Jayesh Gujrati's Blog (in Marathi): खुप विसरण्याचा प्रयत्न करतोय
Search
Thursday, February 16, 2012
खुप विसरण्याचा प्रयत्न करतोय
कधीच न्हवत वाटल मला अस पण घडेल... चार दिवसाच्या प्रेमासाठी आयुष्यभर रडेन नेहमी मला म्हणायची ती
डिअर आपण वेगळ नाही व्हायच लग्न करून आपण खुप सुखात रहायच कितीही झाला विरोध तरी लग्न नाही मोडायच आपल हे सुंदर प्रेम अर्ध्यावर कधी च नाही सोडायच अशा तिच्या गप्पा गोष्टी मला नेहमीच छान वाटायच्या आणि दूर स्वप्नात घेउन मला जायच्या मी सुद्धा वेड्या सारखा खुश होउन जायचो दिवस रात्र तिच्याशिच गप्पा मारत बसायचो आठवून तीच बोलनं खुप-खुप हसायचो आणि येनार्य़ा प्रत्येक स्थळाला नकार मी दयायचो दोन दिवस तिचा एस-एम-एस नाही आला म्हणून मीच तिला बाहेरून कॉल केला घरातील फोन आणि मोबाइल सगळ स्विच ऑफ होत भारावलेल्या माझ्या मनाला काहीच सुचत न्हवत तिच्या क्वालिनित गेल्यावर समजल तीच लग्न ठरलय एंगेजमेंट साठी पाहुन्यान्नी सार घर भरलय थरथरत्या पाउलांनि मी तिच्या घरी गेलो ती त्या मुलाला पेढे भरवतेय पाहून भाराउनच गेलो परक्या पाहून्या सारखी ती माझ्या कड़े पहात होती आणि माझ्या डोळ्यातील आसव ओठा वर येत होती ...... खुप-खुप रडलो पण तिला माया येत न्हवती कारण ती तर फ़क्त गरजे पुरतीच जवळ होती.........
Soooooooooooo Sad
ReplyDeleteThanks for Reading and showing interest in my Blog...!
Delete