Jayesh Gujrati's Blog (in Marathi): का ?... असं नेहमी का घडतं ?

Search

Friday, April 20, 2012

का ?... असं नेहमी का घडतं ?

तो अजुनहि झोपलाच होता, वर टांगलेल सलाईन वाऱ्या निशी हालत होत. त्यातून टपकनारे थेँब त्याच्या रक्तात भिनत होते. झोप कसली येत होती त्याला...?? उघड्या डोळ्याने तो एकाच ठिकानी बघत होता. त्याची आई औषधे व गोळ्या घेवून आली, त्याला थोडे फार खाण्याची विनंती केली. 

पण त्याने गप्प राहून नकार दिला,  आई गेल्यानंतर त्याने एका हाताने औषधे व गोळ्या घेतल्या........ .
घड्याळाच्या टोलानीँ त्याचे लक्ष वेधले. सहा वाजले होते, त्याने चटकन चादर बाजूला केली 'अरे बापरे ! क्लास तर संपून गेला असेल' अंगात एवढेही बळ नसताना त्याने हातातली सुई खेचून काढली. भळ-भळनाऱ्या रक्तावर कापसाचा बोळा पकडून तो सायकल जवळ गेला. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हत. भर पावसात तो सायकल घेवून क्लासकडे गेला. क्लास तर केव्हाच संपून गेला होता. बहूतेक सर्वजण घरी निघून गेले होते थोडी पावसाची भूर-भूर चालूच होती....
 

ती अजूनहि क्लासच्या बाहेर त्याची वाट पाहत उभीच होती. त्याला बघितल्यावर तिचे डोले चमकले. तिला त्याचा राग आला होता, झपझप चालत त्याच्याजवळ पोहचली. त्याच्या डोक्यावर छञी पकडून त्याचा कान धरला, "तू आजारी असताना इथं का आलास ? आणि पून्हा छञी विसरलास, बापरे ! किती पाणी" त्याच्या डोक्यावरून पाणी झटकत ती म्हणाली, "पूर्ण ओला झालाय आणि मग सर्दी झाली म्हणजे मलाच म्हणशिल...... अरे ! किती बडबड करते मी ? जाऊ दे बरं, डाँक्टर काय म्हाणालें तब्येत कशी आहे ?" दोघेही क्लासच्या बाहेर पायरीवर जाऊन बसले.


तो अजूनही काकडत होता. तिच्या डोळ्यामध्ये त्यांचे बावरलेलं मन स्वत:ची खोलवर रूजलेली प्रतिमा शोधत होत. तिचे निरागस डोळे माञ सदैव त्याच्याच चिँतेत बूडालेलेदिसत होते. त्याच्या अतिभोळेपनाची तिला काळजी वाटायची, त्याच्या प्रेमाच्या वेडेपणाची सीमा अजून तिलाही ठरवता आली नव्हती. त्याच्या कपाळावर तिने हात ठेवला आणि ती दचकलीच, "बाप रे ! किती भयंकर ताप आलाय तूला ! अन, तरी तू एवढ्या पावसात मला भेटायला आला? तूला काही झालं म्हणजे? नाही मीच वेडी आहेँ. मीच थांबते ना ! आता मी थांबणारच नाही, तू बघच मी, थांबतच नाही !" असं द्रृष्ट लागण्याजोगे प्रेम बघून त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी जमा झालं, बोलण्याचा प्रयत्न करताच त्याला खोकला आला.


तिने त्याला न बोलण्याची विनंती केली. त्याचा हात आपल्या हातात घेताच, तिने हातावरुन ओघळणारे लाल रक्त बघीतले. ती यावेळी माञ चिडलीच, "तू हे काय केलंस? तू सलाईन काढले ना? का स्वता:ला ञास करून घेतोस? तुला होणाऱ्या वेदना काळजात सूई प्रमाणे घुसतात,जा ! मी बोलणारच नाही. अरे तुला काही झाले म्हणजे मी आणि माझे जीवन..." त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला.

पुढचे शब्द... काळजाला चिरणारे होते. त्याच्या डोळ्यातून थेँब ओघळला. तिच्या निस्सिम प्रेमासाठी आणि तिच्यासाठी, तरीही त्याच्या डोळ्यातल्या अश्रुनी तिला अस्वस्थ करुन टाकले. तिच्याहि डोळ्यांतून पाणी टपकत होते, "खरच, इतक प्रेम करतोस का रे माझ्यावर...??? मग का असा ञास देतोय ? तुझ्या या वेडेपणानेच मला वेड लावंल-तुझ-तुझ्या प्रेमाचंमी सुध्दा इतकी वेडी आहे ना मी थांबते म्हणून तर तू येतोस. दोघेपण अगदी वेडे आहोत." तिने त्याच्या खांद्यावर मान टेकवली.

तिचे डोके थापटत, तो माञ कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात हरवून गेला होता, तिथे फक्त तिच्या बांगड्यांची किण-किण आणि तिचा आवाज कानी येत होता. तेवढ्यात त्याच्या सरांची थाप त्याच्या पाठीवर पडली, "काय रे ? केव्हाचा आवाज देतोय-काय करतोय इथं एकटा ? एवढ्या पावसात का बसलाय ? घरचे म्हणत होते तू आजारी आहेस म्हणुन" सरांच्या आवाजाने तो भानावर आला.... त्याने मान डोलवली. सर आत निघून गेले.

भरलेल्या डोळ्यानी किँचित मागे वळूनपाहिले. क्लासमध्ये टांगलेल्या तिच्या फोटोची माळ वाऱ्यानिशी हालत होती. ती क्लास मधली एक हूशार विद्यार्थीनी होती...!!! सर्व काही द्रृष्ट लागल्या प्रमाने घडून गेलं होत. स्वप्नाहूनही सुंदर अशा त्यांच्या दुनियेवर काळाने अशी झडप घातली कि त्या दुनियेतील सर्व सुख काळ आपल्या बरोबर घेऊन गेला होता.

फुलांआडून डोकवणाऱ्या तिच्या डोळ्यामध्ये घोर चिँता दिसून येत होती. कोण समजून घेणार माझ्या या वेड्याला ? कोण शिकवणार याला माझ्याशिवाय जगणं? कोणी जपेल का याला माझ्याप्रमाणे ? असे अनेक प्रश्न तिला पडले असावे. त्याचे मन माञ एखाद्या वेड्या हरणाप्रमाणे तिच्या सावलीमागेच पळत होतं, ते हे मानायला तयारच नव्हत की तिच अस्तित्व आता संपलय म्हणून.

असे सावल्यांचे खेळ-आभास त्याच्या जिवनाचा एक भागच बनून गेले होते. ह्रूदयात जपून ठेवलेल्या तिच्या आठवणी अश्रु बनुन क्षणा-क्षणाला बाहेर पडत होत्या. तिची प्रतिमा डोळ्यामध्ये भरून जड अंत:करनाने तो सायकल जवळ गेला. काकडंत- काकडत त्याने सायकल घेतली व घराकडे चालू लागला आणि चालता-चालता बेशुध्द होऊन पडला......

हे सर्व प्रेम होत कि वेड ! मी त्यावेळी हे सारे फार जवळून बघितले होते. का कुणीतरी इतकही प्रेम करू शकत ? हे असं कसं प्रेम होत जे म्रूत्युनंतर सुद्धा जिंवत होत? खरचं त्याच्या वेडे पणाला म्रूत्युच्याही मर्यादा कमी पडल्या होत्या....

या अगोदर तो खुप चांगला असायचा, क्षणोक्षणी त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायचा, पण त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हास्य मी पहीलेच नाही.

आता त्याने आपल्या मनावर ताबा मिळवलाय. सर्वाशी तो चांगला वागतो अगदी पूर्वीप्रमाणे. पण फरक एवढाच आहे की तो पूर्वी सर्वाशी बोलु शकत होता. त्यावेळी आजारात त्याने आपली वाचा गमावली होती. त्या दोघांच्या सुखासमोर स्वर्गसूद्धा फिका पडत असावा म्हणुन देवालाही हेवा वाटला आणि...

जेथे खरोखर चांगल घडत असतं तेथेच नशिब तोकडे पडते हा प्रश्न तर फार पूर्वीपासून अनुत्तरीतच आहे... असं नेहमी का घडतं ?...का ?

 

No comments:

Post a Comment

Read This Heart Touching Stories