Jayesh Gujrati's Blog (in Marathi): Love Story

Search

Showing posts with label Love Story. Show all posts
Showing posts with label Love Story. Show all posts

Wednesday, February 22, 2012

७ वी ला असताना ...

एका मुलाची कथा
 

७ वी ला असताना ...

मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो ..
ती माझी "बेस्ट फ्रेंड" होती ...
मला ती खरच खूप आवडायची,
पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत
आणि ते मला माहित होत....




वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या
मी तिला दिल्या
ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही
 "माहित नाही का.....??"

कॉलेजला असताना ...
माझ्या फोन वर call आला...
तिचाचं होता तो ...
ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती,
आणि ती मला सांगत होती तिचं ज्याच्या वर प्रेम होतं त्याने कसा त्रास दिला तिला...
तिने मला भेटायला बोलवलं होत,
मी तिला भेटायला गेलो...
मी तिच्या समोरचं बसलो होतो
मी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो...
२ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं...
मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी चित्रपटाची तिकीट काढली...
पण तिने मला म्हटलं मी झोपते..
तिने म्हटलं "बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..."
खूप वेळा शांत उभे होतो...
मग मी निघालो...
आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे ...
माहित नाही का...?
.

सिनियर वर्षाला

आमच्या कॉलेज मध्ये prom night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एका जोडीत जायचं
ती माझ्या locker जवळ आली आणि म्हणाली...
माझ्या सोबत कोणी नाहीये ... तु माझ्या सोबत येशील...
माझ्या सोबत हि कोणी नव्हत...
आम्ही दोघांनी "बेस्ट फ्रेंड्स " ह्या नात्याने जाण्याचा निर्णय घेतला ...
 

PROM Night ला ...

Prom NIGHT ला सगळ काही निट झालं..
आम्ही दोघे निघालो... मी तिची वाट पाहत होतो...
ती तेवढ्यात आली... तिने माझ्या कडे बघून एक smile दिली
आज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही..
पण मी खुश होतो... कि ती खुश आहे...

GRADUATION DAY ला ...

दिवसा मागून दिवस गेले...
आठवडे लोटले किती तरी महिने गेले
तिला काही बोलण्या आधीच was graduation day आला ...
मी तिला पाहिलं ...
तीने साडी नेसली होती... खूप छान दिसत होती..
माझ तिच्यावर एकतर्फी प्रेम होत पण काय करणार तिच जमत नव्हत ना
आमची शेवटीची भेट होणार होती...
ती समोरून आली... मला तर काही बोलताच आलं नाही...
तिने माझ्या चेहर्यावरून हात फिरवला ...

आणि म्हटली "आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे.."
बघाना गंमत आज हि जमल नाही बोलायला
काही वर्षांनी ...

मी लग्नात आलो होतो...
आणि ते लग्न होत तीचं .. तिचं दुसर्या सोबत लग्न ठरलं होत ..
माझं प्रेम कधी व्यक्तच नाही करता आलं...पण तिला मैत्रीचः नात जास्त पसंत होत आणि मी तेवढचं निभावल....
"तू आज हि माझ्या सोबत आहेस " असं ती म्हणाली डोळ्यातले अश्रू लपवत हो म्हटले ..
आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्या वर प्रेम आहे..

खूप वर्षांनी ...

मी आमच्या शाळेत एकदा गेलो .
तिथे आमच्या वर्गातले सर्वजन आले होते...
ती हि...
तिथे प्रत्येकाने आपली लहानपणी लिहिलेली पत्र ठेवली होती...
मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं... आणि वाचायला लागलो...

7th: "वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो... किती वेडा आहे हा मुलगा"

College Year: "आज हि मी त्याला खोटं सांगितलं कि माझं ब्रेकअप झालं तरी हा वेडा माझ्या साठी आला"
 
Prom Night: "आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्या वर प्रेम आहे .... मी वाट बघतेय...मला त्याला सांगावस वाटतंय कि माझं हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे..."
 
Graduation Year: "किती लाजाळू आहे हा, साडीत पाहून काही बोलला नाही"
 

Marriage Day: "आज माझा लग्न आहे... माझा त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं नाही तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील..."
 
 

ते वाचल्या नंतर तो तिथेच रडायला लागला...
आणि त्याने पाहिलं तर समोर तीही आज रडत होती...
कारण एकाचा दोघांचा असीम प्रेम पण जमल नाही व्यक्त करायला
 
  
Vishal.......♥

Thursday, February 16, 2012

खुप विसरण्याचा प्रयत्न करतोय

कधीच न्हवत वाटल मला
अस पण घडेल...
चार दिवसाच्या प्रेमासाठी
आयुष्यभर रडेन
नेहमी मला म्हणायची ती

डिअर आपण वेगळ नाही व्हायच
लग्न करून आपण खुप सुखात रहायच
कितीही झाला विरोध तरी
लग्न नाही मोडायच
आपल हे सुंदर प्रेम अर्ध्यावर
कधी च नाही सोडायच
अशा तिच्या गप्पा गोष्टी
मला नेहमीच छान वाटायच्या
आणि दूर स्वप्नात घेउन मला जायच्या
मी सुद्धा वेड्या सारखा खुश होउन जायचो
दिवस रात्र तिच्याशिच गप्पा मारत बसायचो
आठवून तीच बोलनं  खुप-खुप हसायचो
आणि येनार्य़ा  प्रत्येक स्थळाला नकार मी दयायचो
दोन दिवस तिचा एस-एम-एस नाही आला
म्हणून मीच तिला बाहेरून कॉल केला
घरातील फोन आणि मोबाइल सगळ
स्विच ऑफ होत
भारावलेल्या माझ्या मनाला काहीच सुचत न्हवत
तिच्या  क्वालिनित गेल्यावर समजल
तीच लग्न ठरलय
एंगेजमेंट साठी पाहुन्यान्नी सार घर भरलय
थरथरत्या पाउलांनि
मी तिच्या घरी गेलो
ती त्या मुलाला पेढे भरवतेय पाहून
भाराउनच गेलो
परक्या पाहून्या सारखी ती
माझ्या कड़े पहात होती
आणि माझ्या डोळ्यातील आसव
ओठा वर येत होती ......
खुप-खुप रडलो पण तिला माया येत न्हवती
कारण ती तर फ़क्त गरजे पुरतीच जवळ होती.........
 
by :तुझ्याविना एक एकटा एकटाच मी

Tuesday, February 14, 2012

१०:१५ ची CST लोकल

१० :१५ ची CST लोकल ट्रेन सुटली .. धावता धावताच तो चढला .. धावत पळत.. कसा बसा गर्दीतून तो आत शिरला.. आत मध्ये येताच क्षणी त्याची नजर पुढच्या दरवाज्या जवळ… तो पूर्णपणे कावरा बावरा.. बहुतेक त्याची नजर तिलाच शोधात असावी.. बराच वेळ.. त्याने पाहिलं .. पुढच्या दोन्ही दरवाज्यांजवळ येऊन पाहिलं.. त्याच्या नजरेत.. एक भीती.. एक हुरहूर.. तिच्याबद्दलची काळजी.. दिसत होती.. त्याने गर्दीतून शेवटी वाट काढत पुढच्या दरवाज्याजवळ येऊन परत खात्री केली.. रुमाल काढून घाम पुसला.. लगेच काहीतरी आठवल्यासारख त्याने ..आपला मोबाईल फोन बाहेर काढला.. मोबाईल मध्ये नंबर शोधून.. लगेच फोन केला..  नुसताच हेलो हेलो ऐकू आलं.. तिकडून काहीच आवाज येत नसावा.. त्याने पुन्हा प्रयत्न केला.. पण मात्र नाईलाज.. शेवटी त्याने.. शांत राहण्याचा निर्णय घेतला..! पण.. शांत राहून सुद्धा.. तो इकडे तिकडे पाहत होता.. कि ती कुठे बसली तर नाहीये ना..!
 खर तर.. त्याची ही रोजची सवय झाली होती.. रोज स्टेशन वर त्याने तिची वाट पाहणे.. तिचे ट्रेन मध्ये चढणे.. त्याचे तिला पाहणे.. रोजचा एकत्र ट्रेन मधला प्रवास..! गर्दीतून… त्याने तिला दिलेलं स्मितहास्य.. अन त्यावर.. तिने ही दिलेला प्रतिसाद.. असं दोघांच.. प्रेम वाढत गेलं.. प्रेमाच्या बंधनात दोघे अडकले.. जसा रोजचा प्रवास तसा आयुष्याचा प्रवास सुद्धा एकत्र करण्याचं त्यांनी ठरवलं.. पण नियतीला ते मान्य नव्हतं.. घडू नये तसचं घडलं..

एके दिवशी अचानक…. ट्रेन मध्ये आरडा ओरडा…. बायकांच्या किंकाळ्या.. माणसांची गडबड.. ट्रेन थांबवण्यासाठीची लोकांची धडपड.. सारे वातावरण भयानक.. “कोणी चैन खेचा चैन खेचा.. मुलगी पडली ” अश्या हाका. ट्रेन मधले लोकं उठून बाहेर पाहायला लागले.. ट्रेन थांबली.. पण… ट्रेन थांबण्या आधीच.. सार संपलं होतं… तीच मुलगी ट्रेन मध्ये चढताना.. पाय घसरून पडली होती.. तिचे शरीर ट्रेन आणि प्लाटफोर्म मधल्या अंतरात अडकलं होतं.. काही समजण्याच्या आधीच.. तीच आयुष्य संपलं होतं.. त्याच्या नजरे समोर ती त्याला कायमची सोडून गेली होती.. सार निःश्ब्ध.. हृदयाचे ठोके चुकले… या परिस्थितीत काय करावं.. त्याला काहीच कळत नव्हतं.. जमलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी.. राहिलेल्या गोष्टींची जबाबदारी घेतली.. पण त्याचं मन आतून पूर्णपणे ढासाळून गेलं होतं… नुसतं स्तब्ध होऊन तो तिच्या कडे पाहत राहिला….  मगाशीच आल्या आल्या तिने मारलेल्या गप्पा.. त्यांनी एकत्र घालवलेले सारे क्षण आठवायला लागले… आपलं माणूस आपल्याला कायमचं सोडून गेल्यावर त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून.. डोळ्यात आसवांनी आपोआप वाट धरली होती… आयुष्य हे किती क्षणभंगुर असतं.. ह्याचा अनुभव फार जवळून त्याला जाणवला.. त्याच जागी तो.. एकटाच रडत बसला..

आज पण तो रोज तिची वाट पाहतो.. तिकडेच.. त्याचं जागी.. १०:१५ ची CST पकडतो.. लोकल मध्ये चढल्यावर… असाच काहीसा तिला तो रोज शोधत राहतो.. अन… नंतर परत.. सार आठवून . भरगच्च डोळ्यांनी निस्तब्ध अश्रू गाळत शांत बसतो..

आयुष्य हे क्षणभंगुर आहे.. आपल्या वर प्रेम करणारे आपली काळजी करणारे बरेच लोकं असतात.. आपण नसण्याने त्यांच्या आयुष्यात काय घडू शकत याचा विचार करा.. घाई.. ऑफीस… सगळ्यांच्याच नशिबी असतं.. पण जीवन हे अमूल्य असतं.. ह्याचा विचार करा.. अन आजपासून.. जपून प्रवास करा..
by: एक एकटा एकटाच

Thursday, February 09, 2012

एक छोटीशी प्रेम कथा

होता एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करायचा..... म्हणतात ना शोधणारयाला देव हि मिळतो........... तसेच ह्याने तिला शोधले होते. तीन वर्षाच्या प्रयात्ना नंतर ह्याने तिला मिळवलं होत.. दोघेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे... तीच जरा जास्तच होत पण काय करणार दोघांची हि भेट होण शक्य नव्हती कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला.. फोन वर बोलन तसे दररोजचेच पण भेट फक्त सहा महिन्याने होत असे.........
पण एक दिवस पूर्ण नूरच पालाडतो.... ह्याला अचानक रक्ताच्या उलट्या होतात.. ह्याला डॉक्टर कडून समजत कि मला कर्क रोग झालाय आणि माझ्या हातात फक्त सहा महिने उरले आहेत.हा तिला समजू देत नाही.... कारण सहा महिन्यांनी तिचा वाढदिवस असतो.... आणि तिच्या वाढदिवशी ह्याला तिला पहायचे असते...

तिच्या वाढदिवसाला चार दिवस बाकी असतात..आणि ह्याला कळून चुकलेले असते कि आपली वेळ जवळ आलीय ..हा मनात विचार करतो कि हिच्या वाढदिवशी आपण हिला शेवटच पहायचं आणि मगच आपण आपले प्राण सोडायचे...सतत चार दिवस हा तिला त्याच ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी ह्यांची पहिली भेट झाली होती...तिच्या
कॉलेज मध्ये फंक्शन असल्या मुळे आपण वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी जाऊ असे त्याला सांगते...हा तिला शेवटच विचारतो कि तुला यायचं आहे कि नाही...कसलाही न विचार करता ती त्याला नाही सांगते...वाढदिवसाचा दिवस उजाडतो....ह्याची वेळ जवळ आलेली असते ह्याच्याकडे फक्त तीन मिनिटे असतात...हा तिला फोन करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो...हि त्याला विचारते काय करतोयस.........आणि हा शेवटी एवढच म्हणतो....

आज मी मृत्युच्या दारी उभा आहे ग........................ मरता मरता तुला
तुझ्या वाढदिवशी शेवटच पहायची मनापासून खूप इच्छा होती ग...पण तुही नाही म्हणालीस........... जाता जाता तुझ्या मिठी मध्ये यायचं होत पण तुला भेटायचे नव्हत................... तेव्हा तर
नाही पण मला मेल्यावर तरी मिठी मध्ये घेशील ना?????हि विचारते काय झाल आणि फोन कट होतो............ हि त्याच्या घरी येते पण वेळ निघून गेलेली असते......तिला त्याच्या आईकडून समजत.......हि जेव्हा त्याला आपल्या मिठी मध्ये घेऊन रडत असते तेव्हा त्याचा डावा हात खाली पडतो.. त्याच्या हातावर लिहिलेलं असत कि.................

ए जानु नको रडूस ग...
कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले मला माफ कर..............................
ह्यांने
ज्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी बोलवलं असत त्याच ठिकाणी हि प्रेम वेडी आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट पाहत असते... फक्त ह्याच आशेने कि तो कुणाच्या तरी रुपात येईल आणि तिला मिठीत घेईल... पण म्हणतात ना

(डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो.पण माथ्या आड गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही.........)
by : एक एकटा एकटाच

Saturday, February 04, 2012

माझा-तुझा संबंध संपला.......

त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते..
त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic .... तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं... असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत.. शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुष होती.. तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता  त्यात ती समाधानीच होती.. तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते...
 

पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, "तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि... मी परदेशी चालले आहे.. पुन्हा कधीच परत येणार नाही.. तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध संपला......." ती कायमची निघुन गेली... हा मॊडुन पडला.... संपलाच जणु काही.... सर्व काही संपले त्याच्यासाठी.. दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या.. त्याने ठरवलं, 'तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे.. 'या जिद्दीने पेटुन उठ्ला तो.. झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले.. राब राब राबला.. मित्रांनी मदत केली. चांगले लॊक भेट्ले.. त्याचे दिवस पालटले.. तो खुप श्रींमत झाला.. स्वतःची कंपनी उभारली.. पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं. विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला.. उभा राहिला.. जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला.. पण तरीही त्याच्या मनात चुटपुट  कायमच होती.. ती सोडुन गेल्याची.. तिनं नाकारल्याची.. आपल्या गरीबीचा अपमान केल्याची.. तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती.

एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता.. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.. गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं.. भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं.. त्याने गाडी थांबवली.. आणि नीट पाहीलं.. हे 'तिचेच' आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली.. त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत.. त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती.. त्यांनी आपली श्रींमती पहावी.. त्यानी आपली गाडी पहावी.. आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा.. असं त्याला मनोमन वाटतं होत.. तिला धडा शिकवण्याच्या..

अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहातात.. हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ. पाहतो आणि कोसळतोच...

तिचाच फ़ोटो.. तसाच हसरा चेहरा... आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं... हा सुन्न झाला... धावतच गेला कबरीकडे... तिच्या आईबाबांना विचारलं... काय झालं ते सांगा....
ते म्हणाले... ती परदेशी कधीच गेली नाही. तिला 'कर्करोग' झाला होता.. तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होते तिच्या हातात... आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली.. तू संतापुन उभा राहशील.. जगशील.. यावर तिचा विश्वास होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले...

एक होता चिमणा

एक होता चिमणा व एक होती चिमणी..दोघात खूप प्रेम होते.. एके दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू मला सोडून,,उडून तर जाणार नाही ना? ...
...तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून गेलो तर तू मला पकडून घेशील... चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू तर शकेल पण तुला मिळवू नाही शकणार.. हे ऐकुन चिमण्याचे डोळे भरून आले..

त्याने आपले पंख छाटून टाकले..आणि चिमणीला म्हणाला आता तर ठीक आहेना...आता आपण नेहमी सोबत राहू...

एके दिवशी जोराचे वादळ सुटले..चिमण्याला पंख नसल्याने तो उडू शकत नव्हता.. चिमणी मात्र.. तो चिमणीला म्हणाला तू उडून जा.. चिमणीने त्याला स्वताची काळजी घे असे सांगून उडून गेली.. थोड्या वेळाने वादळ शमले... चिमणी परत आली.. पाहते तर चिमणा मारून पडला होता..

बाजूच्या फांदीवर लिहिले होते.. प्रिये.. फक्त एकदा..एकदाच जर तू मला म्हटले असते कि मी तुला सोडून नाही जाऊ शकत.. तर कदाचित हे वादळ हि माझे काही बिघडवू शकले नसते... प्रेम हे असेच असते.
 
 

Friday, January 27, 2012

Teddy Bear

एकदा एक मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी ती तिच्या प्रियकराची वाट बघत बसली होती.
खूप खुश होती ती ...... आज तिला तिच्या प्रियकराकडून अंगठी
मिळणार होती..... ह्या स्वप्नात ती पूर्ण रंगून गेली होती .
तेव्हड्यात तिचा प्रियकर आला ... त्याला बघून तिला खूप आनंद झाला ...... 

त्याने तिला Birthday -wish केले , आणि वाढदिवसाची भेट म्हणून
teddy bear दिला ........... teddy bear बघून ती नाराज झाली ,
कारण……………..

तिला अंगठी पाहिजे होती ..... ह्या रागात तिने तो teddy मागे फेकून दिला.
.......... रस्त्यावार पडलेला teddy पाहून तिचा प्रियकर तो teddy उचलायला
गेला आणि……………..

आणि
तेव्हड्यात मागून येणार्या गाडीने त्याला उडविले ...आणि तो जागीच मरण पावला.
हे पाहून तिच्या डोळ्यांतून मुसळधार पाउस पडू लागला .... आक्रोश करून ती रडू लागली .

......आणि तिने तो teddy घेऊन त्याला घट्ट मिठी मारली
....तेव्हड्यात त्या teddy मध्ये असलेल्या machine मधून आवाज आला कि,
"प्रिये, अंगठी माझ्या (teddy च्या) खिशात आहे,
Will you please marry me ?
 
by एक एकटा एकटाच
 

Tuesday, January 17, 2012

छान प्रेमकथा



एक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही सुंदर तिची आपल्या नवर्यावर प्रेम करण्याची पद्धत होती, जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात असे तेव्हा तेव्हा ती रोज एक गुलाबाचे फुल आपल्या नवर्याला पाठवत असे, आणि जाणवून देत असे कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच आहे ...
 
ती दुसरीकडे असताना तिच्या रोज येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखद सवय झाली होती. पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे सुंदर प्रेम देवालाही आवडले असावे म्हणून कि काय पण देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले, तिच्या विमानास अपघात झाला आणि बिचारी आपले प्राण गमावून बसली .....................

हि बातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कोणी एवढे रडले नसेल ...

... पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता सुरु झाले होते, तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते.... 


हे बघून तिचा नवरा आश्चर्य चकित झाला व ह्या मागाचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणार्या मुलास विचारले
तिचा नवरा :- तुला हे फुल कोण देत नक्की, माझी बायको मरून १५ दिवस झाले तरी तू रोज फुल आणून देत आहेस, नक्की प्रकार काय आहे ?
मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप प्रेम करते, तिची विचारशक्ती खूप पुढची होती, म्हणून तिने आधीच विचार करून ठेवला होता कि, "जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण प्रेमाला कधी संपवायचे नाही" आणि ह्या विचाराने तिने मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत जेणे करून आयुष्यभर ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल .... आणि तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव करून देईल....

Read This Heart Touching Stories