Jayesh Gujrati's Blog (in Marathi)

Search

Wednesday, March 21, 2012

अपयशाची किम्मत

अपयशास चाखल्याशिवाय यशाला किंमत येत नाही
पैलूंना पाडल्याशिवाय दगडाचा हिरा होत नाही
नुसती हळद पिल्याने गोरे होता येत नाही
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
 
रांजणात गोटे टाकल्याशिवाय कावळ्याची तहान भागत नाही
हातपाय हलवल्याशिवाय अंगण सरळ होत नाही
दे रे हरी पलंगावरी हरी नाही देत नाही
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही

आळशीपणामुळे सशाला शर्यत जिंकता येत नाही
मूर्ती कितीही मोठी तरी कीर्ती सहज येत नाही
प्रयत्नच केल्याशिवाय कविता लिहिता येत नाही
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही

 
स्त्रोत: ईन्टरनेट.

राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं .

  • राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं.
 
  • शूर असावं तर राणा प्रतापसारखं.
  • स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.
  • देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.
  • कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं.
  • हुशार असावं तर बिरबलासारखं .
  • धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.
  • करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी.
  • सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.
  • सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.
  • राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.
  • बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.
  • समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.
  • अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.
  • देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.
  • निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.
  • शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.
  • राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.
  • लग्न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं
  • लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.
  • खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.
  • लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.
  • लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी.
  • उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.
  • सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.
  • अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.
  • व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.
  • बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .
  • गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.
  • घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.
  • बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.
  • चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.
  • भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.
  • बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.
  • प्रेमवीर असावं तर शोऐब मलिकसारखं.
  • निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं
  • प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.
  • बाईने रूपवान 'ग्रेसफुल' असावं तर गायत्री देवीसारखं.
  • बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .
  • निर्विष विनोद करावा तर पु..देशपांडेसारखा.
  • लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.
  • लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.
  • दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.
  • त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.
  • बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप लावून फिरायचं तर भालचंद्रनेमाडेसारखं.
  • बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेत फिरायचं तर रामदासफुटाणेसारखं.
  • आनंदात उत्साहात जगायचं तर यशवंत देवांसारखं.
  • रडत आणि कटकट करीत जगायचं तर माझ्यासारखं.

सौजन्य- शिरीष कणेकर यांचा 'सामना' मधील लेख


Monday, March 19, 2012

Be Practical

आमच्या junior college मध्ये एक मुलगी होती.. खूपच सुंदर, निळे डोळे, ओठांवर एक निरागस हसू, गालावर खाली, सोन्यासारखा कांती होतीतिची... जणू काही ती एक अप्सराच होती.. हो, खरच...
सगळ्या मुली तिच्यावर जळायच्या.. आणि सगळे मुले तिच्यावर जीव ओवाळून टाकायचे.. 

पण ती मात्र स्वत:तच गुंग असायची..एक मुलगा तिला आवडायचा.. handsome dashing बोल्ड असा होता तो... तिला साजेसा.. 
योगायोगाने त्यालाही ती आवडायची... फिदा होता तो तिच्यावर... ते दोघे made for each other होते... तो तिला propose करणार होता... RoseDay  होता त्या दिवशी.. त्याने तिला एक मोठा Red Roses चा बुके दिला.. आणि सर्व college समोर तिला तो I Love You म्हणाला... ती हलकेच लाजली, आणि संमती दर्शविली... तेव्हा त्याने अख्या कॉलेज ला सामोसेखाऊ घातले होते.... 
Propose करताना तो तिला म्हणाला "आयुष्यात अगदी काहीही झालं तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही.. दुसऱ्या कुठल्या मुलीकडे कधी वळून सुद्धा बघणार नाही.. जर देवाने मला माझ्या life मध्ये आणि तुझ्या मध्ये काही एक choose करायला सांगितलं तर मी तुलाच choose करेल.. तू फक्त माझी आहेस.. गर्दीत तुला हरवू देणार नाही, तुझा हात कधीच हातातून निसटू देणार नाही.." ती म्हणाली, "मी सुद्धा तुझ्यावर तितकच प्रेम करते.."
एक दिवस ती गाडीवरून घरी येत होती, कानात headfone त्याचाशी बोलत होती.. बोलण्याच्या नादात तिला ट्रकचा होर्न ऐकूच नाही आला, आणि accident झाला.... खूपच गंभीर होता तो accident... त्यात तिचा डावा पाय ट्रक च्या खाली आला, आणि चुराडा झाला पायाचा... डोक्याला खूप लागल.. खूप रक्त गेल... ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.. घरच्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेल.. डॉक्टरांनी सांगितलं कि पाय पूर्णच गेलाय.. artificial पाय बसवावा लागेल.. इतका वेळ ती बेशुद्ध च होती.. ती शुद्धीवर आल्यावर तिला कळाल कि तिला दुसरा पायबसवलाय.. तो तिला भेटायला गेला होता.. त्याला फार वाईट वाटल.. पण तिने त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम नाही तर सहानुभूती पाहिली... नंतर हॉस्पिटल मध्ये तो तिला भेटायला यायचा.. पण खूप कमी बोलायचा.. एकदा तिने हिम्मत करून विचारला, "तू असा का वागतो आहेस?? काय झालाय तुला???" तो म्हणाला, "मला नाही वाटत कि मी हे relationship टिकवू शकेल पुढे..., आपण break up करून टाकू??" ती म्हणाली, "तू पण इतरांसारखाच आहेस... तू तर म्हणाला होतास कि काही झालं तरी माझी साथ सोडणार नाहिसं... मग आता काय झालं??? का ते प्रेम पण खोटं होतं???" तो म्हणाला, "Be Practical यार, मी तुझ्यासोबत आता माझा सगळं आयुष्य कस काढणार??"
शेवटी तो तिला सोडून निघून गेला,. कायमचा... का नाही जाणार??? तो Practical होता...
जो असं वागत नाही त्याला पश्चातापाशिवाय काहीही मिळत नाही...

काय वाटतं तुम्हाला...? शेवटची Line चुकली ना...? मग बदला तर... जशी तुम्हाला वाटते तशीच लिहून काढा... Comment मध्ये...
- Jayesh

Read This Heart Touching Stories