुलांनी एका आवाजात होकार भरला, सरांनी नंतर एका पिशवीतून
आणलेली वाळू त्या बरणीत ओतली, बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का
म्हणून विचारले, मुलांनी तबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा
भरलेले २ कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी कही जागा होती
ती चहाने पुर्ण भरून निघाली. विद्यार्थांमधे एकच हशा पिकला. तो संपताच सर
म्हणाले, "आता ही जी बरणी आहे तिला तुमचे आयुष्य समजा.
गोल्फ बॉल
ही महत्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद -
ह्या आशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सरं कही गेलं आणि ह्याच गोष्टी
राहिल्या तरी तुमचं आयुष्य परिपुर्ण असेल...
दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर, कार. उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी."
"आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर गोल्फ बॉल किंवा दगड खडे
ह्यासाठी जागा उरणार नाही, तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा
वेळ आणि सारी शक्ती लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या
गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच रहाणार नाही. तेव्हा आपल्या सुखासाठी
म्हत्वचं काय आहे त्याकडे लक्श द्या."
"आपल्या मुलाबाळांबरोबर
खेळा, मेडिकल चेकअप करुन घेण्यासठी वेळ काढा, आपल्या जोडीदाराला घेउन बहेर
जेवायला जा, घराची सफाई करायला आणि टाकऊ वस्तूंची विल्हेवाट लावायला तर
नेहमी वेळ मिळत जाईल, "
"गोल्फ बॉलची काळजी आधी घ्या, त्याच गोष्टींना खरं महत्व आहे, प्रथम काय करायचं ते ठरवून ठेवा बाकी सगळी वाळू आहे."
सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं,"यात
कॉफी म्हणजे काय?" सर हसले आणि म्हणाले, "बरं झाले तु विचारलेस, तुझ्या
प्रश्नाचे उत्तर असे की आयुष्य कीतीही परिपुर्ण वाटले तरी मित्रांबरोबर १-२
कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते "
by एक एकटा एकटाच
दारू पिवून वाहन चालवू नका...
एक ६ - ७ वर्षाचा लहान मुलगा मॉल मध्ये आला. त्याला एक डॉल विकत घ्यायची होती पण दुकाणदार त्याला समजावत होता कि तुझ्याकडे पैसे कमी आहेत मी हि डॉल तुला नाही देवू शकत. मुलगा खूप दुखी होवून त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका बाईला विचारतो "आजी खरच माझ्याकडे कमी पैसे आहेत का? तर ती म्हणते हो बाळा तुझ्याकडे तितके पैसे नाहीत"
हे बोलून ती तिथून निघून जाते, मुलाच्या डोळ्यात पाणी बघून मला राहवलं नाही मी त्याच्या
जवळ गेलो त्याला विचारल तुला हि डॉल कशाला हवी आहे? तर तो बोलला माझ्या
लहान बहिणीला हि डॉल खूप आवडली होती आणि तिला वाटतंय कि सान्ता क्रिसमसला
तिला हि डॉल गिफ्ट करेल....
तर मी म्हंटल मग सान्ता देयेल ना हि
डॉल तुझ्या बहिणीला, तो खूप दुखी होवून म्हणाला कि सान्ता तिकडे जावू नाही
शकणार मला हि डॉल माझ्या आईकडे द्यायची आहे, कारण माझी बहिण देवाकडे गेली
आहे असे बाबा म्हणाले, आणि ते बोलले कि आई पण लवकरच तिकडे जाणार आहे, आई
कडे खूप कमी वेळ आहे म्हणून मी आईला बोललो आहे कि तू मी मॉल मधून येई
पर्यंत थांब ....
"म्हणून हि डॉल मला आईकडे देवून ती बहिणीसाठी
पाठवायची आहे...." हे बोलल्यावर माझ्या डोळ्यातून पाणी आले..... मी त्याला
पटकन बोललो "तू एक काम कर ते पैसे आपण परत मोजू बघू कदाचित ते असतील
बरोबर...." आणि मोजता मोजता मी त्यात कमी पडणारे पैसे माझ्या खिशातून टाकले
टोटल केल्यावर मुलगा खूप खुश झाला कारण त्यात थोडे अधिक पैसे उरले डॉल विकत
घेवून सुद्धा मग तो मला बोलला कि मी काल रात्री देवाकडे प्राथना केली होती
कि माझ्याकडे पैसे उरावे डॉल घेवून सुद्धा कारण मला माझ्या आईसाठी सफेद
गुलाब पण घ्यायचं आहे कारण माझ्या आईला ते खूप आवडतात.
आता तो
मुलगा तिथून निघून गेला.. माझी खरेदी मी एका विचित्र मूड मध्ये संपवली पण
काही केल्या माझ्या मनातून त्या मुलाचे विचार काही जात नव्हते. नंतर मला
आठवले कि दोन दिवसापूर्वी वर्तमान पत्रात एक बातमी वाचली होती कि एका ट्रक
ड्राईवरणे दारू पिवून वाहन चालवत एका रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला तिच्या
लहान मुली सकट उडवले होते आणि त्यात ती लहान मुलगी जागीच ठार झाली.
ती महिला लास्ट स्टेजला आहे हे आठवल्यामुळे मला अजूनच ह्या सर्वाचा खूप
मोठा धक्का बसला आणि लगेच दुसऱ्या दिवशी बातमी आली कि ती महिला मरण पावली
मी लगेच पत्ता शोधून त्या महिलेच्या funeral ला गेलो तिथे गेल्या वर बघितले
तर ती महिला कॉफ्फिन मध्ये होती आणि तो लहान मुलगा तिच्या हातात एक सफेद
गुलाब आणि ती डोल ठेवत होता. माझ्या डोळ्यातून अश्रू काही केल्या थांबत
नव्हते मनात आले कि ह्या मुलाच सर्व काही त्या ट्रक ड्राईवरणे क्षणात
संपवून टाकले होते.
कृपया कोणीही दारू पिवून वाहन चालवू नका.
By एक एकटा एकटाच.
Subscribe to:
Posts (Atom)