Jayesh Gujrati's Blog (in Marathi): Tragedy

Search

Showing posts with label Tragedy. Show all posts
Showing posts with label Tragedy. Show all posts

Friday, February 15, 2013

अरे माझ लग्न ठरलं...

आज तिचा फोन आला..
शब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज झाला ..

स्वतःला सावरून तिन सांगितलं,

  "अरे माझ लग्न ठरलं..."
 
 



 ती सावरली पण तो क्षणात ढासळला..
अन मग दोघ्यांच्या आसवांपुडे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला..

शब्द सगळे हवेत विरले...

ती म्हणाली 

"माफ करशील ना रे मला ?? "

तो म्हणाला  

"आपराध्यासारखी माफी का मागतेस?
कर्तव्यपूर्ती  करून तू आई-वडिलांचा मन राखातेस..
या जन्मी नाही झालीस माझी..
तरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त माझा हक्क असेल...
"

हे ऐकून म्हणाली 

"हृदयाच्या कप्यात आठवनीच्या कोपऱ्यात फक्त तुझी प्रतिमा असेल..."
धीर देऊन त्यान तिचा फोन ठेवला..

कुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून तो पावसात जाऊन उभा राहिला...

Thursday, February 14, 2013

एकतर्फी प्रेमाचा विचार करशील?

मी तुज्या वर प्रेम करायला थकणार नाही...
मी तुजी काळजी घ्यायचे कधी सोडणार नाही.. 

तू माज्यावर प्रेम करत नाही, म्हणून काय झाले..
मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..
हे तुला मान्य करावेच लागेल..



तुला मी तितकासा आवडत नसलो.., म्हणून काय झाले .. 
मी तुज्याशिवाय जगू शकणार नाही ..
हे तुला समजावेच लागेल.. 


मी तुज्या येण्याची वाट पाहून थकणार नाही..
तू येशील आणि हि आशा कधी सोडणार नाही.. 


तुला माज्या भावना कळत नसतील, म्हणून काय झाले...
मी समजेन तुजी मजबुरी..
तुला माज्याशिवाय जगता येत असले, म्हणून काय झाले...
मी समजेन माझी प्रेम कहाणी अधुरी.. 


मी तुला समजावता समजावता थकणार नाही ..
माजे मन तुला समजल्याशिवाय राहणार नाही .. 


मी तुला आयुष्यभर समजावत राहीन..

पण एकदा तरी...
या एकतर्फी प्रेमाचा विचार करशील?
मी तुज्या खुशीसाठी तुला सोडेन ..

 

पण एकदा तरी...
या प्रेमवेड्याला मनात आणशील?



by unknown

Wednesday, February 13, 2013

हरवले मी स्वर माझे. . .

तो. . . 
वय २५, तसा मुळचा मुंबईचा, पण शिक्षणासाठी पुण्यात जोश्यांकडे राहायचा

ती. . .

वय २२, नृत्य  शिकायची, आई, वडील आणि लहान भावाबरोबर पुण्यातच रहायची
 





तिचा नकार. . .
पण तो तिचं मन वळवण्याच्या प्रयत्नात आजही तिच्या पाठी...

ती घराजवळ पोहोचते, पाठीमागून तो येतच असतो.
शेवटी हतबल होऊन ती

"तुला नक्की हवंय तरी काय?"
"तुझ्या प्रेमाशिवाय दुसरं काय"
"माझ लग्न ठरलंय, निर्णय झालाय"
"तू आनंदी आहेस?"

"हुम्म"
 "नक्की?"
"हुम्म" ती होकारार्थी मन हलवते
मागे वळतो पाठी तिचे बाबा उभे असतात..., त्यांचा गैरसमज..., आणि... डोळ्यावरचा चष्मा खाली पडतो आणि फुटतो... गालावरचा हाथ तसाच राहतो... बाबा तिच्या जवळ येतात आणि दोघे हि नजरे आड होतात... तिला अखेरच बघत... तो नाहीसा होतो... 

अंधार पडू लागतो... रस्त्यात समोरून येणारी गाडी त्याला अस्पष्ट दिसते... अंगावर येणारा प्रकाश... एक निमिष...  आणि मग सर्वत्र अंधार...

 

 दोन महिने उलटतात... फासे हळू हळू पालटू लागतात... दोन दिवसावर लग्न. पण ती गेले दोन दिवस त्याचाच विचार करतेयतिलाही कळत नाहीय अस का होतंय. त्या दिवशी ती बराच वेळ त्या रस्त्यावर ताटकळत उभी होती. आत्ता दिसेल, नंतर दिसेल पण दिसलाच नाही. कॉलेजमध्ये तो बरेच दिवस आलाच नव्हता. जीवाचं काही बर वाईट तर करून नाही ना घेतलं. ती फार बैचेन झाली. शेवटी जोश्यांकडे पोहोचते. त्याच मोठा अपघात झाल्याच कळत. ती त्याचा नंबर घेते. घाबरत घाबरत त्याला फोन लावते. रिंग वाजते. फोनही उचलला जातो. तो तिचा आवाज ओळखतो. ती रडत असते. रडत रडत बोलत असते.

त्याच्या मनात अनेक विचार येऊन जातात. धूसर धूसर अनेक प्रश्न ठेऊन जातात.

तो काहीच बोलत नाही. दोघेही भावनाविवश होतात. तो फोन ठेऊन देतो.
ती फोनकडे बघत राहते. तो बोलला का नाही.

दोन दिवसावर लग्न. . .

आता तिला सगळ असह्य होत चाललंय. त्याला भेटण गरजेच आहे, कोणत्याही परिस्थितीत. ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते. त्याच्या घरी पोहोचते. तो आत्ताच पुण्याला निघाल्याच कळत. तातडीने पुण्याची वाल्व्हो पकडते. सीट जवळ येते. आणि जे पाहते त्यावर तिचा विश्वासच बसत नाही.

तो समोर असतो. . .
काही बोलायला तिच्याकडे शब्दच नसतात...

तो एक कागद घेतो... त्याचावर काही तरी गिरवतो आणि तिच्या हातात देतो...
 

हरवले मी स्वर माझे रात्रीत त्या एक...
आहेत गोठले कंठी शब्द ते शब्द अनेक...
भावनेत माझ्या असतील सर्व शब्द...
कळतील तुला का ते बोल.... निशब्द.....

भान हरपते. . .


कंठातील शब्द कंठात कोचणार का...?
प्रेम तुझे शब्दात मोजणार का...? 

कागद निसटतो. . .

आणि दोघ एकमेकांना मिठीत घेत पुढच्या मार्गाला लागतात...


- Unknown 

Sunday, April 29, 2012

प्रेमपत्र

काही गोष्टी अशा असतात, की त्या समोराच्याला सांगायच्या असूनही आपण सांगू शकत नाही. मी माझं प्रेम व्यक्त करायला हवं होतं की नाही, हा प्रश्न मला आजही पडतो. 

तुझं ते येणं, हसणं, माझ्याशी बोलताना घाबरणं, कधीकधी गोंधळणं अजूनही मला सर्व काही आठवतं. तू आल्यावर मला काही सुचायचंच नाही. फक्त तुझ्याकडे बघत राहावं, असं वाटायचं. तू गेल्यावर मैत्रिणीबरोबर मी तुझ्यावर शेरेबाजी करायचे. माझ्या प्रेमाचं गुपित मी मनातच ठेवलं. म्हणतात ना, 'काही नाती असतात अबोलपणे बोलण्याची, मनातल्या मनात जोडून मनातच तोडण्याची...' 


मला अजूनही तुझी पहिली भेट आणि बाकीच्या आठवणी लक्षात आहेत. त्या कधीच विसरू शकणार नाही. ज्या गोष्टी आपण विसरत नाही, त्यालाच तर आठवणी म्हणतात. नंतर मी स्वत:मध्येच हरवू लागले. नेहमी तुझाच विचार करायचे. तुझ्या वागण्यातून मला एक प्रकारचा संकेत मिळायचा. पण वाटायचं, की हा माझा भास तर नाही ना? दोन प्रेमींसारखं आपण कधी वागलोच नाही. एवढंच काय, आपण एकमेकांशी मैत्रीसुद्धा केली नाही. फक्त कामांपुरतंच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बोलणं व्हायचं. आपण दोघं एकमेकांच्या समोर असल्यावर एवढं गोंधळायचो, की काय बोलायचं हे सुचायचंच नाही. मी तुला जितकं विसरायचा प्रयत्न करते, तितकाच तू मला आठवत राहतोस. जेव्हा मला खूप मनापासून वाटत असतं, की तू दिसावास तेव्हा प्रत्यक्षात तू दिसत नाहीस. पण माझ्या ध्यानीमनी नसतानाही अचानक तू मला दिसतोस. असं का होतं? तुला पाहिलं, की माझे डोळे लगेच भरून येतात. आनंदाने की दु:खाने, हे माझं मला समजत नाही. 

जेव्हा मला तुझी गरज होती, तेव्हा तू माझ्यापासून खूप दूर होतास. आजही मला तू हवा आहेस. पण तू माझ्या जवळ नाहीस. कदाचित या वेडीचं नावसुद्धा तुला माहीत नसेल. मला फक्त एकदाच तुला सांगायचं आहे, की मी तुझ्यावर खूप भरपूर, सॉल्लिड... माझ्याकडे शब्दच नाहीत, पण खरंच प्रेम करते.


                                                                              - तुझीच वेडी

Saturday, April 28, 2012

प्रेमात आंधळं होवू नका.....!!!


एक सुंदर पण खूप अबोल मुलगी. वडील पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे दर ३-४ वर्षांमध्ये बदल्या होत असायच्या त्यामुळे ह्या शाळेत ४ वर्ष मग दुसऱ्या शाळेत ३ वर्ष असे करत करत तिचं बीकॉम पर्यंतच शिक्षण झाले. त्यामुळे तिचे मित्र-मैत्रिणी कधीच होवू शकल्या नाहीत. आणि मुळ स्वभावच अबोल असल्यामुळे स्वताहून तिनेही मैत्रीसाठी कुठे हाथ पुढे केला नाही. तिच्या वडलांची शेवटच्या १० वर्षासाठी मुंबई मध्ये बदली झाली. इथे आल्यावर घरात बसून बसून ती खूप कंटाळत असायची म्हणून तिच्या वडलांनी तिला Computer कोरस करायला सांगितला म्हणजे तिचा वेळ पण जाईल आणि थोड शिक्षण पण मिळेल. त्याप्रमाणे त्या एरिया मधेच तिला क्लास लावून दिला. ती नियमित क्लासला जायला लागली. तिथेच तिची ओळख समीरशी झाली. तोही तिथे क्लासला येत होता. समवयस्कर होता त्याने बी.ए. पूर्ण करून तो क्लास लावला होता. तो राहायला पण तिच्या अगदी घराजवळच होता. समीरने तिच्याशी मैत्री केली. दोघेही एकत्र क्लासला यायला जायला लागले. असे करत करत ६ महिने उलटून गेले. आतापर्यंत मैत्री खूप घनिष्ट झाली होती. वेळ साधून समीरने तिला प्रपोज केले. पण वडिलांबद्दल खूप आदर असल्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध काही करायची तिची हिम्मत नव्हती, कारण तिच्या वडिलांना तीच लग्न उच्चशिक्षित, आणि भरपूर पगार असलेल्या मुलाशी करून द्यायचं होत. आणि समीर जेमतेम बी ए होता आणि नोकरीचा तर अजून थांगपत्ता नव्हता. त्यामुळे तिने समीरला आपला निर्णय त्यावेळी दिला नाही.


असाच महिना लोटला, आणि अचानक समीरचा फोन आला कि मला नोकरी मिळाली आहे एका आठवड्यात मला बंगलोरला जायचय. आणि मला २५००० पगार मिळणार आहे. आता मी तुझ्यावडीलांशी लग्नाबद्दल बोलू शकतो, सुजाताला खूप आनंद होतो, आणि ती त्याला आपला होकार देवून टाकते. दोन दिवसांनी समीर तिच्या घरी येतो, तिचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. समीर खूप खुश होवून तिच्याशी बोलत होता, नोकरी बद्दल सर्व काही सांगत होता, मी तुझ्या वडिलांशी बोलतो आणि त्यांना सांगतो कि मी सहा महिन्यांनी सुट्टी घेवून परत येईन मग मी सुजाताशी लग्न करेन. तिलाहि खूप आनंद होतो, पण त्या आनंदात काही भलतच घडत, जे घडू नये असे बरेच काही, कारण घरात त्यावेळी ते दोघेच असतात, सुजाता त्यातून भानावर येते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, ती खूप घाबरते आणि रडायला सुरवात करते पण समीर तिची समजूत काढतो तिला समजावतो, काही होणार नाही आपण डॉक्टर कडे जावूया काही होणार नाही, तू काळजी करू नकोस असेही आपले सहा महिन्यातच लग्न होणार आहे. तो तिला मेडिकल मध्ये घेवून जातो, कुठलीतरी एक गोळी देतो तू आता काळजी करू नकोस काही होणार नाही. आणि तो तिला घरात आणून सोडतो आणि आपल्या घरी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा कॉल येतो तो बोलतो कि मला काळ रात्रीच बंगलोरसाठी निघावं लागलाय पण तू तुझ्या वडिलांना सांग कि मी सहा महिन्यात येतो आणि आपण लग्न करणार आहोत असे. ती आधीतर खूप घाबरते पण सर्व धीर एकटवून वडिलांशी बोलते. ते म्हणतात कि ठीक आहे मी त्याची वाट बघतोय, सहा महिन्यांनी त्याला त्याच्या आई-वडिलांना घेवून आपल्या घरी यायला सांग. तिला खूप बर वाटत. ती हि बातमी समीर कॉल करून लगेच देते.

पण पुढच्याच महिन्यात सर्व काही बदलून जात, तिला समजून येत कि ती Pregnant आहे, तिला काय कराव काहीच काळात नसत, आणि नेमके गेले ८ दिवसापासून समीरचा आणि तिचा संपर्क होवू शकला नव्हता. तिने ते सांगण्यासाठी परत त्याला कॉल केला. पण समीरशी काहीकेल्या संपर्क होत नव्हता. ती सारखी रडतच होती, तिने ठरवले कि समीर ज्या ठिकाणी राहत होता तिथे जावून चौकशी करावी. तिथे गेल्यावर पण तिला काहीच माहिती नाही मिळाली. ती तिथेच त्याच्या घराबाहेर रडत बसली. तेवड्यात एक मुलगा तिच्या जवळ आला त्याने तिला विचारले, तिने त्याला समीरबद्दल काही माहिती आहे का असे विचारले. त्याने सांगितले कि तो एक नंबरचा फ्रॉड होता त्याने असेच तुझ्यासारख्या २-३ मुलींना फसवून इथून पळून गेला आहे. तो बंगलोरला नाही तो दिल्लीला असतो. माझ्या एका दुसऱ्या मित्राकडे त्याचा नंबर आहे मी त्याच्याकडून घेवून तुला देतो. आणि त्यामुलाने त्याचा नंबर मिळवून तिला दिला. तीने समीरला कॉल केला, आणि सर्व सांगितले त्याने तीला सांगितले कि जावून abortion कर मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही आणि परत मला संपर्क करण्याच्या भानगडीत पडू नकोस...कारण हा नंबर यापुढे कधीच चालू नसेल. त्याच्या या उत्तरामुळे ती खूप shock होते आणि तशीच तिथून धावत आपल्या घरी जाते एकदा विचार करते कि घरी सर्व सांगायचं पण वडिलांच्या इज्जतीचा विचार तिच्या मनात येतो आणि ती सरळ आपल्या रूम मध्ये जावून काही कुणाशी न बोलता गळफास लावून घेते.....आणि हे सर्व संपवून टाकते.

सुजाताच आयुष्य तर असाच फुकट गेलं मित्रांनो...पण अशा सुजाता अजून होवू नये ह्याची दक्षता आपण स्वताच घेतली पाहिजे खास करून मुलींनी.

प्रेमात आंधळं होवू नका.....!!!

Tuesday, April 24, 2012

तुही खुप रडशील

दिवस उजड़त गेला पण विचार काही संपले नाही .
पक्ष्यांचा किलबिलत सुरु झाला पण विचाराना शांतता लाभली नाही.



प्रत्येक सकाळी ठरवते विसरून जाईन तुला.
आणि प्रत्येक रात्री आठवल्याशिवाय झोप नाही येत मला,


कधी हे सगले संपेल कधी ह्या मनाला शांतता मिळेल.
अस वाटत हे आता माझ्या श्वासाबरोबरच थांबेल,

डोळ्यातले अश्रु पुसायची हिम्मत होत नाही .
कारन त्याना पण आता सुकायची सवय झाली.

दोष तुझा नाही माझा आहे,
तुला विसरण्याचा हाच तर एक बहाना आहे,

बहाने लाख मिळाले तुला विसरायचे पण त्याचा उपयोग काही झालाच नाही ,
विसरून जायचे म्हंटले तरीही मन तयार होतच नाही,


राहिले आयुष्य तुझ्या आठवनींच्या नावावर,
खेळ खेळतेय आयुष्याचा शेवटच्या वाटेवर,


मी गेल्यानंतर तुही खुप रडशील.
मग माझ्या आठवनीत तुही तळमळशील.....

Friday, April 20, 2012

का ?... असं नेहमी का घडतं ?

तो अजुनहि झोपलाच होता, वर टांगलेल सलाईन वाऱ्या निशी हालत होत. त्यातून टपकनारे थेँब त्याच्या रक्तात भिनत होते. झोप कसली येत होती त्याला...?? उघड्या डोळ्याने तो एकाच ठिकानी बघत होता. त्याची आई औषधे व गोळ्या घेवून आली, त्याला थोडे फार खाण्याची विनंती केली. 

पण त्याने गप्प राहून नकार दिला,  आई गेल्यानंतर त्याने एका हाताने औषधे व गोळ्या घेतल्या........ .
घड्याळाच्या टोलानीँ त्याचे लक्ष वेधले. सहा वाजले होते, त्याने चटकन चादर बाजूला केली 'अरे बापरे ! क्लास तर संपून गेला असेल' अंगात एवढेही बळ नसताना त्याने हातातली सुई खेचून काढली. भळ-भळनाऱ्या रक्तावर कापसाचा बोळा पकडून तो सायकल जवळ गेला. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हत. भर पावसात तो सायकल घेवून क्लासकडे गेला. क्लास तर केव्हाच संपून गेला होता. बहूतेक सर्वजण घरी निघून गेले होते थोडी पावसाची भूर-भूर चालूच होती....
 

ती अजूनहि क्लासच्या बाहेर त्याची वाट पाहत उभीच होती. त्याला बघितल्यावर तिचे डोले चमकले. तिला त्याचा राग आला होता, झपझप चालत त्याच्याजवळ पोहचली. त्याच्या डोक्यावर छञी पकडून त्याचा कान धरला, "तू आजारी असताना इथं का आलास ? आणि पून्हा छञी विसरलास, बापरे ! किती पाणी" त्याच्या डोक्यावरून पाणी झटकत ती म्हणाली, "पूर्ण ओला झालाय आणि मग सर्दी झाली म्हणजे मलाच म्हणशिल...... अरे ! किती बडबड करते मी ? जाऊ दे बरं, डाँक्टर काय म्हाणालें तब्येत कशी आहे ?" दोघेही क्लासच्या बाहेर पायरीवर जाऊन बसले.


तो अजूनही काकडत होता. तिच्या डोळ्यामध्ये त्यांचे बावरलेलं मन स्वत:ची खोलवर रूजलेली प्रतिमा शोधत होत. तिचे निरागस डोळे माञ सदैव त्याच्याच चिँतेत बूडालेलेदिसत होते. त्याच्या अतिभोळेपनाची तिला काळजी वाटायची, त्याच्या प्रेमाच्या वेडेपणाची सीमा अजून तिलाही ठरवता आली नव्हती. त्याच्या कपाळावर तिने हात ठेवला आणि ती दचकलीच, "बाप रे ! किती भयंकर ताप आलाय तूला ! अन, तरी तू एवढ्या पावसात मला भेटायला आला? तूला काही झालं म्हणजे? नाही मीच वेडी आहेँ. मीच थांबते ना ! आता मी थांबणारच नाही, तू बघच मी, थांबतच नाही !" असं द्रृष्ट लागण्याजोगे प्रेम बघून त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी जमा झालं, बोलण्याचा प्रयत्न करताच त्याला खोकला आला.


तिने त्याला न बोलण्याची विनंती केली. त्याचा हात आपल्या हातात घेताच, तिने हातावरुन ओघळणारे लाल रक्त बघीतले. ती यावेळी माञ चिडलीच, "तू हे काय केलंस? तू सलाईन काढले ना? का स्वता:ला ञास करून घेतोस? तुला होणाऱ्या वेदना काळजात सूई प्रमाणे घुसतात,जा ! मी बोलणारच नाही. अरे तुला काही झाले म्हणजे मी आणि माझे जीवन..." त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला.

पुढचे शब्द... काळजाला चिरणारे होते. त्याच्या डोळ्यातून थेँब ओघळला. तिच्या निस्सिम प्रेमासाठी आणि तिच्यासाठी, तरीही त्याच्या डोळ्यातल्या अश्रुनी तिला अस्वस्थ करुन टाकले. तिच्याहि डोळ्यांतून पाणी टपकत होते, "खरच, इतक प्रेम करतोस का रे माझ्यावर...??? मग का असा ञास देतोय ? तुझ्या या वेडेपणानेच मला वेड लावंल-तुझ-तुझ्या प्रेमाचंमी सुध्दा इतकी वेडी आहे ना मी थांबते म्हणून तर तू येतोस. दोघेपण अगदी वेडे आहोत." तिने त्याच्या खांद्यावर मान टेकवली.

तिचे डोके थापटत, तो माञ कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात हरवून गेला होता, तिथे फक्त तिच्या बांगड्यांची किण-किण आणि तिचा आवाज कानी येत होता. तेवढ्यात त्याच्या सरांची थाप त्याच्या पाठीवर पडली, "काय रे ? केव्हाचा आवाज देतोय-काय करतोय इथं एकटा ? एवढ्या पावसात का बसलाय ? घरचे म्हणत होते तू आजारी आहेस म्हणुन" सरांच्या आवाजाने तो भानावर आला.... त्याने मान डोलवली. सर आत निघून गेले.

भरलेल्या डोळ्यानी किँचित मागे वळूनपाहिले. क्लासमध्ये टांगलेल्या तिच्या फोटोची माळ वाऱ्यानिशी हालत होती. ती क्लास मधली एक हूशार विद्यार्थीनी होती...!!! सर्व काही द्रृष्ट लागल्या प्रमाने घडून गेलं होत. स्वप्नाहूनही सुंदर अशा त्यांच्या दुनियेवर काळाने अशी झडप घातली कि त्या दुनियेतील सर्व सुख काळ आपल्या बरोबर घेऊन गेला होता.

फुलांआडून डोकवणाऱ्या तिच्या डोळ्यामध्ये घोर चिँता दिसून येत होती. कोण समजून घेणार माझ्या या वेड्याला ? कोण शिकवणार याला माझ्याशिवाय जगणं? कोणी जपेल का याला माझ्याप्रमाणे ? असे अनेक प्रश्न तिला पडले असावे. त्याचे मन माञ एखाद्या वेड्या हरणाप्रमाणे तिच्या सावलीमागेच पळत होतं, ते हे मानायला तयारच नव्हत की तिच अस्तित्व आता संपलय म्हणून.

असे सावल्यांचे खेळ-आभास त्याच्या जिवनाचा एक भागच बनून गेले होते. ह्रूदयात जपून ठेवलेल्या तिच्या आठवणी अश्रु बनुन क्षणा-क्षणाला बाहेर पडत होत्या. तिची प्रतिमा डोळ्यामध्ये भरून जड अंत:करनाने तो सायकल जवळ गेला. काकडंत- काकडत त्याने सायकल घेतली व घराकडे चालू लागला आणि चालता-चालता बेशुध्द होऊन पडला......

हे सर्व प्रेम होत कि वेड ! मी त्यावेळी हे सारे फार जवळून बघितले होते. का कुणीतरी इतकही प्रेम करू शकत ? हे असं कसं प्रेम होत जे म्रूत्युनंतर सुद्धा जिंवत होत? खरचं त्याच्या वेडे पणाला म्रूत्युच्याही मर्यादा कमी पडल्या होत्या....

या अगोदर तो खुप चांगला असायचा, क्षणोक्षणी त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायचा, पण त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हास्य मी पहीलेच नाही.

आता त्याने आपल्या मनावर ताबा मिळवलाय. सर्वाशी तो चांगला वागतो अगदी पूर्वीप्रमाणे. पण फरक एवढाच आहे की तो पूर्वी सर्वाशी बोलु शकत होता. त्यावेळी आजारात त्याने आपली वाचा गमावली होती. त्या दोघांच्या सुखासमोर स्वर्गसूद्धा फिका पडत असावा म्हणुन देवालाही हेवा वाटला आणि...

जेथे खरोखर चांगल घडत असतं तेथेच नशिब तोकडे पडते हा प्रश्न तर फार पूर्वीपासून अनुत्तरीतच आहे... असं नेहमी का घडतं ?...का ?

 

Friday, April 13, 2012

गोल्ड मेडल

दोघं एकाच शाळेत आणि मग एकाच कॉलेज मधे होते. इतक्या वर्षांची छान मैत्री होती दोघांची.

ती - दिसायला अतिशय सुंदर, सतत बोलणारी, सतत हसणारी, खूप हुषार.

... तो - अतिशय साधा, गप्प-गप्प राहणारा, अगदी चार-चौघांसारखा.
...

सतत बरोबर असायचे दोघं - अभ्यास, खेळ, सिनेमा, पिकनिक, टाइम-पास - काहीही असो - ना ती कधी त्याला बोलवायला विसरायची, ना तो कधी तिला सोडुन कुठे जायचा.. खरं म्हणजे ती त्याला हक्कानेच बोलवायची.. आणि त्याला तिला सोडुन कुठे एकटं जाणं शक्यच नव्हतं.."अरे! आज मला युनिव्हरसिटीत थोडं काम आहे. येतोस का बरोबर?"


असा नुसता तिचा फोन आला.. आणि तो जेवण अर्धवट सोडुन तसाच बाईक घेऊन तिच्या घरी पोचला. त्याची आई म्हणतच राहिली त्याच्या पाठीमागे, "अरे, निदान जेवण तरी संपव..." पण त्याला कुठे भान होता... 

बाईकवर ती नेहमी त्याच्याच मागे बसायची. आणि तो ही दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीला मागे बसु द्यायचा नाही. 

ती दमली असेल तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची. तीचे केस वाऱ्यानी उडायचे, हलकेच त्याच्या गालवर 

बसुन त्याला गुदगुली व्हायची.

लहानपणापासुनच दोघं एकत्र असल्याने दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं.

तिचं एक स्वप्न होतं - तिला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल हवं होतं. त्या करता ती मेहनतही तशी घेत होती. तास न तास अभ्यास करत होती. सोबतीला तो बसुन रहायचा. तिला झोप येऊ नये, तिचं concentration राहावं म्हणुन रात्री तिला तिची आवडती कॉफी करुन द्यायचा. तिचा वेळ नको वाया जायला म्हणुन तिच्या करता नोट्स, पेपर्स झेरॉक्स करुन आणायचा.

परीक्षा झाली. निकाल लागले. त्याला फर्स्ट क्लास मिळाला. त्याच्या करता तो खरं जास्तीच होता. आणि ती? 

तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिला गोल्ड मेडल मिळालं..


त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला.

हातात एक लाल गुलाबाचं फुल होतं तिच्या.

तो प्रचंड खुष होता - फर्स्ट क्लास करता नाही, तर तिला गोल्ड मेडल मिळालं म्हणुन.

"आज मी खूप खुष आहे. एक गंमत झाली.

तुला विनय आठवतोय? दादाचा बेस्ट फ्रेंड? अमेरीकेला असतो गेले २ वर्ष.

परवाच आला तो १५ दिवसांकरता, आज त्याला कळलं माझ्या रिझल्ट बद्दल. म्हणुन हे गुलाब घेऊन आला मला congratulate करायला. आणि 

त्यानी मला चक्क प्रपोज केलं!! म्हणजे पूर्वी तो इथे असताना माझा क्रश होताच त्याच्यावर. पण मला कधी वाटलं नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम असलं तरी तो माझ्याकडे बघेल म्हणुन! मला म्हट्ला की अमेरीकेला मला पुढचं शिकता येईल.

आई-बाबांना सुद्धा तो पटला. त्यांनी पण लगेच हो सांगीतलं. येत्या रविवारी साखरपुडा आहे. त्याला लवकर 

परत जायचं आहे ना...म्हट्लं तुला येऊन आधी सांगते.

तुला पण कोणी आवडत असेल, तर तु मलाच पहिलं सांगशील ना?"


तो गप्प राहिला... नेहमी सारखा.. नुसतंच "हं" केलं..

तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी.. ती त्या गुलाबाकडेच बघत होती

Tuesday, April 10, 2012

प्रेमविवाह

मी यंदाच्या सुट्टीत माझ्या काकांच्या घरी गेलो होतो. त्याचं घर गावापासून थोडस दूर आहे. काकांचा दुधाचा व्यवसाय आहे, तिथेच त्यांच्या कडे काम करत असलेल्या मुलाची हि कथा आहे. 

त्या मुलाच एका मुलीवर खूप प्रेम होत आणि त्यामुलीच सुद्धा. दोघेही एकाच जातीचे होते पण दोघांच्याही घरातून त्यांच्या लग्नसाठी विरोध होता. ज्यादिवशी मुलीच्या घरच्यांना त्याच्या बद्दल कळाले तेव्हा त्यांनी त्या मुलाला खूप मार मार मारले आणि गावाच्या बाहेर नेवून फेकून दिले. मुलाच नशिब  चांगल म्हणून तो बिचारा कसाबसा त्यातून वाचला. त्याच्या घरच्यांनी त्याला दुसऱ्या एका लांब गावात आपल्या नातेवायकांकडे उपचारासाठी आणून ठेवले. दोन महिन्यात तो बरा झाला, पण त्याला तिच्याशीच लग्न  करायचं होत. 


त्याने तिला संपर्क केला आणि त्या दोघांच असे ठरले कि गावात त्या मुलाच्या मित्रांची मदत घेवून तिथून पळून जायचं. पण एक मोठी अडचण हि होती कि त्या मुलीला १८ वर्ष पूर्ण होण्यासाठी ३ महिने बाकी होते. त्या मुलाच्या मित्राने त्याला एक कल्पना सुचवली. तुम्ही इथून पळून जा, देवळात लग्न करा आणि तीन महिने मी सांगतो त्या ठिकाणी लपून राहा. माझ्या ओळखीच एक गृहस्थ आहेत ज्यांचा दूधाच व्यवसाय आहे आणि त्याचं घर सुद्धा गावापासून थोड लांब आहे. (ते म्हणजे माझे काका) तू त्यांच्या कडे नोकरी कर ते तुला माझ्या सांगण्यावर राहायला एखाध छोटास घर पण देतील आणि तुला नोकरी पण. 

ठरल्या प्रमाणे सर्व झाल देवळात लग्न करून त्या दोघांना त्याचा तो मित्र माझ्या काकांकडे घेवून आला. सर्व प्रकार सांगितला काकांनी राहायला घर आणि नोकरी पण दिली, ती मुलगी पण शिकलेली होती त्यामुळे तिनेही काकांच्या मुलाचा HOMEWORK घ्यायचं काम केल. पण त्यादिवशी प्रकरण काही वेगळाच वाटत होत. मी घरातून बाहेर बघितल तर तो मुलगा आणि ती मुलगी दोघ खूप टेन्शन मध्ये दिसत होती मुलगातर खूप घाबरला होता.  आणि ती मुलगी खाली मन घालून उभी होती. ते दोघ माझ्या काकांशी काही बोलत होते. 

काकांना विचारल्यावर मला कळाले कि मुलीच्या घरच्यांनी त्या मुला विरुद्ध तक्रार नोंदवली पोलीस स्टेशनमध्ये, पोलिसांनी तपास करत त्या मुलाचा शोध लावला ज्याने त्या दोघांना पळण्यात मदत करून काकांकडे आणून सोडले होते. त्याची कसून चौकशी केली त्याला खूप मारल पण तरीही त्या मुलाने आपले तोंड नाही उघडले. पोलीस त्याला सतत त्रास देतच होते. पण त्या मुलाच्या सासूला माहित होते कि आपल्या जावयाने त्या दोघांना कुठे लपवून ठेवलेय ते. पोलीस सारखे आपल्या जावयाला त्रास देतायत हे पाहून तिने पोलिसांना खर काय ते सांगून टाकले होते. ह्याच सर्व टेन्शन मुळे ते घाबरले होते. पोलीस कधीही तिथे पोचले असते. त्यामुळे काका आणि काकांचा मोठा मुलगा दोघाही विचारात पडले होते त्या मुलीला १८ पूर्ण व्हायला अजून एक महिना बाकी होता. अजून एकाच महिना कसातरी लपून राहायचा होता. तितक्यात काकांना एक मित्राच घर आठवले जे औरंगाबादला होते. काकांनी त्यांना सांगितले कि तुम्ही आताच्या आता तिकडे निघा मी माझ्या मित्राला फोन करून सांगतो. तो तुमची सर्व सोय करेल एक महिना तिथे थांबा मग मी तुमच लग्न लावून देयीन आणि मग इथेच राहा माझ्याकडे. 

पण ते दोघेही खूप घाबरले होते अजूनही. त्यांनी कपडे भरले ब्यागेत आणि मीच त्यांना सोडायला गेलो त्यांना ST पकडून स्टेशनला जायचे होते आणि तिथून रात्रीच्या ट्रेनने औरंगाबादला. मी त्यांना माझ्याकडून जमेल तितक धीर देण्याचा प्रयत्न केला निघताना. खूप समजावलं आणि अजिबात टेन्शन घेवू नका आम्ही सर्व तुमच्या बाजूने आहोत सांगितले आणि निरोप घेवून मी निघालो. मी घरी त्यांना सोडून संध्याकाळी घरी आलो....आम्ही सर्व त्यांच्या बद्दलच विचार करत बसलो होतो. नंतर रात्री जेवायच्या वेळेस आम्ही एकत्र जेवायला बसलो पण काका जेवायला नाही आले. म्हणाले मी नंतर बसतो तुम्ही जेवा. 

आमच जेवून झाल्या वर मी काकांकडे आलो जेवायला काकी बोलावते आहे हा निरोप घेवून पण पाहतो तर काका रडत होते मी सर्वांना बोलावले सर्वजण काकांना विचारात होते कि नक्की काय झालाय तुम्ही का रडत आहात. काका म्हणाले रेल्वे पोलीस स्टेशन  मधून फोन आला होता, एका झोडप्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केलीय. त्या मुलाच्या खिशात तुमच विझिटिंग कार्ड मिळाल, म्हणून कॉल केला जर तुम्ही ह्यांना ओळखत असाल तर लवकर स्टेशनला या. आम्ही सर्व सुन्न झालो काका काकी आणि सर्वच खूप रडत होतो. नंतर आम्ही स्टेशनला गेलो. प्रत्येक्षदर्शिने सांगितले कि ते रात्री ८ वाजल्या पासून प्लाटफार्म वर  बसले होते आणि एकमेकांच्या मिठीत सारखे रडत होते, आणि खूप घाबरलेले होते त्यांना औरंगाबादला जायचं असे तो मुलगा एकदा बोलला. पण अजून काही बोलत नव्हते ते दोघ. आणि नंतर अचानक काय झाले आणि एक फास्ट एक्स्प्रेसच्या समोर त्यांनी धावत जावून उडी मारली. आणि सर्व काही संपल. मला तर काहीच समजत नव्हते.....अजून काय करायला पाहिजे होते म्हणजे ते दोघ सुखी झाले असते. माझी खूप इच्चा होती कि त्यांचा सुखाच संसार व्हावा. पण नियतीला ते मान्य नव्हते. 

मूळ कथा - अलोक अकसे

Friday, April 06, 2012

Challenge

एकदा एक मुलगा त्याच्या प्रेयसीला Challenge करतो कि, 
"एक पूर्ण दिवस तू माझ्याशिवाय राहून दाखवायचे, मला फोन, मैल, मेसेज काहीही करायचे नाही,जर तू अस करून दाखविलेस तर मी तुझ्याशी लगेच लग्न करेन ........!!!"

मुलगी म्हणाली, 
"खरे तर मला एक क्षण सुद्धा तुझ्या शिवाय राहायचे नाहीये, पण तरीही आज तू मला Challenge केले आहेस म्हणून मी एक पूर्ण दिवस काहीही Contact न करण्याचे Challenge स्वीकारत आहे !"
 

एक पूर्ण दिवस काहीही contact न करता जातो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी खूप उत्सुकतेने त्या मुलाला भेटायला त्याच्या घरी जाते. पण, घरात पोहोचताच ती तिच्या प्रियकराची पांढर्या-शुभ्र कापडात ठेवलेली व वरती हार घातलेली body बघते आणि तिला एकदम मोठा धक्का बसतो. तिला हे अस कस झाले ???, का झाले ????? काहीच कळत नव्हते... रडावे तर अश्रूंचा पूर येईल, शांत तर राहातच येत नव्हते... कंठ दाटून आलेला... सर्व आठवणी डोळ्यासमोर एक क्षणात उभ्या राहिल्या...

तेव्हड्यात त्याच्या आईने त्याने तिच्यासाठी लिहिलेली चिठ्ठी  तिच्याकडे दिली त्यात लिहिले होते, "कर्करोगाच्या आजरामुळे माझ्या कडे शेवटचा एकच दिवस राहिला होता म्हणून मला तुला Challenge करावे लागले... आणि तू ते करून दाखविलेस. आता फक्त हेच तुला रोज करायचे आहे... माझ्यासाठी...!!!"

Tuesday, April 03, 2012

आई तू का ग सोडून गेली मला...

आई तू का ग सोडून गेली मला ..
हे जग खूप वाईट आहे जगू देत नाही एकट्याला..
मला सतत तुझी आठवण येते एका एका क्षणाला..
कोणीच नाही ग तुज्या पिल्लाचे अश्रू पुसायला..
खूप खूप रडतो रात्री घेऊन उशीला.....
आई तू का ग सोडून गेली मला ..
ये न ग मला कुशीत कुशीत घ्यायला..
माझे बाळ खूप हुशार म्हणायला....
ये न ग मला घास भरवायला ..
एक घास चिऊ चा म्हणत खाऊ घालायला..



आई तू का ग सोडून गेली मला ..

कोणीच नाही इथे मला ओरडायला..
बाळा अभ्यास कर म्हणून सांगायला ..
कोणीच नाही इथे माझ्याशी खेळायला..
पाय दुखल्यावर दाबून द्यायला...



आई तू का ग सोडून गेली मला ..

न icecream खावसे वाटते ना हि केक
कोणीच नाही माझे लाड पुरवायला ...
कसे कसे होते ग रोज झोपताना..
कोणीच नाही पाठीवरून हात फिरवायला..


Monday, April 02, 2012

विदुषक

 रोज तो आपल्या चेहऱ्यावर make up करून एक मुखवटा चढवतो अन स्वतःचा तमाशा करून घ्यायला श्रोत्त्यांसमोर येतो... माणसं पण अगदी खुशीने पैसे मोजून त्या विदुषकाचा तमाशा होतांना पाहायला जातात ...

तो बिचारा वेडावाकडा नाचतो, पडतो-धडपडतो, उंचावरून खाली पडतो अन माणसं त्याच्या लाचारीवर मनभरून हसतात त्याला टाळ्या देतात... दुसऱ्याच्या लाचारीवर हसण्याची माणसांची ही जुनी सवय... तमाशा संपला की मग सगळे निघून जातात.... उरतात फक्त त्या रिकाम्या खुर्च्या ... पण विदुषकाला त्या जास्त जवळच्या वाटतात..
 
कारण त्या कमीतकमी त्याच्यावर हसत तर नाहीत.. मग तो विदुषक आपला मुखवटा उतरवतो आणि आपल्या घराकडे जायला निघतो.. पण तिथे त्याला दिसतात व्यावहारिक जगात राहणारे हे दुसरे विदुषक... लोकांनी आपला तमाशा पहावा यासाठी बंगला, गाडी, पैसा यासारख्या status symbols चा make up करणारे.. तेंव्हा त्याच्या मनात एकच विचार येतो...
 
यांना कधी कळेल की एकदा का तमाशा संपला अन हा make up उतरला की विदुषकाच सोंग घेणारा प्रत्येक जण एक सामान्य माणूस होतो... अन सामान्य माणसाला शक्यतो कोणी ओळखत नाही...
 

 
सर्कशितला विदुषक ...
by and for ; एक एकटा एकटाच...

Tuesday, March 27, 2012

औषधं

मुलगा नुकताच ऑफिस मधून थकून घरी आलेला. त्याच्या वडिलांना दम्याचाआजार असतो, ते विचारतात “बेटा माझे औषधं आणली काय, काल पासून संपली आहेत.” … …

मुलगा : “मी आज खूप थकून आलोआहे, मी उद्या घेवून येईन.”
 
 बाप: “ठीक आहे बेटा तू आराम कर, खूप थकला असशील..!”

(रात्री अचानक त्याच्या वडिलांना त्रास सुरु होतो… घरी औषधं नसल्यानं त्यांना दवाखान्यात नेई पर्यंत त्यांचा मृत्यू होतो…)


काही दिवसांनंतर मुलाला त्याच्या रूम ची सफाई करतांना जुनी डायरी सापडते. ती त्याच्या वडिलांची असते.

त्यात त्याला ३० वर्ष अगोदरची एक लिहिलेली नोंद सापडते, ती असते..  “आज माझ्या सोन्याला ताप आला होता, ‘Taxi’ न मिळाल्यामुळे व दवाखान्याची लिफ्ट बंद असल्यामुळे त्याला खांद्यावर नेतांना थोडा त्रास झाला, पण माझं बाळ आता शांत झोपी गेला आहे.." (वेळ : रात्री २ वाजता..)

त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण … आता सर्व संपले होते.

प्लीज नेवर हर्ट युअर पॅरेंटस… व्हाटेवर यु आर… इज ओन्ली बिकोझ ऑफ देम…!
by: एक एकटा एकटाच

Monday, March 26, 2012

Servants

"कोल्हापूर जवळील एका छोट्या खेड्या मध्ये न शिकलेले आई वडील शेतामध्ये मोलमजुरी करून आपला संसार चालवीत होते, पण मुलाने मात्र भरपूर शिकून मोठे व्हावे, ह्यासाठी त्याला मुंबई मधील महाविद्यालायात शिक्षणास पाठवितात ......  
 काही दिवसांनी आपल्या मुलाला भेटायला ते दोघे मुंबईला जातात व जाताना मुलाच्या आवडीची आईच्या हाताची चटणी-भाकर ते घेऊन जातात.  
महाविद्यालयात गेल्यावर त्यांना अतिशय साध्या कपड्यांमध्ये बघून त्या मुलाची प्रेयसी विचारते 
"Who are they ?
मुलगा म्हणतो
"They are the servants from my village !!!" ते 
ऐकून आई वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात ... 
का?  तर आपलां मुलगा इंग्रजी बोलायला लागला म्हणून... 
 
BY: एक एकटा एकटाच
 

Thursday, March 22, 2012

बाबा, लव्ह यू

एकदा एक माणूस नवी कोरी कार धूत होता. अगदी मन लावून त्याचे काम चालले होते. तिथेच... असलेली त्याची चार वर्षाची मुलगी दगड घेऊन काही तरी करत होती. 

थोड्यावेळाने त्याने पाहिले तर ती टोकदार दगड घेऊन त्या गाडीवर काही तरी लिहीत होती. त्याचा संताप अनावर झाला. "केलास सत्यानाश?" असं म्हणत संतापाच्या भरात त्याने जवळची एक काठी घेतली आणि मुलीच्या बोटांवर मारली. चार वर्षाची चिमुरडी बिचारी कळवळून रडायला लागली.

काठीच्या मार एवढा जोरात होता की तिच्या नाजूक हाताची बोटे फ्रॅक्चर झाली. तातडीने तिला हॉस्पिटलमधये एडमिट करावं लागलं. वडिलांनी मारलं तरी मुलगी मात्र त्यांच्यावर रागावली नव्हती. 
"बाबा, माझी बोटं पुन्हा चांगली कधी होणार" असं ती त्यांना विचारत राहिली.

तिचे वडिल काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून फक्त आपल्या कृत्याचा पश्चात्ताप तेवढा वहात होता. त्यांना स्वतःच्या कृतीवर संताप आला. आपण गाडीच्या प्रेमापोटी आपल्या मुलीला मारले हे त्यांना सहनच झाले नाही.

त्याच भरात ते गाडीजवळ गेले आणि तिच्यामुळे हे घडले म्हणून त्या नव्या कोर्या गाडीवर लाथा झाडायला लागले. थोड्यावेळाने त्यांचे लक्ष
गाडीवर लिहिलेल्या अक्षरांवर गेले. त्यांच्या मुलीने तिथेच काही तरी खरडलं होतं. त्यांनी जवळ जाऊन नीट पाहिलं. त्यावर त्या मुलीनं लिहिलं होतं, 
"बाबा, लव्ह यू"

Monday, March 19, 2012

Be Practical

आमच्या junior college मध्ये एक मुलगी होती.. खूपच सुंदर, निळे डोळे, ओठांवर एक निरागस हसू, गालावर खाली, सोन्यासारखा कांती होतीतिची... जणू काही ती एक अप्सराच होती.. हो, खरच...
सगळ्या मुली तिच्यावर जळायच्या.. आणि सगळे मुले तिच्यावर जीव ओवाळून टाकायचे.. 

पण ती मात्र स्वत:तच गुंग असायची..एक मुलगा तिला आवडायचा.. handsome dashing बोल्ड असा होता तो... तिला साजेसा.. 
योगायोगाने त्यालाही ती आवडायची... फिदा होता तो तिच्यावर... ते दोघे made for each other होते... तो तिला propose करणार होता... RoseDay  होता त्या दिवशी.. त्याने तिला एक मोठा Red Roses चा बुके दिला.. आणि सर्व college समोर तिला तो I Love You म्हणाला... ती हलकेच लाजली, आणि संमती दर्शविली... तेव्हा त्याने अख्या कॉलेज ला सामोसेखाऊ घातले होते.... 
Propose करताना तो तिला म्हणाला "आयुष्यात अगदी काहीही झालं तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही.. दुसऱ्या कुठल्या मुलीकडे कधी वळून सुद्धा बघणार नाही.. जर देवाने मला माझ्या life मध्ये आणि तुझ्या मध्ये काही एक choose करायला सांगितलं तर मी तुलाच choose करेल.. तू फक्त माझी आहेस.. गर्दीत तुला हरवू देणार नाही, तुझा हात कधीच हातातून निसटू देणार नाही.." ती म्हणाली, "मी सुद्धा तुझ्यावर तितकच प्रेम करते.."
एक दिवस ती गाडीवरून घरी येत होती, कानात headfone त्याचाशी बोलत होती.. बोलण्याच्या नादात तिला ट्रकचा होर्न ऐकूच नाही आला, आणि accident झाला.... खूपच गंभीर होता तो accident... त्यात तिचा डावा पाय ट्रक च्या खाली आला, आणि चुराडा झाला पायाचा... डोक्याला खूप लागल.. खूप रक्त गेल... ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.. घरच्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेल.. डॉक्टरांनी सांगितलं कि पाय पूर्णच गेलाय.. artificial पाय बसवावा लागेल.. इतका वेळ ती बेशुद्ध च होती.. ती शुद्धीवर आल्यावर तिला कळाल कि तिला दुसरा पायबसवलाय.. तो तिला भेटायला गेला होता.. त्याला फार वाईट वाटल.. पण तिने त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम नाही तर सहानुभूती पाहिली... नंतर हॉस्पिटल मध्ये तो तिला भेटायला यायचा.. पण खूप कमी बोलायचा.. एकदा तिने हिम्मत करून विचारला, "तू असा का वागतो आहेस?? काय झालाय तुला???" तो म्हणाला, "मला नाही वाटत कि मी हे relationship टिकवू शकेल पुढे..., आपण break up करून टाकू??" ती म्हणाली, "तू पण इतरांसारखाच आहेस... तू तर म्हणाला होतास कि काही झालं तरी माझी साथ सोडणार नाहिसं... मग आता काय झालं??? का ते प्रेम पण खोटं होतं???" तो म्हणाला, "Be Practical यार, मी तुझ्यासोबत आता माझा सगळं आयुष्य कस काढणार??"
शेवटी तो तिला सोडून निघून गेला,. कायमचा... का नाही जाणार??? तो Practical होता...
जो असं वागत नाही त्याला पश्चातापाशिवाय काहीही मिळत नाही...

काय वाटतं तुम्हाला...? शेवटची Line चुकली ना...? मग बदला तर... जशी तुम्हाला वाटते तशीच लिहून काढा... Comment मध्ये...
- Jayesh

Saturday, March 17, 2012

तो एक भिकारी होता...

तो एक भिकारी होता...
लहानपणापासूनच गणपती मंदीरासमोर बसायचा...
येणार्‍या-जाणार्‍याकडे आशाळभूत नजरेने पहायचा...
त्याचा आवाज खूप चांगला होता...
सुरेल आवाजात भक्तीगीतं गायचा...
स्वतःला विसरुन सुरांमध्ये तल्लीन होऊन जायचा...
ती मंदीराजवळच रहायची...
दर मंगळवारी न चुकता मंदीरात यायची...
या मुलाचं तिला विशेष कौतुक वाटायचं...
त्याच्या आवाजातील कारुण्य, तिच्या मनात दाटायचं...
एकदा जाऊन ती त्याच्याशी बोलली...
एकमेकांच्या नकळत, त्यांची मैत्री फुलली...

आता, ती रोज मंदीरात येऊ लागली...
त्याच्यासोबत अखंड गप्पा मारु लागली...
तिनं त्याला लिहायला, वाचायला शिकवलं...
त्यानेही सगळं झटकन आत्मसात केलं...
हळूहळू त्याच्या पंखांना पालवी फुटू लागली...
त्याच्या मनात तिच्याविषयी प्रीत मग दाटू लागली...
त्यानं ठरवलं, स्वतःच्या पायावर उभं रहायचं...
आणि मग कर्तृत्वाच्या जोरावर, तिला मिळवायचं...
वर्ष सरत होती... काळ सरकत होता...
त्याच्या मनात प्रेमाचा अवीट झरा झरत होता...
मग एके दिवशी त्याने, शहरात जायचं ठरवलं...
संगीताच्या विश्वात, नशीब कमवायचं ठरवलं...
तिला न भेटताच, तो शहरात निघून आला...
आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, जोमानं लढू लागला...
रोज भर उन्हात, पायी रखडत जायचा...
मान्यवर संगीतकारांचे उंबरे झिजवायचा...
पण त्याला कधीच कोणी संधी दिली नाही...
त्याच्या गुणांची कोणी कदरच केली नाही...
दिवस उलटत होते, पण त्याचा निर्णय पक्का होता...
स्वतःच्या कर्तृत्वावर, त्याचा विश्वास सच्चा होता...
आणि एके दिवशी, ती सुवर्णसंधी चालून आली...
गायकीच्या स्पर्धेसाठी, प्रवेशिका त्यानं दिली...
त्याच्या आवजाला तिथं वाखाणलं गेलं...
त्याच्या गुणांचे मोल, खरोखर जाणलं गेलं...
आणि मग त्याच्यातील गायकाचा उदय झाला...
त्याच्या तेजाने मग, तो विश्व उजळून गेला...
किर्ती,प्रसिद्धी,पैसा,प्रतिष् tha सर्व त्याला मिळाले...
तरीही त्याचे मन, केवळ तिच्याचसाठी तळमळले...
तिची आठवण येताच, तो गावाकडे परतला...
जाऊन तिच्या घराच्या, अंगणात उभा राहीला...
पण हे काय? ते घर अगदी उदास भासत होते...
कोणते तरी दुःख, त्या घरास ग्रासत होते...
आत पाऊल टाकताच, त्याच्या ह्रदयात धस्स झाले...
मनातल्या स्वप्नांचे डोलारे, क्षणार्धात लुप्त झाले...
तिचा फुलांच्या हारने सजलेला फोटो,
त्याच्या ह्रदयात बाणासारखा शिरला...
अन् यशाच्या शिखरावर पोहोचुनही,
शेवटी तो एक भिकारीच उरला.........

Tuesday, March 13, 2012

तो आणि ती

आज पहाट जरा मस्तच भासत होती,
त्यालाही जराशी धुंदी चढली होती.

बाहेर पाउस रिमझिम पडत होता, वाराही कुंद
जाहला होता...

तो आज खूप खुश होता, अगदी मनातून
भारला होता.

कारणही तसच होतं, आज तिच्या अन
त्याच्या लग्नाला एक वर्ष झालं होत...

ती तर त्याहुनही खुश होती,
अगदी मनाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होती
लग्नाला एक वर्ष तर झालंच होत, पण
ती त्याला आज "गुड न्यूज" देणार होती...



 सकाळी नाश्ता चालला होता, तिने आज
मोगरा माळला होता आणि सुवास मंद दरवळत
होता.

तिने आज त्याचे आवडते बटाटे पोहे केले होते,
तोही प्रत्येक घासाबरोबर तिला डोळे मिटकावून
दाद देत होता...

त्याच्या आईलाही हे कळत होत, ती पण मुद्दाम
मधेच खाकरून त्यांचा नजरभंग करत होती.

आणि तो अगदीच प्रेमाने तिच्या हातावर मधेच
एखादी थाप मारत होता...

संध्याकाळी आईकडून त्याने खास "परमिशन"
घेतली होती, आईनेही अगदी हसून ती दिली होती.
"इविनिंग शो" ची दोन तिकिटे काढली होती, मग
घरी तिघांचा डिनर असा मस्त बेत ठरला होता.
दोघे भलतेच खुश होते,

आई देखील त्यात सामील
झाली होती.

दृष्ट लागू नये असा त्यांचा संसार होता, पण
संसाराच काय त्याला कधी कधी प्रेमाचीच दृष्ट
लागते...

त्याने पैसे वाचवून हफ्त्याने
तिच्यासाठी स्कुटी बुक केली होती,

तिला ऑफिसला जायला गर्दीत त्रास होतो ना.
तीही काही कमी नव्हती पाच महिने पैसे वाचवून
एक हिऱ्याची अंगठी घेतली होती,

जणू संध्याकाळी ती घेऊन एका हिरयावर
दुसर्या हिरयाचा कळस चढवणार होती...

ऑफिस मधून संध्याकाळी एकमेकांनाफोन केले,
तिने त्याला त्यांच्या सोनाराच्या दुकानासमोर
भेटायला बोलावले.

त्याला कळून चुकलं होतं
काहीतरी महागडी भेटवस्तू मिळणार,

तो हि नवीन कोरी करकरीत स्कुटी घेऊन
तिला भेटायला निघाला होता...

तो तिथे पोचला त्याने स्कुटी लपवून पार्क
केली, म्हटलं "सरप्राईज" देईन.

ती त्याच्या आधीच तिथे पोचली होती,
आणि हिऱ्याची सुरेख अंगठी आपल्याच मुठीत
लपवली होती...

तो क्षण आला दोघांची नजरानजर झाली, त्याने
तिला दुरूनच हात केला.

तिनेही त्याला हात हलवून प्रतिसाद दिला, दोघे
एक-एक पाऊल पुढे सरकू लागले...

ती तर दोन-दोन पावले उडी मारून चालत होती,
तो आपल्या नेहमीच्या हास्यात
तिच्यावरची नजर ढळू देत नव्हता.

दोघांच्याही मनात एक पूर्ण वर्ष तरळत होतं,
आयुष्य भराची साथ हेच फक्त दिसत होतं...

ती पुढे आली दोघांमध्ये फक्त वीस-एक पावलेच
राहिली, ती वीस पावले पण आज कोसभरवाटत
होती.

पण अचानक तो मटकन खाली बसला, काय
होतंय हेच त्याला कळत नव्हतं...

त्याचा कानाचे पडदे फाटले होते?
नाही नाही धरणीकंपच झाला होता.
कि आभाळ फाटलं वीज
पडली त्याला काही काही उमजत नव्हतं,
नाही नाही हा तर बॉम्ब-स्फोट होता...

क्षणभरात तो भानावर आला, सगळी कडे फक्त
धूर कल्लोळ आगीचे लोट आणि अस्ताव्यस्त
भंग झालेली माणसे.

त्याला त्याची "ती" कुठेच दिसत नव्हती,
त्याची भिरभिरलेली नजर फक्त तिलाच शोधत
होती...

आणि त्याला ती दिसली ती तीच होती का?
साडी फाटलेली, अंग रक्ताने माखलेलं.

तिचं पूर्ण सौंदर्य रक्ताने लपलेलं होतं, अंग-
अंग छिन्न-विच्छिन्न झालं होतं...

तो धावला जीवाच्या आकांताने धावला, त्याने
तिचं डोकं मांडीवर घेतलं.

तिला जोरजोरात हाक मारली, अजून
थोडी आशा दिसत होती तिने डोळे उघडले...

त्याचे अश्रू तिच्या गालावर पडत होते, तेच
अश्रू तिचा अबोल चेहरा दाखवत रक्त दूर सारत
होते.

तो काही बोलणार इतक्यात तिने मुठउघडली,
आणि ती हिऱ्याची अंगठी जणू काही खुलून
हसली...

तिने मुठ उघडली, त्याला काय बोलावं काहीच
कळत नव्हतं.

तिच्या मुठीत ती चमकदार अंगठी लकाकत होती,
जणू घे मला बाहुपाशात खुणावत होती...

तो रडत होता थांब थांब म्हणत होता, पण
तिच्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते.

तिच्या चेहऱ्यावर होतं ते फक्त हलकसं स्मित,
कदाचित मरणापर्यंत साथ का हीच?

तिने ती अंगठी हळूच त्याच्या हातावर ठेवली,
त्याने तीचा हात घट्ट धरला होता.

हळूच तिची मुठ बंद झाली फक्त "टेककेअर"
म्हणून तिचे नाजूक ओठ बंद झाले, पण
तिच्या चेहऱ्यावरच ते जीवघेण "स्माईल"
आजही तसच होतं तसच होतं...

Wednesday, March 07, 2012

शाळेतलं प्रेम ?

शाळेत असतान मीही एकदा पडलो होतो प्रेमात
कळलंच नाही, 'काय बघितलं होतं कुलंकर्ण्याच्या हेमात?
कुलंकर्ण्याची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं
नाकावरती सोडावॉटर आणि मागे वेण्या दोन
 
वारं आलं तर उडून जाईल अशी तिची काया
रूप पक्क काकूबाई... पण अभ्यासावर माया
गॅदरिंगमध्ये एकदा तिनं गायलं होतं गाणं
तेव्हापासून तिच्या घरी वाढलं येणं जाणं
नारळीपौर्णिमेला तिनं मला नारळीभात वाढला होता
हातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला होता
नको त्या वयात प्रेम करायची माझी मस्ती जिरून गेली
शाळेमधील प्रेमकहाणी शाळेमध्येच विरून गेली
थोड्याच दिवसांत वेगळं व्हायची वेळ आमच्यावर आली होती
मित्रांकडून कळलं, हेमाच्या वडीलांची बदली झाली होती
पुलाखालून दरम्यानच्या काळात बरचं पाणी वाहून गेलं
पुढं हेमाचं काय झालं? हे विचारायचंच राहून गेलं
परवाच मला बाजारात अचानक हेमा दिसली
'ओळखलंच नाही मी..' म्हटल्यावर खुदकन गालात हसली
आईशप्पथ सांगतो तुम्हाला तिच्यात काय बदल झाला होता
चवळीच्या शेंगेला जणू आंब्याचा मोहोर आला होता
लग्नानंतर पाच वर्षात हेमा गरगरीत भरली होती
मागे उभ्या नवऱ्याने हातात भाजीची पिशवी धरली होती
सोडावॉटर जाऊन आता कॉन्टॅक्ट लेन्स आले होते
कडेवर एक आणि हातामध्ये एक असे दोन प्रिन्स झाले होते
मंगळसुत्र मिरवत म्हणाली, "हे आमचे हे"
"बराच वेळ हात अवघडलाय जरा भाच्याला घे"
बरं झालं बरोबर मी माझ्या बायकोला नेलं होतं
माझ्या प्रेयसीनं नवऱ्यासमोर मलाच 'मामा' केलं होतं
म्हणून, आयुष्यात माणसाने कधी चुकू नये नेमात
शाळेत असतान मीही एकदा पडलो होतो प्रेमात......
Source : unkown

Monday, March 05, 2012

नातं

ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा पोकळी असते. 

तर, ही भिंत तोडताना त्य माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्याएका खिळ्याततिचा एक पाय चिणला गेला आहे. त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतुहलही जागृत झालं, की हा खिळाजवळपास ५ वर्षांपूर्वी हे घर नवीन बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं कीत्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली? जे जवळजवळ अशक्य होतं. त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष  ठेवून बसला, की ती आता कशी, काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळू-हळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक झाला, गहिवरला. कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते, अजिबात आशा सोडून न देता ! एक पाली सारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन न जाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतो. तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी

आधार द्या जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते, तेंव्हा. "तुम्ही" म्हण्जे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता. कोणतीही गोष्ट (नातं, विश्वास...) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं........!

Read This Heart Touching Stories