Search
Monday, April 02, 2012
Thursday, March 29, 2012
Mc' Donalds - Puneri Branch
'पुणेरी पाट्या' संस्कृतीचे आक्रमण
'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर?
- आमचे येथे बर्गर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
- शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
- दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
- कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.
- टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत
- टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
- कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. लहान साईज: १९ फ्राईज,
मध्यम: २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज - गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५
- पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.
- कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
- विनाकारण सॉस मागू नये. टोमेटो फुकट येत नाहीत.
- शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
- दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
- उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
- हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत
(ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून) - आमची कुठेही शाखा आहे !
(पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत) - कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत
Tuesday, March 27, 2012
औषधं
मुलगा नुकताच ऑफिस मधून थकून घरी आलेला. त्याच्या वडिलांना दम्याचाआजार असतो, ते विचारतात “बेटा माझे औषधं आणली काय, काल पासून संपली आहेत.” … …
मुलगा : “मी आज खूप थकून आलोआहे, मी उद्या घेवून येईन.”
बाप: “ठीक आहे बेटा तू आराम कर, खूप थकला असशील..!”
(रात्री अचानक त्याच्या वडिलांना त्रास सुरु होतो… घरी औषधं नसल्यानं त्यांना दवाखान्यात नेई पर्यंत त्यांचा मृत्यू होतो…)
काही दिवसांनंतर मुलाला त्याच्या रूम ची सफाई करतांना जुनी डायरी सापडते. ती त्याच्या वडिलांची असते.
त्यात त्याला ३० वर्ष अगोदरची एक लिहिलेली नोंद सापडते, ती असते.. “आज माझ्या सोन्याला ताप आला होता, ‘Taxi’ न मिळाल्यामुळे व दवाखान्याची लिफ्ट बंद असल्यामुळे त्याला खांद्यावर नेतांना थोडा त्रास झाला, पण माझं बाळ आता शांत झोपी गेला आहे.." (वेळ : रात्री २ वाजता..)
त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण … आता सर्व संपले होते.
प्लीज नेवर हर्ट युअर पॅरेंटस… व्हाटेवर यु आर… इज ओन्ली बिकोझ ऑफ देम…!
by: एक एकटा एकटाच

Subscribe to:
Posts (Atom)