Jayesh Gujrati's Blog (in Marathi)

Search

Tuesday, March 13, 2012

तो आणि ती

आज पहाट जरा मस्तच भासत होती,
त्यालाही जराशी धुंदी चढली होती.

बाहेर पाउस रिमझिम पडत होता, वाराही कुंद
जाहला होता...

तो आज खूप खुश होता, अगदी मनातून
भारला होता.

कारणही तसच होतं, आज तिच्या अन
त्याच्या लग्नाला एक वर्ष झालं होत...

ती तर त्याहुनही खुश होती,
अगदी मनाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होती
लग्नाला एक वर्ष तर झालंच होत, पण
ती त्याला आज "गुड न्यूज" देणार होती...



 सकाळी नाश्ता चालला होता, तिने आज
मोगरा माळला होता आणि सुवास मंद दरवळत
होता.

तिने आज त्याचे आवडते बटाटे पोहे केले होते,
तोही प्रत्येक घासाबरोबर तिला डोळे मिटकावून
दाद देत होता...

त्याच्या आईलाही हे कळत होत, ती पण मुद्दाम
मधेच खाकरून त्यांचा नजरभंग करत होती.

आणि तो अगदीच प्रेमाने तिच्या हातावर मधेच
एखादी थाप मारत होता...

संध्याकाळी आईकडून त्याने खास "परमिशन"
घेतली होती, आईनेही अगदी हसून ती दिली होती.
"इविनिंग शो" ची दोन तिकिटे काढली होती, मग
घरी तिघांचा डिनर असा मस्त बेत ठरला होता.
दोघे भलतेच खुश होते,

आई देखील त्यात सामील
झाली होती.

दृष्ट लागू नये असा त्यांचा संसार होता, पण
संसाराच काय त्याला कधी कधी प्रेमाचीच दृष्ट
लागते...

त्याने पैसे वाचवून हफ्त्याने
तिच्यासाठी स्कुटी बुक केली होती,

तिला ऑफिसला जायला गर्दीत त्रास होतो ना.
तीही काही कमी नव्हती पाच महिने पैसे वाचवून
एक हिऱ्याची अंगठी घेतली होती,

जणू संध्याकाळी ती घेऊन एका हिरयावर
दुसर्या हिरयाचा कळस चढवणार होती...

ऑफिस मधून संध्याकाळी एकमेकांनाफोन केले,
तिने त्याला त्यांच्या सोनाराच्या दुकानासमोर
भेटायला बोलावले.

त्याला कळून चुकलं होतं
काहीतरी महागडी भेटवस्तू मिळणार,

तो हि नवीन कोरी करकरीत स्कुटी घेऊन
तिला भेटायला निघाला होता...

तो तिथे पोचला त्याने स्कुटी लपवून पार्क
केली, म्हटलं "सरप्राईज" देईन.

ती त्याच्या आधीच तिथे पोचली होती,
आणि हिऱ्याची सुरेख अंगठी आपल्याच मुठीत
लपवली होती...

तो क्षण आला दोघांची नजरानजर झाली, त्याने
तिला दुरूनच हात केला.

तिनेही त्याला हात हलवून प्रतिसाद दिला, दोघे
एक-एक पाऊल पुढे सरकू लागले...

ती तर दोन-दोन पावले उडी मारून चालत होती,
तो आपल्या नेहमीच्या हास्यात
तिच्यावरची नजर ढळू देत नव्हता.

दोघांच्याही मनात एक पूर्ण वर्ष तरळत होतं,
आयुष्य भराची साथ हेच फक्त दिसत होतं...

ती पुढे आली दोघांमध्ये फक्त वीस-एक पावलेच
राहिली, ती वीस पावले पण आज कोसभरवाटत
होती.

पण अचानक तो मटकन खाली बसला, काय
होतंय हेच त्याला कळत नव्हतं...

त्याचा कानाचे पडदे फाटले होते?
नाही नाही धरणीकंपच झाला होता.
कि आभाळ फाटलं वीज
पडली त्याला काही काही उमजत नव्हतं,
नाही नाही हा तर बॉम्ब-स्फोट होता...

क्षणभरात तो भानावर आला, सगळी कडे फक्त
धूर कल्लोळ आगीचे लोट आणि अस्ताव्यस्त
भंग झालेली माणसे.

त्याला त्याची "ती" कुठेच दिसत नव्हती,
त्याची भिरभिरलेली नजर फक्त तिलाच शोधत
होती...

आणि त्याला ती दिसली ती तीच होती का?
साडी फाटलेली, अंग रक्ताने माखलेलं.

तिचं पूर्ण सौंदर्य रक्ताने लपलेलं होतं, अंग-
अंग छिन्न-विच्छिन्न झालं होतं...

तो धावला जीवाच्या आकांताने धावला, त्याने
तिचं डोकं मांडीवर घेतलं.

तिला जोरजोरात हाक मारली, अजून
थोडी आशा दिसत होती तिने डोळे उघडले...

त्याचे अश्रू तिच्या गालावर पडत होते, तेच
अश्रू तिचा अबोल चेहरा दाखवत रक्त दूर सारत
होते.

तो काही बोलणार इतक्यात तिने मुठउघडली,
आणि ती हिऱ्याची अंगठी जणू काही खुलून
हसली...

तिने मुठ उघडली, त्याला काय बोलावं काहीच
कळत नव्हतं.

तिच्या मुठीत ती चमकदार अंगठी लकाकत होती,
जणू घे मला बाहुपाशात खुणावत होती...

तो रडत होता थांब थांब म्हणत होता, पण
तिच्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते.

तिच्या चेहऱ्यावर होतं ते फक्त हलकसं स्मित,
कदाचित मरणापर्यंत साथ का हीच?

तिने ती अंगठी हळूच त्याच्या हातावर ठेवली,
त्याने तीचा हात घट्ट धरला होता.

हळूच तिची मुठ बंद झाली फक्त "टेककेअर"
म्हणून तिचे नाजूक ओठ बंद झाले, पण
तिच्या चेहऱ्यावरच ते जीवघेण "स्माईल"
आजही तसच होतं तसच होतं...

मैत्र जीवांचे

कधी कुठुन तो येईल आणि कचकचुन चावेल याचा नेम नव्हता. अख्खी रात्र अशीच घाबरत, या कुशीवरुन त्या कुशीवर काढली. झोप अनावर झाली होती पण.. खोलीत कुठेतरी तो आहेच... या नुसत्या कल्पनेनेही अंगावर काटा उभा राहीला होता. त्या पुर्वी त्याला इतक्या स्पष्ट, जवळ कधीच पाहीला नव्हता. पण काल रात्री मात्र.... एकाचे दोन.. दोनाचे चार... मग मात्र मला आणि माझ्या मैत्रीणीला हातात चप्पल घ्यावी लागली. 
 इतक्या महिन्यानंतर गप्पा रंगात आलेल्या असताना रंगाचा भंग करायला तो अचानकच कुठुन तरी यायचा. पहाटे पाच-सहा पर्यंत हा चोर-पोलिसाचा खेळ चालुच होता. माझ्या आयुष्यात मी त्याला काल प्रथमच पाहिलं. पण रात्रभर त्याला आणि त्याच्या फ़ौजेला शोधाशोधीच्या त्रासाचीही नंतर गंमत वाटु लागली. सकाळी पाच - सहा नंतर मात्र तो आणि त्याची फ़ौज बहुदा दमुन झोपली. तसंही बर्याच जणांची आम्ही रात्रभर पाण्यात टाकुन, चप्पलेने वगैरे कत्तलच केली होती. पण पहाटे पर्यंत आम्ही लढवलेली खिंड उद्या नक्कीच "पेस्ट कंट्रोल" वाल्या काकांच्या हाती द्यायची असं एकमताने ठरवुन... "ढेकुणां" बरोबरची लढाई आम्ही संपवली.
माझं घर कोकणात असल्यामुळे, जन्मापासुन १८-१९ वर्षांत घरातील, उंदीर, घुस, पाल, डोंगळे, आधेलं, विंचु, इंगळी, गोम (घोण), नाकतोडा, रातकिडा, वेगवेगळे किटक..इत्यादी प्राण्या-पक्ष्यांशी दोस्ती झाली होती. वेगवेगळ्या ऋतुंमध्ये ही मंडळी हमखास घरी भेटायला यायची. अजुनही पेस्ट कंट्रोल नावाचा प्रकार तिकडे वापरात आला नसल्यामुळे... आलेल्यांचं स्वागत आणि गेलेल्यांचे आभार मानुन सगळे गुण्यागोविंदाने राहात होतो. (पाहुण्यांसाठीही हेच लागु होतं.) पण या आमच्या ग्रुपमध्ये "ढेकुण" मात्र नव्हता. काल एकदाची त्याचीही चांगलीच ओळख झाली. "घर आमचं पण आहे!" हे वाक्य हे सगळेजण वारंवार मला जाणवुन देतात. तेव्हा... "नांदा पण सुखाने आणि जगा व जगु द्या!" हे एकच वाक्य म्हणण्याशिवाय गत्यंतर राहात नाही.


(सुचना: पुर्ण आयुष्य शहराच्या झगमगाटात आणि फ़िनाईल ने पुसलेल्या चकचकीत फ़रशांवर गेलेल्या व्यक्तींना कदाचित हे वर्णन रुचणार नाही. परंतु, कोकणातील शेणाने सारवलेल्या जमीनींना, मातीने लिंपलेल्या भिंतींना आणि तिथल्या घरगुती प्राणीसंग्रहालयाला ज्यांनी अनुभवलं आहे.. अशांना नक्कीच हे सर्व प्राणी ’मैत्र जीवांचे!" वाटतील यात शंका नाही.)
 
by-मुग्धा माईणकर

Saturday, March 10, 2012

First Gear

त्या दिवशी गाडी चालवत होतो. मुंबईत गाडी चालवायची म्हणजे क्लचब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जाणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली. 

गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअरटाकतो. हा 'फर्स्ट गिअरम्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई-बाबाजोडीदारमुलंजवळचे मित्र...


हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता 'पुढेजात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कारफर्स्ट गिअर करतो.



इथे आपल्याला unconditional प्रेम मिळतंसुरक्षितता मिळते. गाडी 'बंद पडणार नाहीयाची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी 'पळण्यासाठीइतका कमी वेग पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो ! इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं.

शाळा कॉलेजपुस्तकंमिडियाआपले छंदविविध कला..... बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहेहे कळतं.
समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो. गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घरकपडा लत्ताभांडीकुंडीपहिला फ्रीजपहिला टीव्हीप्रसंगानुरूप हॉटेलिंगसणासुदीला नवीन कपडेचांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअर मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्यपण आता तोच वेग कमी वाटू लागतो.
आपण आता 'फोर्थ गिअरटाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्सगाडी, latest मोबाईल, 1 BHK मधून 2 BHK, laptop, ह्याउ नि त्याउ..!

या वेगाची नशाच काही और! गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही...आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी... खर्व.... निखर्व......रुपये नाहीतगरजा! हा 'वेगखूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये, 'लालसिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं....
आणि... आणि.....आणि...

... 'नियतीनावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो.
गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो. पाच.. चार.. तीन..दोन...एक.... खाट खाट गिअर मागे टाकत आपण आता neutral वर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो.
पाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखील टाकला होता याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती...
आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं. 

गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे.. मला सांगा कुठला गिअर टाकाल ?

सुसाट वेगाचा पाचवा गिअर की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा 'फर्स्ट गिअर' ?

आयुष्यात जेव्हा पराभवाचेनिराशेचे क्षण आले होतेतेव्हा कोण होतं तुमच्या जवळकोणी दिला होता आधार आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने ?

EMI भरत विकत घेतलेल्या extra बेडरूमनेनव्या कोऱ्या गाडीने ? 'You are promoted' असं लिहिलेल्या कागदाने ?
मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने !
आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबानिरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, 'होईल सगळं व्यवस्थितम्हणत डोक्याला बाम चोळून देणारी 'बायकोनावाची मैत्रीणबाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, 'त्याकाळात आपल्या frustration चा 'कानहोणारे आणि योग्य सल्ला देणारे जिवाभावाचे मित्र हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते का ?
Don't get me wrong. माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही. त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया. फक्त त्यावेळी आपल्या 'फर्स्ट गिअर्सचं स्मरण ठेवूया.
आयुष्याचा वेग मधून मधून थोssडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.
सुसाट वेगाचा 'arrogance' इथे नाही... गाडी थोडी हळू चालेल हे मान्य. 'फर्स्ट गिअरचंअस्तित्व लक्षात घ्यावंच लागेल असा हा वेग असेल. 
त्या निवांतपणाशी थोडं खेळूया आणि मग टाकूया पुढचा गिअर !
जाता जाता आणखी एक.
स्वत:लाच एक प्रश्न विचारूया - दुसऱ्या कुणाच्या आयुष्याचा मी बनू शकेन का 'फर्स्ट गिअर' ?

Read This Heart Touching Stories