This is also a kind of "तळतळाट"
Search
Thursday, December 01, 2011
Monday, November 14, 2011
अझर
धन्यवाद ! facebook वरील माझ्या friends ना, कि ज्यांच्यामुळे मी हा blog ६ महिन्यानंतर परत लिहायला सुरुवात करतोय. एका छोट्याशा प्रसंगावरून मी हा blog लिहायला सुरुवात केली होती. पण त्याला जास्त प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित मराठी blog असल्यामुळे दुसर्याच्या English blog इतक्या वाचकांची अपेक्षा करणं चुकीच असेल, आणि तसाही मी काही लेखक नाहीय. आता कळतंय मी आपल्या blog चं marketing पाहिजे तस केल नाही. facebook status वर link टाकली आणि दिवसभरात blog च्या state वर नजर ठेवली, तर लक्ष्यात आलं कि नेहमीपेक्षा traffic जास्त होता, तसेच हेही कि marketing महत्वाची असते मग ती blog ची का असेना.
आज जो प्रसंग सांगतोय तो जरा तापट विषयाचा आहे, पण त्यातलाही तळतळाट तसाच नेहमी सारखा.
माझा अगदी जवळचा मित्र अझर. माझ्याच Accounts Team मध्ये काम करतो. माझ्यापेक्षा सातेक वर्षाने लहान असेल. तो collection चं काम बघतो. माझ्या department मधला सगळ्यात effective employee . त्याच्या जागेवर तेच काम करायला दोन मुले होती पण, त्यांच्या कडूनही जे target achieve केल जाऊ शकला नाही ते target अझर अगदी सहज रोज पूर्ण करतो. Recovery चं काम म्हटलं कि, डोळ्यासमोर येतं ते आवाज वाढवून आणि काहीस उद्धटपणे बोलणारे मुलं, तस करावही लागतं, आजकाल रडल्याशिवाय आणि भांडल्याशिवाय पैसा निघत नाही. पण अझरचं तसं नाहीये, मी जेव्हाही त्याला Dealers शी बोलतांना पाहिलं असेल, अगदी अदबीने, न भांडता, न दुखावता बोलत असतो. आपल्या market मध्ये त्याने इतका मान मिळवला आहे कि, फक्त relation मूळे त्याच काम चालत. इतकंच काय तर त्याचा जागेवर एक दिवसही दुसर कुणी चालत नाही आमच्या dealers नां. ह्याच करणामूळे स्वतः मी त्याला ३ वेळा Performance Bonus साठी recommend केलं होत, आणि तो त्याने जिंकलाही.
तर हा किस्सा आहे अशा या अझरचा. एकदा त्याला एका पार्टीकडे चेक घ्यायला जायचे होते. त्याच पार्टीला एक पार्सलहि द्यायचं होतं. अझर ते पार्सल घेऊन त्या पार्टीकडे गेला, तिथे बसलेल्या बाईजवळ त्याने ते पार्सल दिले आणि चेक मागितला. तसा त्या बाईंनी चेक दिला आणि नाव विचारले. तसं अझरने नाव सांगितलं. नाव ऐकल्यावर मागे बसलेल्या एकाने comment केली, "ये पार्सल फटेगा तो नही ना ?" त्यावर अझरने उत्तर दिले "आप खोल के देख लीजिये, मै रूकता हूँ|" प्रकार लक्षात येताच त्या बाईंनी प्रसंगावधान राखून म्हटले "अरे वोह तो मजाक कर रहे है, आप जाईये"
ओफीसवर तसा तो कमीच असतो. तो त्याच्या जागेवर बसून काम करत असतांना, त्याच्या हावभावावरून माझ्या लक्ष्यात आलं काहीतरी घडलंय. बरंच विचारल्यावर त्याने घडलेलं सगळ सांगीतलं. मला काय बोलावे तेच समजत नव्हत. मी लगेच facebook वर question टाकून reply मिळवायचा प्रयत्न केला. त्या प्रतिक्रिया वाचून त्यालाही बरं वाटलं. काही दिवसांनी कामाच्या व्यापात तो हे विसरला. पण त्या वेळेचा त्याचा तळतळाट मला जाणवला आणि मीहि तो अनुभवला आहे. काहीवेळेस मलाहि "परप्रांतीय" म्हणून ऐकाव लागतं. इथल्या मातीत जन्म घेऊन, मातृभाषा म्हणून मराठीत शिक्षण घेऊन सुद्द्धा असं ऐकावं लागतं कधी-कधी.
बरं त्या मागे बसलेल्या comment करणारा कोण होता? आपल्यातलाच कुणी एक. मजा म्हणून बोललेले शब्द अझरच्या वयाच्या (२३-२४) मुलाच्या मनात काय पेरू शकतं, हे न कळण्याइतपत मूर्ख आहोत का आपण?
आणखीन काय लिहाव, समाजत नाहीये. पण तुम्ही जरूर कळवा...आणि असाच एखादा प्रसंग असेल तर आपण तो इथे share करू... नक्कीच...

Monday, April 18, 2011
कंडक्टर
१४ फेब्रुवारी २०११
९ वाजत आलेत. ऑफीसहून घरी जायला निघालो होतो. शालीमारवर बसची वाट पाहत थांबलो होतो. रोज काही बसने जात नाही पण मागच्या काही महिन्यांपासून किंवा असे म्हणता येईल कि लग्न झाल्यापासून उगाच असं वाटायला लागलाय कि शक्य तिथे बचत करत बसायची. अगदी रोजची ये-जासुद्धा, रिक्षाने १० रुपये लागतात, बसने ५ रुपये लागतात, ५०% saving, simple! माझ्यातला Accountant जागोजागी जागा होतो.

असो, बस आली कंडक्टर नेहमीचाच वाटला. तो लक्ष्यात राहण्याचे कारण, पहिले म्हणजे नेहमीच ओरडतो "मागे दुसरी बस रिकामी येत आहे, त्यात या." अरे मग या बसचं काय? दुसर वाक्य "बस पुढे १५ मिनिटे तिकीट बुकिंगसाठी थांबेल, कुणाला घाई असेल तर आत्ताच उतरून घ्या" आता बुकिंग म्हणजे काय तर एस. टी. महामंडळाने नवीन गाड्यांबरोबर जे तिकीटकाढण्याचे मशीन दिलेत, त्या कंडक्टरला त्यावर तिकिटे पटापट काढता येत नाहीत. म्हणून मग बस थांबवून पूर्ण तिकिटे काढून मग पुढे जाणार. what an idea! छान ना!
मग घाई असणार्यांच काय? अरे एवढ्यात विसरलेत कसे!, त्या कंडक्टर दादाने सांगितले ना, "कुणाला घाई असेल तर आत्ताच उतरून घ्या, मागे दुसरी नासिकरोड ची बस येत आहे."
त्यात एक "बिचारा" लासलगाववरून अप-डाऊन करणारा, माझ्या शेजारी बसला होता.
अरे हो अजून एक खूण राहिलीच सांगायची शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा दिवसांना त्याला कारण मिळत, हि त्याची बोंब "गाडी फक्त दत्तमंदिर पर्यंत जाईल, रेल्वेस्टेशन व नासिकरोड जाणाऱ्यानी उतरून घ्या, नाहीतर दत्तमंदिरला उताराव लागेल." का तर पुढचा रस्ता बंद आहे. आणी ज्यांना रेल्वे पकडायची असेल त्याचं काय? तर अगदी सोप्प! दत्तमंदिर पासून पायी चालत जा. और गाडी छुट जाये तो फोल्ट किसका...?
हं तर कुठे होतो आपण, तो आपला हिरो, अहो तोच माझ्या शेजारी बसलेला, लासालागावाहून अप-डाऊन करणारा, अगदी रागात मला म्हणाला, "रोज गाडी नासिकरोड पर्यंत जाते, दुसऱ्या गाड्यापण जाताते मग ह्या गाडीला काय झालं. हा कंडक्टर आणी driver असतानाच हा प्रोब्लेम होतो." आणी मग तावातावाने बसचा नंबर लिहून घेतला. मी काहीच उत्तर दिले नाही. मला काय त्याचं, मी उतरणार बोधले-नगरला! आणी लवकर घरी जाऊन मला कुठे दिवे लावायचेत? टिपिकल कॉमन मन ना! पाच मिनिटातच लाज वाटली, काही दिवसांपूर्वी याच कारणाने त्याचा कानाखाली वाजववीशी वाटत होत. पुढच्या पाच मिनिटात तो "हिरो" मागचा सीटवर बसलेल्यांना सांगत होता कि याआधीही त्याने कम्प्लेंट दिली आहे पण एकट्या-दुकट्याने गेल्याने काहीही होत नाही. आणी यांचा मनमानी कारभार सुरूच राहतो, आणी त्याला गाडी सुटल्यामुळे जो त्रास झाला वगैरे. ह्याला काय म्हणतात तर "तळतळाट".
हे लोक ज्यांच्या कडून आपल्याला सर्विस मिळायला पाहिजे, ते सर्विस तर देत नाहीत उलट अपमानास्पद वागणूक जास्त देतात. म्हणून बरेच लोक काहीही बोलायचं टाळतात.
याआधीही ह्या बसमध्ये मी हेच बघितले आहे. बघा जरा logic, मी किवां तुम्ही एखाद्या रिक्षावाल्याच्या गैर व्यावहाराबद्दल जाब विचारला, तर...... सगळे रिक्षावाले अंगावर धावून येतील, बर ते स्री-पुरुष असा भेदभाव करत नाहीत सगळ्यांना एकाच भाषेत "घेतात"
बरच काही करता येईल, आपण समोर यायला तयार होतो पण न दीसता. मग कळवा तुमचं मत.....काहीं-नाही तर एक से बढकर एक किस्से वाचायला मिळतील, आणी काही मार्ग निघालाच तर नक्कीच.... आलं ना लक्ष्यात....
Subscribe to:
Posts (Atom)