देवाने पृथ्वी निर्माण केली,..... तिथे राहणाऱ्या विविध प्राणी पक्ष्यांची
उत्पत्ती केली. सारे नवीन,........... सगळे प्राणी पक्षी एकमेकांकडे
कुतूहलाने पाहत होते, एकमेकांशी ओळख करून घेत होते. जो तो समोर
येणाऱ्या प्रत्येक जीव जनावरच्या विशिष्ट रचनेवर आश्चर्य व्यक्त करत होता.
कोणाचे कान मोठे, कोणाची मान लांब, कोणी अवाढव्य तर कोणी अगदी इवलेसे.
चर्चा, ओळख पाळख सुरु होती. आणि विशेष म्हणजे या सगळ्यानमध्ये माणूस सुद्धा होता. माणसाकडे कुतूहलाने पाहत सगळेच म्हणत होते, "हा प्राणी फारच सुंदर आणि आपल्याहून हुशार आहे." हे माणसाने ऐकलं आणि फार खुश झाला.
आपली स्तुती ऐकता ऐकता त्याला स्वतः बद्दल काही तरी वेगळा ऐकू आलं.......... काही हत्ती त्याच्या बद्दल बोलत होते. न राहून त्याने एका हत्ती ला विचारल. "तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का ?" हत्ती: "हो......... म्हणजे बघ ना, देवाने आम्हाला सर्वांना एवढा मोठ्ठा पोट दिलाय आणि तुला फक्त वितभर." हे ऐकून सगळ्यांनीच सहमती दर्शवत म्हटले "हो, हे चुकीच आहे." हे ऐकून माणूस नाराज झाला.
रागाने तो पुन्हा देवा जवळ गेला, आणि विचारू लागला, "देवा माझ्यावर हा
अन्याय का ? त्या सर्व जनावरांना एवढा मोठ पोट दिलंस, मग मला इतका लहान का ?"
देव: "तू नको चिंता करू , मी तुला जेवढं पोट दिलंय ना ते योग्यच आहे . विश्वास ठेव." माणूस: "नाही, ते काही नाही. तू दुजा भाव करतोयस देवा, मला हि इतरांसारखं मोठ पोट हवंय. मी नाही ऐकणार." देव: "बर ठीक आहे, देतो मी तुला मोठ पोट. पण एक गोष्ट !" माणूस: "काय देवा ?" देव: "मी तुला आता दिलेलं पोट आहे ना ते आधी पूर्ण भरून ये. ते भरलं कि तू मला सांग. मी लगेच तुला मोठ पोट देईन." हे ऐकून माणूस कुश झाला आणि आनंदाने पृथ्वीवर परतला. पण मग पुढे काय झाल ?............................................
कित्येक वर्ष, भला मोठा काळ, चार युग लोटली, कलियुग आलं...............
आणि या युगात तर माणूस खातोच आहे................. पण अजून तो देवाला
सांगायला नाही गेलाय कि देवा माझ पोट भरलंय......... काय ? पटतंय ना आजची परिस्थिती पाहून ?
No comments:
Post a Comment