Jayesh Gujrati's Blog (in Marathi): कंडक्टर

Search

Monday, April 18, 2011

कंडक्टर

१४ फेब्रुवारी २०११  
९ वाजत आलेत. ऑफीसहून घरी जायला निघालो होतो. शालीमारवर बसची वाट पाहत थांबलो होतो. रोज काही बसने जात नाही पण मागच्या काही महिन्यांपासून किंवा असे म्हणता येईल कि लग्न झाल्यापासून उगाच असं वाटायला लागलाय कि शक्य तिथे बचत करत बसायची. अगदी रोजची ये-जासुद्धा, रिक्षाने १० रुपये लागतात, बसने ५ रुपये लागतात, ५०% saving, simple! माझ्यातला Accountant जागोजागी जागा होतो. 
असो, बस आली कंडक्टर नेहमीचाच वाटला. तो लक्ष्यात राहण्याचे कारण, पहिले म्हणजे नेहमीच ओरडतो "मागे दुसरी बस रिकामी येत आहे, त्यात या." अरे मग या बसचं काय? दुसर वाक्य "बस पुढे १५ मिनिटे तिकीट  बुकिंगसाठी थांबेल, कुणाला घाई असेल तर आत्ताच उतरून घ्या" आता बुकिंग म्हणजे काय तर एस. टी. महामंडळाने नवीन गाड्यांबरोबर जे तिकीटकाढण्याचे मशीन दिलेत, त्या कंडक्टरला त्यावर तिकिटे पटापट काढता येत नाहीत. म्हणून मग बस थांबवून पूर्ण तिकिटे काढून मग पुढे जाणार. what an idea! छान ना! 
मग घाई असणार्यांच काय? अरे एवढ्यात विसरलेत कसे!, त्या कंडक्टर दादाने सांगितले ना, "कुणाला घाई असेल तर आत्ताच उतरून घ्या, मागे दुसरी नासिकरोड ची बस येत आहे."
त्यात एक "बिचारा" लासलगाववरून अप-डाऊन करणारा, माझ्या शेजारी बसला होता. 
अरे हो अजून एक खूण राहिलीच सांगायची शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा दिवसांना त्याला कारण मिळत, हि त्याची बोंब "गाडी फक्त दत्तमंदिर पर्यंत जाईल, रेल्वेस्टेशन व नासिकरोड जाणाऱ्यानी उतरून घ्या, नाहीतर दत्तमंदिरला उताराव लागेल." का तर पुढचा रस्ता बंद आहे. आणी ज्यांना  रेल्वे पकडायची असेल त्याचं काय? तर अगदी सोप्प! दत्तमंदिर पासून पायी चालत जा. और गाडी छुट जाये तो फोल्ट किसका...?
हं तर कुठे होतो आपण, तो आपला हिरो, अहो तोच माझ्या शेजारी बसलेला, लासालागावाहून अप-डाऊन करणारा, अगदी रागात मला म्हणाला, "रोज गाडी नासिकरोड पर्यंत जाते, दुसऱ्या गाड्यापण जाताते मग ह्या गाडीला काय झालं. हा कंडक्टर आणी driver असतानाच हा प्रोब्लेम होतो." आणी मग तावातावाने बसचा नंबर लिहून घेतला. मी काहीच उत्तर दिले नाही. मला काय त्याचं, मी उतरणार बोधले-नगरला! आणी लवकर घरी जाऊन मला कुठे दिवे लावायचेत? टिपिकल कॉमन मन ना! पाच मिनिटातच लाज वाटली, काही दिवसांपूर्वी याच कारणाने त्याचा कानाखाली वाजववीशी वाटत होत. पुढच्या पाच मिनिटात तो "हिरो" मागचा सीटवर बसलेल्यांना सांगत होता कि याआधीही त्याने कम्प्लेंट दिली आहे पण एकट्या-दुकट्याने गेल्याने काहीही होत नाही. आणी यांचा मनमानी कारभार सुरूच राहतो, आणी त्याला गाडी सुटल्यामुळे जो त्रास झाला वगैरे. ह्याला काय म्हणतात तर "तळतळाट".
हे लोक ज्यांच्या कडून आपल्याला सर्विस मिळायला पाहिजे, ते सर्विस तर देत नाहीत उलट अपमानास्पद वागणूक जास्त देतात. म्हणून बरेच लोक काहीही बोलायचं टाळतात.
याआधीही ह्या बसमध्ये मी हेच बघितले आहे. बघा जरा logic, मी किवां तुम्ही एखाद्या रिक्षावाल्याच्या गैर व्यावहाराबद्दल जाब विचारला, तर...... सगळे रिक्षावाले अंगावर धावून येतील, बर ते स्री-पुरुष असा भेदभाव करत नाहीत सगळ्यांना एकाच भाषेत "घेतात" 
बरच काही करता येईल, आपण समोर यायला तयार होतो पण न दीसता. मग कळवा तुमचं मत.....काहीं-नाही तर एक से बढकर एक किस्से वाचायला मिळतील, आणी काही मार्ग निघालाच तर नक्कीच.... आलं ना लक्ष्यात....

No comments:

Post a Comment

Read This Heart Touching Stories