एक
६ - ७ वर्षाचा लहान मुलगा मॉल मध्ये आला. त्याला एक डॉल विकत घ्यायची होती
पण दुकाणदार त्याला समजावत होता कि तुझ्याकडे पैसे कमी आहेत मी हि डॉल
तुला नाही देवू शकत. मुलगा खूप दुखी होवून त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या
एका बाईला विचारतो "आजी खरच माझ्याकडे कमी पैसे आहेत का? तर ती म्हणते हो
बाळा तुझ्याकडे तितके पैसे नाहीत"
हे बोलून ती तिथून निघून जाते, मुलाच्या डोळ्यात पाणी बघून मला राहवलं नाही मी त्याच्या
जवळ गेलो त्याला विचारल तुला हि डॉल कशाला हवी आहे? तर तो बोलला माझ्या
लहान बहिणीला हि डॉल खूप आवडली होती आणि तिला वाटतंय कि सान्ता क्रिसमसला
तिला हि डॉल गिफ्ट करेल....
तर मी म्हंटल मग सान्ता देयेल ना हि
डॉल तुझ्या बहिणीला, तो खूप दुखी होवून म्हणाला कि सान्ता तिकडे जावू नाही
शकणार मला हि डॉल माझ्या आईकडे द्यायची आहे, कारण माझी बहिण देवाकडे गेली
आहे असे बाबा म्हणाले, आणि ते बोलले कि आई पण लवकरच तिकडे जाणार आहे, आई
कडे खूप कमी वेळ आहे म्हणून मी आईला बोललो आहे कि तू मी मॉल मधून येई
पर्यंत थांब ....
"म्हणून हि डॉल मला आईकडे देवून ती बहिणीसाठी
पाठवायची आहे...." हे बोलल्यावर माझ्या डोळ्यातून पाणी आले..... मी त्याला
पटकन बोललो "तू एक काम कर ते पैसे आपण परत मोजू बघू कदाचित ते असतील
बरोबर...." आणि मोजता मोजता मी त्यात कमी पडणारे पैसे माझ्या खिशातून टाकले
टोटल केल्यावर मुलगा खूप खुश झाला कारण त्यात थोडे अधिक पैसे उरले डॉल विकत
घेवून सुद्धा मग तो मला बोलला कि मी काल रात्री देवाकडे प्राथना केली होती
कि माझ्याकडे पैसे उरावे डॉल घेवून सुद्धा कारण मला माझ्या आईसाठी सफेद
गुलाब पण घ्यायचं आहे कारण माझ्या आईला ते खूप आवडतात.
आता तो
मुलगा तिथून निघून गेला.. माझी खरेदी मी एका विचित्र मूड मध्ये संपवली पण
काही केल्या माझ्या मनातून त्या मुलाचे विचार काही जात नव्हते. नंतर मला
आठवले कि दोन दिवसापूर्वी वर्तमान पत्रात एक बातमी वाचली होती कि एका ट्रक
ड्राईवरणे दारू पिवून वाहन चालवत एका रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला तिच्या
लहान मुली सकट उडवले होते आणि त्यात ती लहान मुलगी जागीच ठार झाली.
ती महिला लास्ट स्टेजला आहे हे आठवल्यामुळे मला अजूनच ह्या सर्वाचा खूप
मोठा धक्का बसला आणि लगेच दुसऱ्या दिवशी बातमी आली कि ती महिला मरण पावली
मी लगेच पत्ता शोधून त्या महिलेच्या funeral ला गेलो तिथे गेल्या वर बघितले
तर ती महिला कॉफ्फिन मध्ये होती आणि तो लहान मुलगा तिच्या हातात एक सफेद
गुलाब आणि ती डोल ठेवत होता. माझ्या डोळ्यातून अश्रू काही केल्या थांबत
नव्हते मनात आले कि ह्या मुलाच सर्व काही त्या ट्रक ड्राईवरणे क्षणात
संपवून टाकले होते.
No comments:
Post a Comment