Search
Wednesday, March 07, 2012
शाळेतलं प्रेम ?
शाळेत असतान मीही एकदा पडलो होतो प्रेमात
कळलंच नाही, 'काय बघितलं होतं कुलंकर्ण्याच्या हेमात?
कुलंकर्ण्याची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं
नाकावरती सोडावॉटर आणि मागे वेण्या दोन
वारं आलं तर उडून जाईल अशी तिची काया
रूप पक्क काकूबाई... पण अभ्यासावर माया
गॅदरिंगमध्ये एकदा तिनं गायलं होतं गाणं
तेव्हापासून तिच्या घरी वाढलं येणं जाणं
नारळीपौर्णिमेला तिनं मला नारळीभात वाढला होता
हातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला होता
नको त्या वयात प्रेम करायची माझी मस्ती जिरून गेली
शाळेमधील प्रेमकहाणी शाळेमध्येच विरून गेली
थोड्याच दिवसांत वेगळं व्हायची वेळ आमच्यावर आली होती
मित्रांकडून कळलं, हेमाच्या वडीलांची बदली झाली होती
पुलाखालून दरम्यानच्या काळात बरचं पाणी वाहून गेलं
पुढं हेमाचं काय झालं? हे विचारायचंच राहून गेलं
परवाच मला बाजारात अचानक हेमा दिसली
'ओळखलंच नाही मी..' म्हटल्यावर खुदकन गालात हसली
आईशप्पथ सांगतो तुम्हाला तिच्यात काय बदल झाला होता
चवळीच्या शेंगेला जणू आंब्याचा मोहोर आला होता
लग्नानंतर पाच वर्षात हेमा गरगरीत भरली होती
मागे उभ्या नवऱ्याने हातात भाजीची पिशवी धरली होती
सोडावॉटर जाऊन आता कॉन्टॅक्ट लेन्स आले होते
कडेवर एक आणि हातामध्ये एक असे दोन प्रिन्स झाले होते
मंगळसुत्र मिरवत म्हणाली, "हे आमचे हे"
"बराच वेळ हात अवघडलाय जरा भाच्याला घे"
बरं झालं बरोबर मी माझ्या बायकोला नेलं होतं
माझ्या प्रेयसीनं नवऱ्यासमोर मलाच 'मामा' केलं होतं
म्हणून, आयुष्यात माणसाने कधी चुकू नये नेमात
शाळेत असतान मीही एकदा पडलो होतो प्रेमात......
Source : unkown
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
Read This Heart Touching Stories
↑ Grab this Headline Animator
No comments:
Post a Comment