अपयशास चाखल्याशिवाय यशाला किंमत येत नाही पैलूंना पाडल्याशिवाय दगडाचा हिरा होत नाही नुसती हळद पिल्याने गोरे होता येत नाही टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
रांजणात गोटे टाकल्याशिवाय कावळ्याची तहान भागत नाही हातपाय हलवल्याशिवाय अंगण सरळ होत नाही दे रे हरी पलंगावरी हरी नाही देत नाही टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
आळशीपणामुळे सशाला शर्यत जिंकता येत नाही मूर्ती कितीही मोठी तरी कीर्ती सहज येत नाही प्रयत्नच केल्याशिवाय कविता लिहिता येत नाही टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
No comments:
Post a Comment