- शूर असावं तर राणा प्रतापसारखं.
- स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.
- देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.
- कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं.
- हुशार असावं तर बिरबलासारखं .
- धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.
- करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी.
- सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.
- सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.
- राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.
- बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.
- समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.
- अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.
- देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.
- निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.
- शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.
- राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.
- लग्न न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं
- लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.
- खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.
- लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.
- लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी.
- उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.
- सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.
- अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.
- व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.
- बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .
- गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.
- घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.
- बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.
- चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.
- भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.
- बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.
- प्रेमवीर असावं तर शोऐब मलिकसारखं.
- निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं
- प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.
- बाईने रूपवान व 'ग्रेसफुल' असावं तर गायत्री देवीसारखं.
- बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .
- निर्विष विनोद करावा तर पु.ल.देशपांडेसारखा.
- लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.
- लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.
- दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.
- त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.
- बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप लावून फिरायचं तर भालचंद्रनेमाडेसारखं.
- बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेत फिरायचं तर रामदासफुटाणेसारखं.
- आनंदात व उत्साहात जगायचं तर यशवंत देवांसारखं.
- रडत आणि कटकट करीत जगायचं तर माझ्यासारखं.
सौजन्य- शिरीष कणेकर यांचा 'सामना' मधील लेख