एकदा
एक अनुभवी आणि वृध्द गुरू आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले
होते. एके दिवशी सकाळी त्यांनी त्या शिष्याला थोडे मीठ आणायला सांगितले. तो शिष्य मीठ घेऊन परतला तेव्हा गुरूंनी त्या दुखी तरूणाला त्यातील मूठभर
मीठ एका एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगीतले.
"पाणी चवीला कसे लागले ?" गुरूंनी विचारले. "कडु" असे म्हणून शिष्याने ते पाणी थुंकले. गुरूंनी मंद हास्य केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मुठभर मीठ त्या तळयात टाकण्यास सांगितले. ते दोघे तळयाजवळ आले. शिष्याने मूठभर मीठ त्या तळयात मिसळल्यानंतर ते वृध्द गुरू म्हणाले, "आता या तळयातील पाणी पिऊन पहा."
त्याच्या हनुवटीवरून पाणी खाली ओघळल्यावर गुरूंनी त्याला विचारलं, "आता यापाण्याची चव कशी आहे ?" "ताजी आणि मधुर !" शिष्याने सांगितले. "आता तुला मिठाची चव लागतेय ?" "नाही."
गुरू त्या शिष्याच्या जवळ बसले आणि त्यांनी त्याचा हात हातात घेतला. ते
म्हणाले, "आयुष्याची चवही अगदी मिठासारखीच असते. आयुष्यातील दुखही तेवढच
असतं, परंतु आपण ते दुख कशात मिसळतो यावर त्याचा कडवटपणा अवलंबुन असतो.
म्हणून जेव्हा आपण दुखात असतो तेव्हा आपण एकच गोष्ट करू शकतो. ती म्हणजे,
आपण आपल्या भावना व विचार व्यापक ठेवल्या पाहिजेत. पेला होणं थांबवून तळं
होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Thanks Again...!!! Have you read "Azhar" ? It was real incident happened with Azhar and on more "Bus Conductor" it was happened with me.... You will surely like those stories...!!!
Very enthusiastic story
ReplyDeleteThanks Again...!!!
ReplyDeleteHave you read "Azhar" ?
It was real incident happened with Azhar and on more
"Bus Conductor" it was happened with me....
You will surely like those stories...!!!