Jayesh Gujrati's Blog (in Marathi)

Search

Saturday, February 04, 2012

माझा-तुझा संबंध संपला.......

त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते..
त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic .... तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं... असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत.. शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुष होती.. तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता  त्यात ती समाधानीच होती.. तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते...
 

पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, "तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि... मी परदेशी चालले आहे.. पुन्हा कधीच परत येणार नाही.. तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध संपला......." ती कायमची निघुन गेली... हा मॊडुन पडला.... संपलाच जणु काही.... सर्व काही संपले त्याच्यासाठी.. दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या.. त्याने ठरवलं, 'तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे.. 'या जिद्दीने पेटुन उठ्ला तो.. झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले.. राब राब राबला.. मित्रांनी मदत केली. चांगले लॊक भेट्ले.. त्याचे दिवस पालटले.. तो खुप श्रींमत झाला.. स्वतःची कंपनी उभारली.. पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं. विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला.. उभा राहिला.. जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला.. पण तरीही त्याच्या मनात चुटपुट  कायमच होती.. ती सोडुन गेल्याची.. तिनं नाकारल्याची.. आपल्या गरीबीचा अपमान केल्याची.. तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती.

एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता.. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.. गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं.. भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं.. त्याने गाडी थांबवली.. आणि नीट पाहीलं.. हे 'तिचेच' आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली.. त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत.. त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती.. त्यांनी आपली श्रींमती पहावी.. त्यानी आपली गाडी पहावी.. आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा.. असं त्याला मनोमन वाटतं होत.. तिला धडा शिकवण्याच्या..

अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहातात.. हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ. पाहतो आणि कोसळतोच...

तिचाच फ़ोटो.. तसाच हसरा चेहरा... आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं... हा सुन्न झाला... धावतच गेला कबरीकडे... तिच्या आईबाबांना विचारलं... काय झालं ते सांगा....
ते म्हणाले... ती परदेशी कधीच गेली नाही. तिला 'कर्करोग' झाला होता.. तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होते तिच्या हातात... आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली.. तू संतापुन उभा राहशील.. जगशील.. यावर तिचा विश्वास होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले...

आपण काय शिकलो?

 
मी घरी पोहचलो. साडे चार वाजले होते. हातपाय धूवून मी एका हाँटेलमध्ये गेलो. वडापाव संपवून मी चहा घेतला. तेवढ्यात तिथे एक ५०-५५ वर्षाची बाई आली. डोक्यावर भल मोठ जळणाचं ओझ तिनं बाजूला टाकल. कुठेतरी एखादा काळा केस, कपाळावरती मोठी कूंकुवाची छटा. घामामुळे कूंकुवाचा लाल रंग भुवईपर्यत आलेला, धारदार नाक, तंबाखूची मसेरीनं काळवंडलेले दात, सूरकुतलेले हात, तिन-चार जोड देऊन हातानेच शिवलेल नववारी लुगड आणि चोळी असा काही तिचा वेश होता.......
नुस्तच कालावाण मिळल का गं बाई? माझ्याकडं भाकर हाय. तिचा होकार मिळताच काळपट फडक्यातून त्या बाईन शिळी भाकर काढली. आणि दिलेल्या कालावणावर अधाशिपणान खाऊ लागली. मी विचार करीयला लागलो. आपण पैसे द्यावे का? हिला कुणीच नसेल का? आणि असेल तर अशी वेळ का यावी तिच्यावर? इतक्यात तिची भाकरी संपण्याच्या आत ती हाँटेलवाली मुलगी म्हणाली.
आजी, मिसळपाव घ्या. पैसे नाही घेणार! पोरी, आज खाईन पोटभरून पण उदया?
तुम्हाला मुलबाळ नाही का?

त्यावर त्या म्हणाल्या, तसं नाय काय, पोरगा मोठा, सायब हाय, परदेशाला इंजनेर हाय पण त्याला येळच न्हाय! कानाखाली कोणतरी जोराची चरकार मारावी आणि त्याचा आवाज मेंदूपर्यत घुमावा तसे हे शब्द माझ्या कानावर पडले. आणि विचारांच काहूर माजल. 
माणूस इतका बदलतो का? आपल संपूर्ण आयुष्य वाहून घेणा-या या माऊलीची त्याला क्षणभरही आठवण येत नसेल का? आणि सगळच अनुत्तरीत होत. माझी चेहरा खाली घालून मी आता विचार करीत होतो. इतक्यात माझ्या पाठीवर तोच थरथरता हात फिरला. मी वरती पाहील तर तिच बाई मला म्हणाली. इतका विचार करु नकोस बाळा, तुझ्या आई-बापाला निट जप म्हणजे झाल...........

मगतर मेल्याहून मेल्यासारख झाल. मी आता फक्त रडायचाच बाकी होतो. कारण एका क्षणात माझ पूर्ण अंतरंग त्या माऊलीन वाचलं. पण आम्हाला आमच्याच आई-वडीलांच थोडस दु:खसुद्धा कधीच जाणता येत नाही. जिवनाच्या सचोटीत एवढं शिक्षण घेऊनही आम्ही अगदीच अडाणी वाटतो यांच्यासमोर! कुठ शिक्षण घेतल असेल यांनी हे.
सेटलमेंट, न्यूजाँब, इनक्रिमेंट, प्रमोशनच्या घोळात आम्ही ही आमची माणसं कुठ हरवुन बसतो आम्हालाच कळत नाही. डोक जड झाल. मी उठलो आणि चालू लागलो. शेजारच्या जिल्हापरिषेद्येच्या शाळेत मास्तर मूलांना विचारत होते. आपण काय शिकलो? मी मनाशीच उत्तर दिलं, आयुष्यात इंजिनिअर नाही होता आल तरी चालेल पण चांगला, जबाबदार माणूस जरुर व्हायच .................
 

एक होता चिमणा

एक होता चिमणा व एक होती चिमणी..दोघात खूप प्रेम होते.. एके दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू मला सोडून,,उडून तर जाणार नाही ना? ...
...तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून गेलो तर तू मला पकडून घेशील... चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू तर शकेल पण तुला मिळवू नाही शकणार.. हे ऐकुन चिमण्याचे डोळे भरून आले..

त्याने आपले पंख छाटून टाकले..आणि चिमणीला म्हणाला आता तर ठीक आहेना...आता आपण नेहमी सोबत राहू...

एके दिवशी जोराचे वादळ सुटले..चिमण्याला पंख नसल्याने तो उडू शकत नव्हता.. चिमणी मात्र.. तो चिमणीला म्हणाला तू उडून जा.. चिमणीने त्याला स्वताची काळजी घे असे सांगून उडून गेली.. थोड्या वेळाने वादळ शमले... चिमणी परत आली.. पाहते तर चिमणा मारून पडला होता..

बाजूच्या फांदीवर लिहिले होते.. प्रिये.. फक्त एकदा..एकदाच जर तू मला म्हटले असते कि मी तुला सोडून नाही जाऊ शकत.. तर कदाचित हे वादळ हि माझे काही बिघडवू शकले नसते... प्रेम हे असेच असते.
 
 

Read This Heart Touching Stories