Jayesh Gujrati's Blog (in Marathi): जीवन जगण्याची कला

Search

Friday, January 20, 2012

जीवन जगण्याची कला

एकदा न राहवून रामूने विचारलं "आजोबा...कशाला खर्च करता लॉटरीवर...! इतक्या वर्षात एकदाही लागली नाहीये....!"

आजोबा मंद हसले...आणि म्हणाले ..

"बाळा..लॉटरी लागावी म्हणून मी तिकीट नाही कधी काढत.. १ तारखेला लॉटरीच तिकीट काढला की १५ तारखेपर्यंत मी मला १५ लाख मिळाले तर काय काय करेन याची स्वप्न पाहतो. १५ तारखेला लॉटरी लागली नसली की पुन्हा १ रुपयाचं तिकीट काढतो.. आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत स्वप्न पाहतो...! असा २ रुपयात माझा प्रत्येक महिना छान जातो...! "
 

"बाळा ही स्वप्नच मला जगायची उमेद देतात...... स्वप्नात मी तुझ्या आज्जी बरोबर सगळे देश फिरून येतो... रोज सकाळी लंडनमधे तर रात्री पॅरीसच्या टॉवरवर आम्ही कॉफी घेतो... जिवंतपणी आजीला कधी मुंबईला पण नेऊ शकलो नाही.. पण आता मात्र तिला सगळीकेडे नेतो... तिला हव ते घेऊन देतो... कालच मला म्हणाली की "जीन्स ची पॅंट आणून द्या...!" दुसर्याना त्रास न देता मनातल्या-मनात स्वप्न बघितली तर काय वाईट...?"

रामू म्हणाला... "आजोबा पण स्वप्न मोडली की त्रास नाहीका होत...?"

आजोबा म्हणाले.. "अरे.. मग लॉटरी लागेपर्यंत वाट पाहायची आणि वाट पाहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून नव-नवीनस्वप्न बघायची... २ रुपयात.. महिना छान घालवायचा..."
 सौजन्य  : Facebook एक एकटा एकटाच 

No comments:

Post a Comment

Read This Heart Touching Stories