दोन
जण स्वर्गात जाण्याच्या रांगेत उभे होते. यमाने त्यांना थांबवित म्हटले,
''स्वर्ग जवळपास फुल झालेला आहे त्यामुळे तुम्हापैकी ज्या कुणाचा मृत्यू
अत्यंत भयानक तऱ्हेने झाला आहे अशालाच मी आत सोडणार आहे ... तर तुम्ही
तुमची कहानी सांगा... आणि त्यावरुन मी ठरविन तुम्हाला आत सोडायचे आहे की
नाही ''
पहिला माणूस आपली कहानी सांगू लागला,
''एवढ्यात मला माझ्या बायकोवर संशय होताच... की तीचं कुठंतरी दुसरीकडे लफडं
चालू असावं... म्हणून आज मी लवकर घरी आलो होतो की जेणेकरुन तिला रेड
हॅन्डेड पकडावं... जेव्हा मी माझ्या 25 व्या मजल्यावर असलेल्या
अपार्टमेंटमध्ये गेलो... घरात काहीतरी मला खटकलं... पण घरात सर्वत्र शोध
घेतला तरी कुणी सापडलं नाही... शेवटी मी बाल्कनीत गेलो आणि तिथे मला तो
माणूस सापडला होता तो बाल्कनीत रेलींगला लोंबकळत होता... 25 मजले
जमिनीपासून वर!... त्याला पाहताच माझा दिमाग सटकला आणि मी त्याला मारायला
लागलो... हाताने पायाने सर्व प्रकाराने मी त्याला मारायला लागलो पण तो साला
खाली पडतच नव्हता... शेवटी मी घरात परत आलो, एक हातोडा आणला आणि त्याच्या
बोटांवर मारायला लागलो... तो काही जास्त वेळ ते सहन करु शकला नाही आणि तो
खाली पडला... पण 25 व्या मजल्यावरुन पडूनही खाली तो एका झुडपात पडला आणि
वाचला... माझं डोकं अजुनच सटकलं... मी किचनमध्ये गेलो आणि फ्रिज उचलून वरुन
त्या माणसाच्या अंगावर टाकला... तो फ्रिज बरोबर त्याच्या अंगावर पडून तो
जागच्या जागीच मेला.. पण तोपर्यंत माझा राग आणि ताण एवढा जास्त झाला होता
की मीही हार्टअटॅक येवून बाल्कनीवर तिथल्या तिथेच मेलो..''
'' अरेरे ... तुझ्यासाठी आजचा दिवस फारच वाईट ठरला ... नाही?'' यम त्या माणसाला म्हणाला आणि त्याने त्याला आत घेतले.
रांगेतला दुसरा माणूस पुढे येताच यमाने त्यालाही तेच स्वर्ग जवळपास भरल्याचे सांगितले आणि त्याला त्याची कहानी सांगायला सांगितली.
दुसरा माणूस त्याची कहानी सांगायला लागला -
''आजचा दिवस माझ्यासाठी फारच चमत्कारीक होता... काय झालं मी 26व्या
फ्लोअरवर माझ्या अपार्टमेंटमधे राहतो आणि रोज सकाळी मी माझ्या बाल्कनीत
व्यायाम करीत असतो... पण आज काय झालं... मी व्यायाम करतांना घसरलो असेन
किंवा तसंच काहीतरी ... कारण मी माझ्या बाल्कनीच्या काठावरुन खाली पडलो ...
पण माझं नशिब चांगलं माझ्या खालच्या फ्लोअरच्या बाल्कनीचं रेलींग माझ्या
हाताला लागलं... मला माहित होतं की मी असा जास्तवेळ लटकत राहू शकणार
नाही... तेवढ्यात अचानक हा माणूस बाल्कनीत आला... मला वाटलं की चला आता हा
आपल्याला वाचवणार .. पण तो साला मला लाथा बुक्याने मारायला लागला.. मी
आटोकाट प्रयत्न करुन रेलींगला धरुन लटकत होतो पण तेवढ्यात हा साला आत गेला
आणि हातोडा घेवून येवून माझ्या बोटांवर हातोड्याने मारायला लागला... शेवटी
माझे हात सुटले आणि मी म्हटलं जावूद्या आपण काही आज वाचत नाही ... पण
पुन्हा मी लकी ठरलो आणि खाली एका झुडपात पडलो... घाबरलो होतो पण मला विषेश
लागलं नव्हतं... जेव्हा मी विचार करीत होतो की आपण ठिक आहोत... तेवढ्यात एक
रेफ्रिजरेटर वरुन खाली माझ्या अंगावर पडलं ... आणि मी इथे पोहोचलो''
No comments:
Post a Comment