Jayesh Gujrati's Blog (in Marathi): The Cookie Thief

Search

Friday, January 20, 2012

The Cookie Thief

एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती. थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला. कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया’त जाऊन पुस्तक वाचत बसली.
 

तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते. शेजारी बिस्किटाचा पुडा होता. तिने एक बिस्कीट खाताच त्यांनीही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले. त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला. “काय निर्लज्ज मनुष्य आहे हा! माझ्या अंगी थोडी हिंमत असती, तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!" ती मनात विचार करत होती.

दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते. आता शेवटचे बिस्कीट उरले.

“आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल, का मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?" ती विचार करत होती. “आता हे अतिच झालं” असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली.

थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली. पाहते तर काय, तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता.

आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली, याची तिला खूप लाज वाटली. एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती. तिने नजर टाकली, तर शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते.

                                                                                                                                         (The Cookie Thief - by Valerie Cox)

निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे; पण आपल्याला त्याची जाणीवच नसते. दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का? कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात.
by : Yogesh Patil (Facebook)

No comments:

Post a Comment

Read This Heart Touching Stories