Jayesh Gujrati's Blog (in Marathi)

Search

Friday, April 13, 2012

गोल्ड मेडल

दोघं एकाच शाळेत आणि मग एकाच कॉलेज मधे होते. इतक्या वर्षांची छान मैत्री होती दोघांची.

ती - दिसायला अतिशय सुंदर, सतत बोलणारी, सतत हसणारी, खूप हुषार.

... तो - अतिशय साधा, गप्प-गप्प राहणारा, अगदी चार-चौघांसारखा.
...

सतत बरोबर असायचे दोघं - अभ्यास, खेळ, सिनेमा, पिकनिक, टाइम-पास - काहीही असो - ना ती कधी त्याला बोलवायला विसरायची, ना तो कधी तिला सोडुन कुठे जायचा.. खरं म्हणजे ती त्याला हक्कानेच बोलवायची.. आणि त्याला तिला सोडुन कुठे एकटं जाणं शक्यच नव्हतं.."अरे! आज मला युनिव्हरसिटीत थोडं काम आहे. येतोस का बरोबर?"


असा नुसता तिचा फोन आला.. आणि तो जेवण अर्धवट सोडुन तसाच बाईक घेऊन तिच्या घरी पोचला. त्याची आई म्हणतच राहिली त्याच्या पाठीमागे, "अरे, निदान जेवण तरी संपव..." पण त्याला कुठे भान होता... 

बाईकवर ती नेहमी त्याच्याच मागे बसायची. आणि तो ही दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीला मागे बसु द्यायचा नाही. 

ती दमली असेल तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची. तीचे केस वाऱ्यानी उडायचे, हलकेच त्याच्या गालवर 

बसुन त्याला गुदगुली व्हायची.

लहानपणापासुनच दोघं एकत्र असल्याने दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं.

तिचं एक स्वप्न होतं - तिला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल हवं होतं. त्या करता ती मेहनतही तशी घेत होती. तास न तास अभ्यास करत होती. सोबतीला तो बसुन रहायचा. तिला झोप येऊ नये, तिचं concentration राहावं म्हणुन रात्री तिला तिची आवडती कॉफी करुन द्यायचा. तिचा वेळ नको वाया जायला म्हणुन तिच्या करता नोट्स, पेपर्स झेरॉक्स करुन आणायचा.

परीक्षा झाली. निकाल लागले. त्याला फर्स्ट क्लास मिळाला. त्याच्या करता तो खरं जास्तीच होता. आणि ती? 

तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिला गोल्ड मेडल मिळालं..


त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला.

हातात एक लाल गुलाबाचं फुल होतं तिच्या.

तो प्रचंड खुष होता - फर्स्ट क्लास करता नाही, तर तिला गोल्ड मेडल मिळालं म्हणुन.

"आज मी खूप खुष आहे. एक गंमत झाली.

तुला विनय आठवतोय? दादाचा बेस्ट फ्रेंड? अमेरीकेला असतो गेले २ वर्ष.

परवाच आला तो १५ दिवसांकरता, आज त्याला कळलं माझ्या रिझल्ट बद्दल. म्हणुन हे गुलाब घेऊन आला मला congratulate करायला. आणि 

त्यानी मला चक्क प्रपोज केलं!! म्हणजे पूर्वी तो इथे असताना माझा क्रश होताच त्याच्यावर. पण मला कधी वाटलं नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम असलं तरी तो माझ्याकडे बघेल म्हणुन! मला म्हट्ला की अमेरीकेला मला पुढचं शिकता येईल.

आई-बाबांना सुद्धा तो पटला. त्यांनी पण लगेच हो सांगीतलं. येत्या रविवारी साखरपुडा आहे. त्याला लवकर 

परत जायचं आहे ना...म्हट्लं तुला येऊन आधी सांगते.

तुला पण कोणी आवडत असेल, तर तु मलाच पहिलं सांगशील ना?"


तो गप्प राहिला... नेहमी सारखा.. नुसतंच "हं" केलं..

तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी.. ती त्या गुलाबाकडेच बघत होती

Wednesday, April 11, 2012

सुंदरतेची किंमत


तिला पाहण्यासाठी आम्ही बसच्या मागे धाव धाव धावायचं,
मग का देवाने आमच्यावर दहा पैकी फक्त ५ वेळाच पावायचं???
तुमच्यासाठी आम्ही त्या लोकांशी नडायचं,
... तुला पाहण्यासाठी त्या गर्दीमधून बस मध्ये चढायचं.


...बसमधल्या त्या सहा सीट आमच्यासाठी खूप खास असतात,
अहो असणारच ना...त्या सीटवर "अप्सरा" बसतात,

पुरुषांच्या सीटवर हि त्या हक्काने बसतात,
आम्ही त्यांच्या सीट वर बसलो कि त्याच "महामाया" तूच्छ नजरेने बघतात.


तुम्ही ऑनलाईन दिसल्यावर आम्ही तुम्हाला "हाय हाय" करायचं,
आणि तुम्ही भाव खात पटकन "बाय बाय" टाईप करायचं,
आम्हाला पण मन असतं कार्टीन्नो !!,
शहाण्या ना तुम्ही????........मग या पुढे असं नाही हा करायचं.

केसात तुम्ही सुगंधी फुलांना माळायचं, (नोट :दुर्मिळ आहे हे,हल्ली मुलींना इतके केस नसतात.)
"Beautiful Girl " बोलून आम्ही तुमच्यावर भाळायचं,
आमच्यासाठीच सजून आमच्याकडेच पाहून तुम्ही नाक मूरडायचं,
"पटली बहुतेक" या नुकत्याच मनातल्या बुड्बुड्याला तुम्ही पायाखाली चीरडायचं.


असताच तुम्ही सुंदर.......नाही कोणी म्हटलंय?????
पण ब्रह्मदेव एक पुरूषच आहे....त्याच्यामुळेच तुमच्यात हे सौंदर्य साठलंय.
आम्हाला पाहून असं वाट बदलायला रस्त्यात नाही मुडायचं,
आम्हीच पंख आहोत तुमचे.......पोरींनो.....उगाच इतकं नाही उडायचं.

त्या दिवसाची काळजी करा,ज्या दिवशी तुम्ही आमच्यासाठी सजणार,
पण एकही मुलगा तुम्हाला ढुंकून हि नाही बघणार.
ज्या दिवशी आम्ही मुलांनी तुमच्या कडे पाठ फिरवली,

त्या दिवशी तुमच्या सुंदरतेची किंमत शून्य झाली

Tuesday, April 10, 2012

प्रेमविवाह

मी यंदाच्या सुट्टीत माझ्या काकांच्या घरी गेलो होतो. त्याचं घर गावापासून थोडस दूर आहे. काकांचा दुधाचा व्यवसाय आहे, तिथेच त्यांच्या कडे काम करत असलेल्या मुलाची हि कथा आहे. 

त्या मुलाच एका मुलीवर खूप प्रेम होत आणि त्यामुलीच सुद्धा. दोघेही एकाच जातीचे होते पण दोघांच्याही घरातून त्यांच्या लग्नसाठी विरोध होता. ज्यादिवशी मुलीच्या घरच्यांना त्याच्या बद्दल कळाले तेव्हा त्यांनी त्या मुलाला खूप मार मार मारले आणि गावाच्या बाहेर नेवून फेकून दिले. मुलाच नशिब  चांगल म्हणून तो बिचारा कसाबसा त्यातून वाचला. त्याच्या घरच्यांनी त्याला दुसऱ्या एका लांब गावात आपल्या नातेवायकांकडे उपचारासाठी आणून ठेवले. दोन महिन्यात तो बरा झाला, पण त्याला तिच्याशीच लग्न  करायचं होत. 


त्याने तिला संपर्क केला आणि त्या दोघांच असे ठरले कि गावात त्या मुलाच्या मित्रांची मदत घेवून तिथून पळून जायचं. पण एक मोठी अडचण हि होती कि त्या मुलीला १८ वर्ष पूर्ण होण्यासाठी ३ महिने बाकी होते. त्या मुलाच्या मित्राने त्याला एक कल्पना सुचवली. तुम्ही इथून पळून जा, देवळात लग्न करा आणि तीन महिने मी सांगतो त्या ठिकाणी लपून राहा. माझ्या ओळखीच एक गृहस्थ आहेत ज्यांचा दूधाच व्यवसाय आहे आणि त्याचं घर सुद्धा गावापासून थोड लांब आहे. (ते म्हणजे माझे काका) तू त्यांच्या कडे नोकरी कर ते तुला माझ्या सांगण्यावर राहायला एखाध छोटास घर पण देतील आणि तुला नोकरी पण. 

ठरल्या प्रमाणे सर्व झाल देवळात लग्न करून त्या दोघांना त्याचा तो मित्र माझ्या काकांकडे घेवून आला. सर्व प्रकार सांगितला काकांनी राहायला घर आणि नोकरी पण दिली, ती मुलगी पण शिकलेली होती त्यामुळे तिनेही काकांच्या मुलाचा HOMEWORK घ्यायचं काम केल. पण त्यादिवशी प्रकरण काही वेगळाच वाटत होत. मी घरातून बाहेर बघितल तर तो मुलगा आणि ती मुलगी दोघ खूप टेन्शन मध्ये दिसत होती मुलगातर खूप घाबरला होता.  आणि ती मुलगी खाली मन घालून उभी होती. ते दोघ माझ्या काकांशी काही बोलत होते. 

काकांना विचारल्यावर मला कळाले कि मुलीच्या घरच्यांनी त्या मुला विरुद्ध तक्रार नोंदवली पोलीस स्टेशनमध्ये, पोलिसांनी तपास करत त्या मुलाचा शोध लावला ज्याने त्या दोघांना पळण्यात मदत करून काकांकडे आणून सोडले होते. त्याची कसून चौकशी केली त्याला खूप मारल पण तरीही त्या मुलाने आपले तोंड नाही उघडले. पोलीस त्याला सतत त्रास देतच होते. पण त्या मुलाच्या सासूला माहित होते कि आपल्या जावयाने त्या दोघांना कुठे लपवून ठेवलेय ते. पोलीस सारखे आपल्या जावयाला त्रास देतायत हे पाहून तिने पोलिसांना खर काय ते सांगून टाकले होते. ह्याच सर्व टेन्शन मुळे ते घाबरले होते. पोलीस कधीही तिथे पोचले असते. त्यामुळे काका आणि काकांचा मोठा मुलगा दोघाही विचारात पडले होते त्या मुलीला १८ पूर्ण व्हायला अजून एक महिना बाकी होता. अजून एकाच महिना कसातरी लपून राहायचा होता. तितक्यात काकांना एक मित्राच घर आठवले जे औरंगाबादला होते. काकांनी त्यांना सांगितले कि तुम्ही आताच्या आता तिकडे निघा मी माझ्या मित्राला फोन करून सांगतो. तो तुमची सर्व सोय करेल एक महिना तिथे थांबा मग मी तुमच लग्न लावून देयीन आणि मग इथेच राहा माझ्याकडे. 

पण ते दोघेही खूप घाबरले होते अजूनही. त्यांनी कपडे भरले ब्यागेत आणि मीच त्यांना सोडायला गेलो त्यांना ST पकडून स्टेशनला जायचे होते आणि तिथून रात्रीच्या ट्रेनने औरंगाबादला. मी त्यांना माझ्याकडून जमेल तितक धीर देण्याचा प्रयत्न केला निघताना. खूप समजावलं आणि अजिबात टेन्शन घेवू नका आम्ही सर्व तुमच्या बाजूने आहोत सांगितले आणि निरोप घेवून मी निघालो. मी घरी त्यांना सोडून संध्याकाळी घरी आलो....आम्ही सर्व त्यांच्या बद्दलच विचार करत बसलो होतो. नंतर रात्री जेवायच्या वेळेस आम्ही एकत्र जेवायला बसलो पण काका जेवायला नाही आले. म्हणाले मी नंतर बसतो तुम्ही जेवा. 

आमच जेवून झाल्या वर मी काकांकडे आलो जेवायला काकी बोलावते आहे हा निरोप घेवून पण पाहतो तर काका रडत होते मी सर्वांना बोलावले सर्वजण काकांना विचारात होते कि नक्की काय झालाय तुम्ही का रडत आहात. काका म्हणाले रेल्वे पोलीस स्टेशन  मधून फोन आला होता, एका झोडप्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केलीय. त्या मुलाच्या खिशात तुमच विझिटिंग कार्ड मिळाल, म्हणून कॉल केला जर तुम्ही ह्यांना ओळखत असाल तर लवकर स्टेशनला या. आम्ही सर्व सुन्न झालो काका काकी आणि सर्वच खूप रडत होतो. नंतर आम्ही स्टेशनला गेलो. प्रत्येक्षदर्शिने सांगितले कि ते रात्री ८ वाजल्या पासून प्लाटफार्म वर  बसले होते आणि एकमेकांच्या मिठीत सारखे रडत होते, आणि खूप घाबरलेले होते त्यांना औरंगाबादला जायचं असे तो मुलगा एकदा बोलला. पण अजून काही बोलत नव्हते ते दोघ. आणि नंतर अचानक काय झाले आणि एक फास्ट एक्स्प्रेसच्या समोर त्यांनी धावत जावून उडी मारली. आणि सर्व काही संपल. मला तर काहीच समजत नव्हते.....अजून काय करायला पाहिजे होते म्हणजे ते दोघ सुखी झाले असते. माझी खूप इच्चा होती कि त्यांचा सुखाच संसार व्हावा. पण नियतीला ते मान्य नव्हते. 

मूळ कथा - अलोक अकसे

Read This Heart Touching Stories