Jayesh Gujrati's Blog (in Marathi): तो एक भिकारी होता...

Search

Saturday, March 17, 2012

तो एक भिकारी होता...

तो एक भिकारी होता...
लहानपणापासूनच गणपती मंदीरासमोर बसायचा...
येणार्‍या-जाणार्‍याकडे आशाळभूत नजरेने पहायचा...
त्याचा आवाज खूप चांगला होता...
सुरेल आवाजात भक्तीगीतं गायचा...
स्वतःला विसरुन सुरांमध्ये तल्लीन होऊन जायचा...
ती मंदीराजवळच रहायची...
दर मंगळवारी न चुकता मंदीरात यायची...
या मुलाचं तिला विशेष कौतुक वाटायचं...
त्याच्या आवाजातील कारुण्य, तिच्या मनात दाटायचं...
एकदा जाऊन ती त्याच्याशी बोलली...
एकमेकांच्या नकळत, त्यांची मैत्री फुलली...

आता, ती रोज मंदीरात येऊ लागली...
त्याच्यासोबत अखंड गप्पा मारु लागली...
तिनं त्याला लिहायला, वाचायला शिकवलं...
त्यानेही सगळं झटकन आत्मसात केलं...
हळूहळू त्याच्या पंखांना पालवी फुटू लागली...
त्याच्या मनात तिच्याविषयी प्रीत मग दाटू लागली...
त्यानं ठरवलं, स्वतःच्या पायावर उभं रहायचं...
आणि मग कर्तृत्वाच्या जोरावर, तिला मिळवायचं...
वर्ष सरत होती... काळ सरकत होता...
त्याच्या मनात प्रेमाचा अवीट झरा झरत होता...
मग एके दिवशी त्याने, शहरात जायचं ठरवलं...
संगीताच्या विश्वात, नशीब कमवायचं ठरवलं...
तिला न भेटताच, तो शहरात निघून आला...
आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, जोमानं लढू लागला...
रोज भर उन्हात, पायी रखडत जायचा...
मान्यवर संगीतकारांचे उंबरे झिजवायचा...
पण त्याला कधीच कोणी संधी दिली नाही...
त्याच्या गुणांची कोणी कदरच केली नाही...
दिवस उलटत होते, पण त्याचा निर्णय पक्का होता...
स्वतःच्या कर्तृत्वावर, त्याचा विश्वास सच्चा होता...
आणि एके दिवशी, ती सुवर्णसंधी चालून आली...
गायकीच्या स्पर्धेसाठी, प्रवेशिका त्यानं दिली...
त्याच्या आवजाला तिथं वाखाणलं गेलं...
त्याच्या गुणांचे मोल, खरोखर जाणलं गेलं...
आणि मग त्याच्यातील गायकाचा उदय झाला...
त्याच्या तेजाने मग, तो विश्व उजळून गेला...
किर्ती,प्रसिद्धी,पैसा,प्रतिष् tha सर्व त्याला मिळाले...
तरीही त्याचे मन, केवळ तिच्याचसाठी तळमळले...
तिची आठवण येताच, तो गावाकडे परतला...
जाऊन तिच्या घराच्या, अंगणात उभा राहीला...
पण हे काय? ते घर अगदी उदास भासत होते...
कोणते तरी दुःख, त्या घरास ग्रासत होते...
आत पाऊल टाकताच, त्याच्या ह्रदयात धस्स झाले...
मनातल्या स्वप्नांचे डोलारे, क्षणार्धात लुप्त झाले...
तिचा फुलांच्या हारने सजलेला फोटो,
त्याच्या ह्रदयात बाणासारखा शिरला...
अन् यशाच्या शिखरावर पोहोचुनही,
शेवटी तो एक भिकारीच उरला.........

No comments:

Post a Comment

Read This Heart Touching Stories