Jayesh Gujrati's Blog (in Marathi)

Search

Thursday, February 09, 2012

कुणाचा मृत्यू अत्यंत भयानक तऱ्हेने झाला?

दोन जण स्वर्गात जाण्याच्या रांगेत उभे होते. यमाने त्यांना थांबवित म्हटले, ''स्वर्ग जवळपास फुल झालेला आहे त्यामुळे तुम्हापैकी ज्या कुणाचा मृत्यू अत्यंत भयानक तऱ्हेने झाला आहे अशालाच मी आत सोडणार आहे ... तर तुम्ही तुमची कहानी सांगा... आणि त्यावरुन मी ठरविन तुम्हाला आत सोडायचे आहे की नाही ''

पहिला माणूस आपली कहानी सांगू लागला,
''एवढ्यात मला माझ्या बायकोवर संशय होताच... की तीचं कुठंतरी दुसरीकडे लफडं चालू असावं... म्हणून आज मी लवकर घरी आलो होतो की जेणेकरुन तिला रेड हॅन्डेड पकडावं... जेव्हा मी माझ्या 25 व्या मजल्यावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये गेलो... घरात काहीतरी मला खटकलं... पण घरात सर्वत्र शोध घेतला तरी कुणी सापडलं नाही... शेवटी मी बाल्कनीत गेलो आणि तिथे मला तो माणूस सापडला होता तो बाल्कनीत रेलींगला लोंबकळत होता... 25 मजले जमिनीपासून वर!... त्याला पाहताच माझा दिमाग सटकला आणि मी त्याला मारायला लागलो... हाताने पायाने सर्व प्रकाराने मी त्याला मारायला लागलो पण तो साला खाली पडतच नव्हता... शेवटी मी घरात परत आलो, एक हातोडा आणला आणि त्याच्या बोटांवर मारायला लागलो... तो काही जास्त वेळ ते सहन करु शकला नाही आणि तो खाली पडला... पण 25 व्या मजल्यावरुन पडूनही खाली तो एका झुडपात पडला आणि वाचला... माझं डोकं अजुनच सटकलं... मी किचनमध्ये गेलो आणि फ्रिज उचलून वरुन त्या माणसाच्या अंगावर टाकला... तो फ्रिज बरोबर त्याच्या अंगावर पडून तो जागच्या जागीच मेला.. पण तोपर्यंत माझा राग आणि ताण एवढा जास्त झाला होता की मीही हार्टअटॅक येवून बाल्कनीवर तिथल्या तिथेच मेलो..''

'' अरेरे ... तुझ्यासाठी आजचा दिवस फारच वाईट ठरला ... नाही?'' यम त्या माणसाला म्हणाला आणि त्याने त्याला आत घेतले.

रांगेतला दुसरा माणूस पुढे येताच यमाने त्यालाही तेच स्वर्ग जवळपास भरल्याचे सांगितले आणि त्याला त्याची कहानी सांगायला सांगितली.

दुसरा माणूस त्याची कहानी सांगायला लागला -

''आजचा दिवस माझ्यासाठी फारच चमत्कारीक होता... काय झालं मी 26व्या फ्लोअरवर माझ्या अपार्टमेंटमधे राहतो आणि रोज सकाळी मी माझ्या बाल्कनीत व्यायाम करीत असतो... पण आज काय झालं... मी व्यायाम करतांना घसरलो असेन किंवा तसंच काहीतरी ... कारण मी माझ्या बाल्कनीच्या काठावरुन खाली पडलो ... पण माझं नशिब चांगलं माझ्या खालच्या फ्लोअरच्या बाल्कनीचं रेलींग माझ्या हाताला लागलं... मला माहित होतं की मी असा जास्तवेळ लटकत राहू शकणार नाही... तेवढ्यात अचानक हा माणूस बाल्कनीत आला... मला वाटलं की चला आता हा आपल्याला वाचवणार .. पण तो साला मला लाथा बुक्याने मारायला लागला.. मी आटोकाट प्रयत्न करुन रेलींगला धरुन लटकत होतो पण तेवढ्यात हा साला आत गेला आणि हातोडा घेवून येवून माझ्या बोटांवर हातोड्याने मारायला लागला... शेवटी माझे हात सुटले आणि मी म्हटलं जावूद्या आपण काही आज वाचत नाही ... पण पुन्हा मी लकी ठरलो आणि खाली एका झुडपात पडलो... घाबरलो होतो पण मला विषेश लागलं नव्हतं... जेव्हा मी विचार करीत होतो की आपण ठिक आहोत... तेवढ्यात एक रेफ्रिजरेटर वरुन खाली माझ्या अंगावर पडलं ... आणि मी इथे पोहोचलो''
by: एक एकटा एकटाच

एक छोटीशी प्रेम कथा

होता एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करायचा..... म्हणतात ना शोधणारयाला देव हि मिळतो........... तसेच ह्याने तिला शोधले होते. तीन वर्षाच्या प्रयात्ना नंतर ह्याने तिला मिळवलं होत.. दोघेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे... तीच जरा जास्तच होत पण काय करणार दोघांची हि भेट होण शक्य नव्हती कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला.. फोन वर बोलन तसे दररोजचेच पण भेट फक्त सहा महिन्याने होत असे.........
पण एक दिवस पूर्ण नूरच पालाडतो.... ह्याला अचानक रक्ताच्या उलट्या होतात.. ह्याला डॉक्टर कडून समजत कि मला कर्क रोग झालाय आणि माझ्या हातात फक्त सहा महिने उरले आहेत.हा तिला समजू देत नाही.... कारण सहा महिन्यांनी तिचा वाढदिवस असतो.... आणि तिच्या वाढदिवशी ह्याला तिला पहायचे असते...

तिच्या वाढदिवसाला चार दिवस बाकी असतात..आणि ह्याला कळून चुकलेले असते कि आपली वेळ जवळ आलीय ..हा मनात विचार करतो कि हिच्या वाढदिवशी आपण हिला शेवटच पहायचं आणि मगच आपण आपले प्राण सोडायचे...सतत चार दिवस हा तिला त्याच ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी ह्यांची पहिली भेट झाली होती...तिच्या
कॉलेज मध्ये फंक्शन असल्या मुळे आपण वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी जाऊ असे त्याला सांगते...हा तिला शेवटच विचारतो कि तुला यायचं आहे कि नाही...कसलाही न विचार करता ती त्याला नाही सांगते...वाढदिवसाचा दिवस उजाडतो....ह्याची वेळ जवळ आलेली असते ह्याच्याकडे फक्त तीन मिनिटे असतात...हा तिला फोन करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो...हि त्याला विचारते काय करतोयस.........आणि हा शेवटी एवढच म्हणतो....

आज मी मृत्युच्या दारी उभा आहे ग........................ मरता मरता तुला
तुझ्या वाढदिवशी शेवटच पहायची मनापासून खूप इच्छा होती ग...पण तुही नाही म्हणालीस........... जाता जाता तुझ्या मिठी मध्ये यायचं होत पण तुला भेटायचे नव्हत................... तेव्हा तर
नाही पण मला मेल्यावर तरी मिठी मध्ये घेशील ना?????हि विचारते काय झाल आणि फोन कट होतो............ हि त्याच्या घरी येते पण वेळ निघून गेलेली असते......तिला त्याच्या आईकडून समजत.......हि जेव्हा त्याला आपल्या मिठी मध्ये घेऊन रडत असते तेव्हा त्याचा डावा हात खाली पडतो.. त्याच्या हातावर लिहिलेलं असत कि.................

ए जानु नको रडूस ग...
कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले मला माफ कर..............................
ह्यांने
ज्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी बोलवलं असत त्याच ठिकाणी हि प्रेम वेडी आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट पाहत असते... फक्त ह्याच आशेने कि तो कुणाच्या तरी रुपात येईल आणि तिला मिठीत घेईल... पण म्हणतात ना

(डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो.पण माथ्या आड गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही.........)
by : एक एकटा एकटाच

वाढदिवस

एका लहान मुलाचा वाढदिवस असतो...
तो त्याच्या वडिलांना विचारतो,
"बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला असे जुने कपडे का घातले आहेत???"
तेव्हा त्याचे वडील म्हणाले :
"कारण माझ्या कडे तितकेच पैसे आहेत बाळा कि मी एका साठीच कपडे घेवू शकतो ...
आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे घेण महत्वाचा आहे...."

२० वर्षांचा काळ लोटला
आता वडील मुलाला विचारत होते
"अरे तू सगळी रक्कम जमा का करत आहेस आणि जुनेच कपडे घालून फिरतोस..."

मुलगा म्हणाला:
"बाबा मला एका घर घ्यायचं त्या माणसाठी ज्याने मला खालून इतका वर आणलं
त्यांनी मला एक ओळख मिळवून दिली...."

बाप हि निशब्द झाला
मनात म्हटला "जीवन सार्थ झाल... आता डोळे मिटलो तरी चिंता नाही...."

मुलगा लगेच म्हणाला "बाबा मला तुमची अजून हि गरज आहे..."

त्यानंतर १ तास तरी दोघा बाप लेकाला अश्रू आवरले नाही...


Read This Heart Touching Stories