आपला मुलगा/मुलगी पास झाल्यावर अगदी आनंदी होऊन आपल्या पाल्याबाबत सगळ्यांना सांगणारी आई सगळ्यांना दिसते... पण मागून हळूच मिठाइच्या दुकानात जाऊन पेढ्यांचा box आणणारा बाप कोणालाच दिसत नाही...
पायाला कुठे छोटीसी ठेस लागली तर तोंडातून लगेच निघतं... "आई गं..." पण तेच एखादा truck समोर आला तर... "बाप रे..."
आई सौम्य असते... ती आपल्या भावना व्यक्त करते... बाप कठोर असतो... किंबहुना
ह्या धकाधकीच्या जीवनात जगतांना त्याला कठोर व्हावंच लागतं...
पण मनात वादळ उठलेलं असतांना चेहऱ्यावर काहीच झालेलं नाही हे दाखवण्यासाठी खूप सामर्थ्य लागतं... आणि ते बापामधेच असतं....
No comments:
Post a Comment