Search
Monday, February 27, 2012
Saturday, February 25, 2012
आपण कोण-कोण झाला आहात ?
एका झाडा खाली पोपट वाघ आणि डुक्कर राहत आसतात, त्यांची खूप मैत्री होती, ते एक मेका शिवाय राहू शकत नव्हते, एके दिवशी वादळ आल, आणि त्या वादळामध्ये झाड कोसळून खाली पडले, आणि या प्रसंगा मध्ये पोपट मरण पावले. आपला मित्र मरण पावल्यामुळे वाघ आजारी पडला आणि त्या आजारात त्याचा मृत्यू झाला. आपले दोन्ही मित्र मरण पावल्यामुळे डुक्कर सुद्धा त्या परीस्तीतीत जिवंत राहू शकत नव्हता, आणि त्याने सुद्धा त्या ठिकाणी आपले प्राण सोडले.
..खूप दिवसांनी ज्या ठिकाणी पोपट वाघ आणि डुक्कर मरण पावले होते त्या ठिकाणी एक ''मव्हाचे'' झाड रुजू लागले. पुढे मव्हाच्या झाडापासून मानवाने ''दारू'' बनवली. .. आणि म्हणूनच. ज्या वेळी माणूस दारू पितो त्यावेळी पहिले तो पोपट होतो ..आणि पोपटा सारख बोलू लागतो.
थोड्या वेळाने तो वाघ होतो..आणि कुणालाच मग तो ऐकत नाही, मीच मोठा-मोठा असे तो करतो. सगळ्यात शेवटी तो डुक्कर होतो.. आणि मग ज्या प्रमाणे डुक्कर चिखलात लोळतो त्याच प्रमाणे तो रस्तावर, गटारात लोळतो....
... आपण आता पर्यंत कोण कोण झाला आहात ?
Friday, February 24, 2012
दिनूचे बिल.
दिनूचे वडील डॉक्टर होते. दिनू कधीकधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे. तेथे पुष्कळसे लोक येत. कोणीतपासून घेण्यासाठी येत. कोणी औषधे घेण्यासाठी येत. कोणी म्हणे, "डॉक्टर, माझं पोट दुखतंय. मला तपासा."तर कोणी म्हणे, "डॉक्टर, माझं बिल किती झालं ते सांगा."
दिनू एका लहानश्या
खुर्चीवर बसून ते सारं पाहत असे व ऐकत असे. दवाखान्यातल्या ...बऱ्याचशा
गोष्टी त्याला आताकळू लागल्या होत्या, पण "बिल" म्हणजे काय, हे त्याला अजून कळले नव्हते.
दिनूने एकदा वडिलांना विचारले, "बाबा, बिल म्हणजे काय हो?"
डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला. "हे बघ. याला म्हणतात बिल. वाच!"
दिनू तो कागद वाचू लागला. त्यावर लिहिलं होतं -
_________________________________
रोग्याला तपासण्याबद्दल ... १० रुपये
दोनदा घरी येण्याबद्दल ... २० रुपये
आठ वेळा औषधांबद्दल ... ८ रुपये
________________________________
एकूण ... ३८ रुपये
________________________________
दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता. तो एकदम मध्येच हसला. त्याला काय
वाटले कोणास ठाऊक? काहीतरीविचार त्याच्या डोक्यात आला. घरी गेल्यावर दिनू
आपल्या खोलीत गेला आणि एका कागदावर त्याने आपल्याआईच्या नावावर एक बिल तयार
केले. त्याच्यावर लिहिलं होतं -
___________________________________________
आज बागेतून फुले आणल्याबद्दल ... ५० पैसे
बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल ... २ रुपये
शेजारच्या काकूंकडे निरोप दिल्याबद्दल ... १ रुपया
दुकानातून साखर आणल्याबद्दल ... ५० पैसे
______________________________ _____________
एकूण ... ४ रुपये
___________________________________________
ते बिल त्याने आपल्या आईच्या खोलीत नेऊन ठेवले. दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी
लवकर उठला. त्याच्या उशाशी ४ रुपये ठेवलेले होते. दिनूने ते उचलले. तेवढ्यात
तेथे ठेवलेला एक कागद त्याला दिसला. त्यावर काहीतरीलिहिलेले होते. त्याने
कागद उचलला व चटकन वाचला. आईने दिनूच्या नावावर एक बिल तयार केले होते.
________________________________________________________________
लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल ... काही नाही
चारदा आजारपणात दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल ... काही नाही
गोष्ट सांगून करमणूक केल्याबद्दल ... काही नाही
वाचायला शिकवल्याबद्दल ... काही नाही
______________________________ __________________________________
एकूण ... काही नाही.
________________________________________________________________
दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आले. त्याचा गळा भरून आला. त्याच्या हातातला कागद गळून पडला. ते पैसेघेऊन तो तसाच आईकडे धावत गेला. काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले, व तो आईच्या मांडीवर डोकेठेवून रडू लागला.
आईने दिनूला कुरवाळले. आणि त्याचा मुका घेत ती म्हणाली,
"तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं, दिनू!"
- आचार्य अत्रे
Subscribe to:
Posts (Atom)