एक नोकरदार माणूस रोजसारखा घरी आला... रोजसारखाचं उशीरा... त्याचा मुलगा सहा-सात वर्षाचा; त्याची वाटचं पहात होता अगदी रोज पहातो तशीचं...
तो घरात आला त्याचा मुलगा त्याच्या कडे पाहात होता... तो म्हणाला "काय रे काय झाले ? असा का पहातो आहे" मुलगा म्हणाला "बाबा , एक प्रश्न विचारु का ?" काहीसा त्रासिकपणे "हो विचार" मुलगा "बाबा तुम्हाला एक तास काम केल्यावर किती पैसे मिळतात" माणूस रागात "तुला काय त्याचे देणे घेणे ?? असे काही पण काय विचारतो ?" मुलगा "सहज विचारले . सांगा ना... एका तासाला किती पैसे मिळतात ?" माणूस वैतागून "तुला ऐकायचेच आहे ना... तासाला १०० रुपये" मुलगा "असं का" काही क्षण गेले "बाबा माला ५० रु. द्या ना" आता तो माणूस अगदि चिडलाचं... मुलावर ओरडला "असं का हे कारण होतं म्हणून तुला पैसे पाहीजे आहेत... म्हणून इतकी विचारपूस करतो का... खेळने घ्यायचे असेल काही त्या पैशांचे, नाही तर उधळपट्टी करणार असशील मी मर मर मरतो काम करतो आणि तु असा पैसा उधळतो, स्वार्थी कुठला बापाची काळजी नाही कसली वरुन मला विचारतो म्हणे तासाला किती कमवतो मी.... असे म्हणून त्याच्या एक कानात वाजवतो...
मुलगा हिरमुसला त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आले तो आतल्या खोलीत गेला... माणूस ही जरा रागातचं होता बसला थोडा... मुलाचे शब्द डोक्यातचं घोळत होते असे कसे तो विचारतो मला तासाला किती कमवतो... पहाता-पहाता तास दोन तास निघून गेले... माणसाचा राग बराचं शांत झाला पण अजूनही मनात तेचं शब्द ...
"तासाला किती कमवतो"
असे का विचारले असे कधी विचारत नाही तो त्याला नक्की काय म्हणायचे होते ... त्याला काही पाहीजे आहे का... त्याला पैसे लागणार असतील... उगाचं चिडलो इतका असे म्हणून तो खोलीकडे वळला... दार उघडले "बाळा झोपला का रे" माणूस म्हणाला "नाही बाबा मी जागाचं आहे" मुलगा उत्तरला "अरे बाळा रागवला का रे, मी तुला मारले ना ... अरे तेव्हा मी कसा इतका चिडलो समजलेचं नाही , घे हे ५० रु." मुलगा उठून बसला गोड हसला आनंदाने म्हणाला "बाबा खरचं देता आहेत" असे म्हणून ते ५० रु. घेतले मग त्याने उशी खालून अजून ५० रु. काढले माणसाने पाहीले की मुलाकडे तर आधीचं पैसे आहेत नेमके तीतेकेचं मुलगा पैसे मोजत होता मग त्याने वडीलांकडे पाहीले हा परत थोडा चिडला "अरे तुझ्या कडे आहेत ना पैसे " "पण पुरेसे नव्हते" मुलगा उत्तरला "पण आता झाले" पुढे म्हणाला "बाबा, तुम्ही दिलेले ५० रु आणि मी जमवलेले पैसे हे तुम्ही घ्या पूर्ण १०० रु आहेत... माणूस गोंधळला काय चालले आहे त्याला कळतचं नव्हते मुलगा असा काय वागतो आहे... मुलगा पुढे म्हणाला "बाबा माला तुमचा एक तास हवा आहे, उद्या घरी एक तास लवकर या मला तुमच्या सोबत जेवायचे आहे उद्या माझा वाढदिवस आहे..." माणसाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होते... त्याने मुलाला मिठीत घेतले... मुलगाही अगदी सुखावला बाबांनी त्याला फार दिवसांनी असे मिठीत घेतले होते...
ही गोष्ट त्यांच्यासाठी एक short reminder आहे जे नेहमी काम-काम आणि कामचं करतात करियर, पैसा कमवायच्या धडपडीत बरेच काही आहे ज्यापासून दुरावत आहेत .जमलंचं तर थोडा वेळ त्यांच्यासाठीही काढा जे आपल्या सहवासासाठी असुलेले आहेत आपला परिवार आपले नातलग मित्र मैत्रीणी सारे आपल्यावर प्रेम करतात आणि त्यांना फक्त थोडा वेळ पाहीजे आपल्याकडून बाकी काही नाही... जमलंचं तर थोडा विचार करा...
No comments:
Post a Comment