संध्याकाळचे ५ वाजलेत. सर्वजण वैभवच्या 'रूम' वर. अभ्यास करून कंटाळलेत.... चहा करण्यासाठी दुध आणायच आहे. तेव्हाचा हा प्रसंग...
सागर नेहमीच कोणाची ना कोणाची नक्कल करत. कधी हैद्राबादी बोले तर कधी खानदेशी किंवा अजून काही. पण एकदा भूमिका घेतली की शेवटपर्यंत त्यावर मजबूत पकड. आज त्याच्या अंगात श्रीमंत पेशवे संचारलेले. विशाल बेडवर कसलीशी कादंबरी वाचत पडला आहे. सुश्या जरनल पूर्ण करत बसला आहे. बाकी सगळे काही ना काही लिहीत बसले आहेत....
वैभव:- ए विशल्या, दुध आण जा.... विशाल:- मी नाही जाणार. मी पुस्तक वाचतोय... (खुपच गंभीर पणे पुस्तक वाचतोय अशा दिखाव्यात ) वैभव:- जा रे, त्या दुकानवाल्या मारवाड्याची पोरगी चिकनी आहे... सागर:- (श्रीमंतांच्या स्टाईल मध्ये)जा विशालपंत. मारवाड तुम्ही काबीज करणे अशी श्रींची... सॉरी-सॉरी श्रीमंतांची इच्छा आहे.. (चुकून १६०० मध्ये गेला हा....)
विशाल:- बघ मग पोरगी म्हणाल्यावर मी लगेच येणार नाही.. वैभव:- तु असा किती वेळ टिकणार रे झंगुर.....(हश्या....) सागर:- पंत, म्हणजे आमच्या कानी आले ते सत्यच आहे तर.... आपण दोन 'बा' साठी काहीही करू शकता???(तेवढ्यात कोणी म्हणाल 'बाई' आणि 'बाटली' रे) सुश्या:- तो बाई प्रकरणातच एवढा गुंतलाय, बाटली पर्यंत जाईल अस काही वाटत नाही. विशाल:- अशा खाजगीतल्या गोष्टी सभेत मांडू नये श्रीमंत, मी जातो पण ह्या वैभ्यावर एक लाथ घाल. (सागर वैभवच्या पृष्ठभागावर जोरात लाथ घालतो. वैभव 'आयो आयो' करत 'भ' ची बाराखडी चालू करतो) सागर:- (त्याच्या शिव्यांना प्रत्युतरही ऐतिहासिक भाषेत ) खबरदार अपशब्द वापराल तर... आम्ही तुमच पानिपत्य करू... सुश्या:- (लिहिता लिहीताच खाली मान घालून )पानिपत्य नाही पारिपत्य.... हा पहिला बाजीराव की दुसरा रे????? सागर:- कोणता का असेना, श्रीमंत मिन्स श्रीमंत... नो क़्वेस्शन.... (मग वैभवला उद्देशून)अरे त्या काळात राजांनी कानाखाली मारली तरी देव प्रसन्न झाला असे समजायचे.... विशाल:- तू ह्याच्या कुठे लाथ मारलीस??? मग ह्याला 'कामदेव' प्रसन्न होईल...(सगळे हसायला लागतात) वैभव:- (सगळ्यांचा आपल्यावरील हल्ला वाचवण्यासाठी विषय बदलून)ए तो सुश्या सुमडीत बसलाय. जा दुध आन सुश्या... सुश्या:- पैसे नाहीयेत राव सुट्टे, बघ.. (सुश्याच्या पाकिटात सुटे १० ची नोट सापडते).. ए ती नाही, ती लकी नोट आहे. ट्रेन मध्ये एका छक्क्याला दिली तर त्याने ('त्याने' म्हणाव की 'तिने' या गोंधळात)परत दिली... म्हणाला -'ले, आज तक किसी को वापस नाही दिया'... तेव्हापासून माझं पाकीट नेहमी भरलेल असतं... (छाती फुगवून) (सगळेजण माना वळवून, गंभीरपणे त्याचा किस्सा ऐकत असतात. तेवढ्यात ती शांतता भंगत....) विशाल:- बरोबर पूर्ण ट्रेन मध्ये त्याने आपला माणूस बरोबर ओळखला(सगळेजण सुश्यावर हसायला लागतात. सुश्या गुपचूप दुध आणायला जातो... दारापाशी गेल्याबर मागे वळून...) सुश्या:- अरे अजून दहा द्या, हे कमी पडतील. वैभव:- अरे एकदा 'टाळी' वाजव ते सुद्धा परत येतील....... (लोळून लोळून हसत....)
No comments:
Post a Comment