Jayesh Gujrati's Blog (in Marathi)

Search

Thursday, February 16, 2012

खुप विसरण्याचा प्रयत्न करतोय

कधीच न्हवत वाटल मला
अस पण घडेल...
चार दिवसाच्या प्रेमासाठी
आयुष्यभर रडेन
नेहमी मला म्हणायची ती

डिअर आपण वेगळ नाही व्हायच
लग्न करून आपण खुप सुखात रहायच
कितीही झाला विरोध तरी
लग्न नाही मोडायच
आपल हे सुंदर प्रेम अर्ध्यावर
कधी च नाही सोडायच
अशा तिच्या गप्पा गोष्टी
मला नेहमीच छान वाटायच्या
आणि दूर स्वप्नात घेउन मला जायच्या
मी सुद्धा वेड्या सारखा खुश होउन जायचो
दिवस रात्र तिच्याशिच गप्पा मारत बसायचो
आठवून तीच बोलनं  खुप-खुप हसायचो
आणि येनार्य़ा  प्रत्येक स्थळाला नकार मी दयायचो
दोन दिवस तिचा एस-एम-एस नाही आला
म्हणून मीच तिला बाहेरून कॉल केला
घरातील फोन आणि मोबाइल सगळ
स्विच ऑफ होत
भारावलेल्या माझ्या मनाला काहीच सुचत न्हवत
तिच्या  क्वालिनित गेल्यावर समजल
तीच लग्न ठरलय
एंगेजमेंट साठी पाहुन्यान्नी सार घर भरलय
थरथरत्या पाउलांनि
मी तिच्या घरी गेलो
ती त्या मुलाला पेढे भरवतेय पाहून
भाराउनच गेलो
परक्या पाहून्या सारखी ती
माझ्या कड़े पहात होती
आणि माझ्या डोळ्यातील आसव
ओठा वर येत होती ......
खुप-खुप रडलो पण तिला माया येत न्हवती
कारण ती तर फ़क्त गरजे पुरतीच जवळ होती.........
 
by :तुझ्याविना एक एकटा एकटाच मी

Tuesday, February 14, 2012

१०:१५ ची CST लोकल

१० :१५ ची CST लोकल ट्रेन सुटली .. धावता धावताच तो चढला .. धावत पळत.. कसा बसा गर्दीतून तो आत शिरला.. आत मध्ये येताच क्षणी त्याची नजर पुढच्या दरवाज्या जवळ… तो पूर्णपणे कावरा बावरा.. बहुतेक त्याची नजर तिलाच शोधात असावी.. बराच वेळ.. त्याने पाहिलं .. पुढच्या दोन्ही दरवाज्यांजवळ येऊन पाहिलं.. त्याच्या नजरेत.. एक भीती.. एक हुरहूर.. तिच्याबद्दलची काळजी.. दिसत होती.. त्याने गर्दीतून शेवटी वाट काढत पुढच्या दरवाज्याजवळ येऊन परत खात्री केली.. रुमाल काढून घाम पुसला.. लगेच काहीतरी आठवल्यासारख त्याने ..आपला मोबाईल फोन बाहेर काढला.. मोबाईल मध्ये नंबर शोधून.. लगेच फोन केला..  नुसताच हेलो हेलो ऐकू आलं.. तिकडून काहीच आवाज येत नसावा.. त्याने पुन्हा प्रयत्न केला.. पण मात्र नाईलाज.. शेवटी त्याने.. शांत राहण्याचा निर्णय घेतला..! पण.. शांत राहून सुद्धा.. तो इकडे तिकडे पाहत होता.. कि ती कुठे बसली तर नाहीये ना..!
 खर तर.. त्याची ही रोजची सवय झाली होती.. रोज स्टेशन वर त्याने तिची वाट पाहणे.. तिचे ट्रेन मध्ये चढणे.. त्याचे तिला पाहणे.. रोजचा एकत्र ट्रेन मधला प्रवास..! गर्दीतून… त्याने तिला दिलेलं स्मितहास्य.. अन त्यावर.. तिने ही दिलेला प्रतिसाद.. असं दोघांच.. प्रेम वाढत गेलं.. प्रेमाच्या बंधनात दोघे अडकले.. जसा रोजचा प्रवास तसा आयुष्याचा प्रवास सुद्धा एकत्र करण्याचं त्यांनी ठरवलं.. पण नियतीला ते मान्य नव्हतं.. घडू नये तसचं घडलं..

एके दिवशी अचानक…. ट्रेन मध्ये आरडा ओरडा…. बायकांच्या किंकाळ्या.. माणसांची गडबड.. ट्रेन थांबवण्यासाठीची लोकांची धडपड.. सारे वातावरण भयानक.. “कोणी चैन खेचा चैन खेचा.. मुलगी पडली ” अश्या हाका. ट्रेन मधले लोकं उठून बाहेर पाहायला लागले.. ट्रेन थांबली.. पण… ट्रेन थांबण्या आधीच.. सार संपलं होतं… तीच मुलगी ट्रेन मध्ये चढताना.. पाय घसरून पडली होती.. तिचे शरीर ट्रेन आणि प्लाटफोर्म मधल्या अंतरात अडकलं होतं.. काही समजण्याच्या आधीच.. तीच आयुष्य संपलं होतं.. त्याच्या नजरे समोर ती त्याला कायमची सोडून गेली होती.. सार निःश्ब्ध.. हृदयाचे ठोके चुकले… या परिस्थितीत काय करावं.. त्याला काहीच कळत नव्हतं.. जमलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी.. राहिलेल्या गोष्टींची जबाबदारी घेतली.. पण त्याचं मन आतून पूर्णपणे ढासाळून गेलं होतं… नुसतं स्तब्ध होऊन तो तिच्या कडे पाहत राहिला….  मगाशीच आल्या आल्या तिने मारलेल्या गप्पा.. त्यांनी एकत्र घालवलेले सारे क्षण आठवायला लागले… आपलं माणूस आपल्याला कायमचं सोडून गेल्यावर त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून.. डोळ्यात आसवांनी आपोआप वाट धरली होती… आयुष्य हे किती क्षणभंगुर असतं.. ह्याचा अनुभव फार जवळून त्याला जाणवला.. त्याच जागी तो.. एकटाच रडत बसला..

आज पण तो रोज तिची वाट पाहतो.. तिकडेच.. त्याचं जागी.. १०:१५ ची CST पकडतो.. लोकल मध्ये चढल्यावर… असाच काहीसा तिला तो रोज शोधत राहतो.. अन… नंतर परत.. सार आठवून . भरगच्च डोळ्यांनी निस्तब्ध अश्रू गाळत शांत बसतो..

आयुष्य हे क्षणभंगुर आहे.. आपल्या वर प्रेम करणारे आपली काळजी करणारे बरेच लोकं असतात.. आपण नसण्याने त्यांच्या आयुष्यात काय घडू शकत याचा विचार करा.. घाई.. ऑफीस… सगळ्यांच्याच नशिबी असतं.. पण जीवन हे अमूल्य असतं.. ह्याचा विचार करा.. अन आजपासून.. जपून प्रवास करा..
by: एक एकटा एकटाच

Thursday, February 09, 2012

राग

एकदा एक माणुस ऑफिसमध्ये Boss खुप रागावले म्हणुन तडकाफडकी Half day सुटुन बसने घरी जायला निघतो.

बसमध्ये जेमतेम 10-12 जण असतील , तो रिकामी Seat पाहुन Tension मध्येच बसतो
पुढच्या Stop वर एक माणुस आपल्या दोन चिमुरड्यांसह त्या व्यक्तीच्या पुढच्या Seat वर येवुन बसतो.
 
ती लहान चिमुरडी मग बसमध्ये खुप धिंगाणा घालु लागतात, खिडकीच्या बाहेर डोकावुन मोठमोठ्याने ओरडतात, मध्येच भुक लागली म्हणुन रडकुंडलीला येतात .

त्या मागच्या Seat वर बसलेल्या व्यक्तीला याचा खुप राग येऊ लागतो, खुप वेळेस समाजावुनही ती मुले शांत होत नाहीत ते पाहुन तो त्यांच्या वडिलावर ओरडतो "सांभाळता येत नसेल मुलानां तर कशाला ऊगीच जन्माला घालताओ अशी मुलं ????"

त्यावर तो माणुस शांत पाणीदार डोळ्याने म्हणतो, " तुमच्या भावना मी समजु शकतो साहेब , पण या चिमुरड्या जीवाला कसं समजावु कि तुमची 'आई' या जगामध्ये नाही आता .., थोडयाच वेळापुर्वी तिच्यावर हॉस्पीटलमध्ये अंत्यसंस्कार करुन घरी निघालोय आम्ही. .
यावर त्या दुसर्या माणसाची मान शरमेने त्यापुढे झुकली...

MORAL :- कधीही समोरच्या माणसाच्या भावना लक्षात घेवुनच वर्तन करत जा.
 
by: एक एकटा एकटाच 

Read This Heart Touching Stories