"काय गं किती उशील केलाश? माहितीय का मी कधी पाशून वात पाहतोय ते? तू पण बिझी झालीश कि काय?"
"नाही रे लाजा.... कशी-बशी आलीय घलातून खोते-खोते ... ... सांगून आईला.... फक्त आणि फक्त तुला भेतायला.... जा बाबा.... मी नाही बोलनाल तुज्याशी... तुला न माजी किंमतच नाई..."
"अशं नाही गं मला तुजी कालजी होत होती... म्हटलं हि अलकली तरी कुथे? ठीक तरी अशेल ना? काही झालं तर नशेल ना?"
"अय्या.....शोल्ली हा लाजा....चूक झाली ले...." "अशु दे गं...तुला माहित नाही मला तुजी कित्ती कित्ती आथवन येते ते.... मग मी खूप ललतो... पण हे मोठे लोक ना येले आहेत... त्यांना काय वाटतं काय माहित, मी लललो ना की, ते माजं हगीज दाईपर चेंज कलतात.... ह्या मोथ्यांना ना मोथा कुणी केला ना हाच प्लश्न पलतो मला कधी कधी."
"ते सोड...जे सांगायला मी तुला इथे बोलावलंय ना ते सांगून टाकतो मी आधी तुला, ऐक, आज माजा वाढदिवश आहे...डब्बे कि बद्दे अशं काहीतली म्हणतात हि मोथी लोकं त्याला... तल... आज तू माज्या घली संद्याकाली येणार आहेश....कललं का?"
"हो ले लाजा...कललं. चल निघते मी आता... आई वात पाहत अशेल" "ठीक आहे.... जा.... सांभाळून जा हा .... आणि ऐक... आय लव उ हा....ताता..."
No comments:
Post a Comment